(User Level: User is not logged in.)

कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • देह बंधन – मुक्ती

    बंधन मुक्तीसाठीं असतां, बंधनात ते पाडून टाकी
    कर्मफळाचे एक अंग ते, टिपतां राही दुसरे बाकी...१,

    साध्य करण्या जीवन ध्येय, देह लागतो साधन म्हणूनी
    सद्उपयोग करूनी घेतां, साध्य होईल हे घ्या जाणूनी...२,

    हिशोब तुमचा चुकून जाता, तोच देह बनतो मारक
    विनाश करितो मागें लागतां, मिळविण्यास ते ऐहिक सुख....३,

    बंधन पडते आत्म्याभोंवती, शरिरांतल्या वासने पायी
    वासनेच्या आहारी जातां, बंधनास ती बळकटी येई.....४,

    तपसाधनेचे कष्ट करूनी, देह करितो आत्म्यास मुक्त
    देहाचे ते बंधन पडते, जेव्हां बनतो वासनायुक्त...५

    -- डॉ. भगवान नागापूरकर
    ९००४०७९८५०

      June 14, 2019


  • पाखरांची शाळा

    पाखरांची शाळा भरे पिपळावरती
    चिमण्यांची पोरे भारी गोंगाट करती ! ॥१॥

    उतरते ऊन, जाते टळूनी दुपार
    पारावर जसा यांचा भरतो बाजार ! ॥२॥

    बाराखड्या काय आई, घोकति अंगणी?
    उजळणी म्हणती का जमूनी रंगणी? ॥३॥

    तारेवर झोके घेती बसूनी रांगेत
    भुर्रकन इथे तिथे उडती मौजेत ! ॥४॥

    खेळकर मुले, नको कराया अभ्यास
    परीक्षेत का न आई व्हायची नापास? ॥५॥

    लक्ष यांचे पांगलेले पेरूच्या बागेत
    मास्तरच यांना हवे आमुचे रागीट ! ॥६॥

    पावसाळ्यातही शाळा आमुची न गळे
    गळकी न शाळा यांची, भिजती सगळे ! ॥७॥

    रविवारी, सणवारी आमुच्यासारखी
    यांना नाही सुटी, भली मोडली खोड की ! ॥८॥

    यांच्याहून आम्ही आई ! शहाणे, नव्हे का?
    गप्प शाळेमधी, कधीं धरितो न हेका ॥९॥

    होतो पास आम्ही, देती दिपोटी बक्षीस
    मौज काय सांगू? मिळे सुट्टीही शाळेस ! ॥ १०॥

      June 19, 2026


  • चंदन

    तू कधी चंदनाचं झाड पाहिलंस का रे?
    मीही नाही रे पाहिलं

    आपल्या वाट्याला येतात ते छोटे इवलूशे तुकडे
    त्यातूनच त्याचा सुगंध हुंगून तृप्त व्हायचे

    कधीतरी भेटतो तो एखाद्या जवळून गेलेल्या अत्तराप्रमाणे
    अर्धोन्मीलित अवस्थेत श्वासात सामावून घेतो आपण

    क्षणभरच.बघू वळून पाहू पण चुटपुट लागते
    हरवतो तो न जाणो किती दिवस.

    अगदी अगदी दडून बसतो
    अवचित मग कधी कुठेतरी पुन्हा गवसतो कुठे बरं

    गाभाऱ्यात मंद मंद समईसोबत दरवळत असतो
    जीवाची शिवाशी भेट ठरवत असतो

    कधीतरी कणकण होऊन ओंजळीतही उतरतो
    पण निर्माता मात्र अजून देखिलाच नाही

    चंदन एक अलौकिक परिमळ
    नित्य नव्या जाणीवांसह पुन्हा पुन्हा भेटत राहतो

    स्पर्शाविना तुझा सुगंध आसमंत भरून उरतो
    चंदना एकदा तरी चांदण्यात तू मला कडकडून भेट
    रंध्रातून श्वासात उतरून मीच होऊदे चंदनाचे बेट!!

    -- वर्षा कदम.

      June 2, 2022


  • काय होते बाबासाहेब……

    दीन,दलित,गोरगरीबांची
    आई होते बाबासाहेब .
    पिचलेल्या,ठेचलेल्यांची
    दाई होते बाबासाहेब.
    दाबलेल्या आवाजाचा
    हुंकार होते बाबासाहेब.
    तार नसलेल्या विणेचा
    झंकार होते बाबासाहेब.
    प्रयत्न..प्रयत्न...प्रयत्न
    यशस्वी प्रयत्न होते बाबासाहेब.
    मोजून मोपून सांगायचे तर
    अक्षरश: चौदावे रत्न होते बाबासाहेब.
    अंधाराला प्रकाशाशी जोडणारी
    नाळ होते बाबासाहेब.
    दांभिकतेच्या कानाखालचा
    जाळ होते बाबासाहेब.
    प्रज्ञा,शील,करूणेचे
    बीज होते बाबासाहेब.
    सुभेदार रामजींच्या कष्टाचे
    चीज होते बाबासाहेब.
    बुद्ध,कबीर,फ़ुलेंचा
    सार होते बाबासाहेब.
    लवलवत्या लेखणीची
    धार होते बाबासाहेब.
    निद्रिस्त लाव्हा पाहून
    खूप दु:खी होते बाबासाहेब.
    संस्कृतीला ढुसण्या देणा्रा
    ज्वालामुखी होते बाबासाहेब.
    महाडच्या चवदार तळ्याची
    निळाई होते बाबासाहेब.
    डोळ्यातल्या आभाळाची
    जळाई होते बाबासाहेब.
    बुद्धांच्या करूणेचा
    सागर होते बाबासाहेब.
    शाहू महाराजांच्या लढ्याचे
    आगर होते बाबासाहेब.
    यारांचे यार आणि
    दुश्मनांचे मित्र होते बाबासाहेब.
    वेरूळ्च्या लेण्यातील
    कोरीव होते चित्र बाबासाहेब.
    मनुस्म्रुतीला भस्म करणारी
    आग होते बाबासाहेब.
    शेळपट जिणं नाकारणारे
    वाघ होते बाबासाहेब.
    सवितेची कविता,
    लेकरांची रमाई होते बाबासाहेब.
    थकल्या-भागल्या जीवासाठी
    प्रेमळ भिमाई होते बाबासाहेब.
    किती सांगु?किती नाही?
    काय होते बाबासाहेब?
    नको नको रे हा नादानपणा
    नक्की बघत असतील बाबासाहेब !!
    सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)
    मोबा. ९९ २३ ८४७ २६९

      March 30, 2010


  • संस्कारमय मन

    प्रयत्न मनाचा सदैव असे, भरारी घेण्याचा
    उंच आकाशी तारांगणांना, भेट देण्याचा....१,

    मनी आस ती राहत असते, उचलून त्यास न्यावे
    शिखरावरती जाता क्षणी, स्थितीरूप घ्यावे...२,

    प्रयत्नात साथ न मिळता, खाली कोसळते
    विचार दबावापुढती त्याचे, काही न चालते...३,

    विचार संस्काराचे वलय, मनाभोवती फिरे
    निर्मळ पवित्र मन ते, अवलंबूनी विचारे...४

    डॉ. भगवान नागापूरकर
    संपर्क - ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

      December 19, 2016


  • पाऊस आलाय…..भिजून घ्या

    पाऊस आलाय.....भिजून घ्या
    थोडा मातीचा गंध घ्या
    थोडा मोराचा छंद घ्या
    उरात भरून आनंद घ्या.....
    आलाय पाऊस.....भिजून घ्या
    बघा समुद्र उसळतोय
    वारा ढगांना घुसळतोय
    तुम्हीही त्यांच्यात मिसळून घ्या..... आलाय पाऊस.....भिजून घ्या
    ऑफ़ीस रोजच गाठत असतं
    काम नेहमीच साठत असतं
    मनातून भिजावंसं वाटत असतं
    मनाची हौस पुरवून घ्या..... आलाय पाऊस.....भिजून घ्या
    सर्दी पडसे रोजचेच.....
    त्याला औषध तेच तेच..... प्यायचेच आहेत नंतर काढे , आधी अमृत पिऊन घ्या..
    आलाय पाऊस.....भिजून घ्या
    बघा निसर्ग बहरलाय
    गारव्याने देहही शहारलाय
    मनही थोडं मोहरून घ्या..... आलाय पाऊस.....भिजून घ्या

    WhatsApp वरुन

      June 30, 2017


  • तल्लीनतेत आहे ईश्वर

    श्रीकृष्णाचे जीवन बनली एक गाथा
    यशस्वी होई तुमचे जीवन चिंतन त्याचे करिता ||१||

    तल्लीनतेच्या गुणामध्यें लपला आहे ईश्वर
    तल्लीनतेचा आनंद लुटा शिकवी तुम्हा मुरलीधर ||२||

    बालपणीच्या खेळामध्ये जमविले सारे सवंगडी
    एकाग्रतेने खेळवूनी आनंद पदरीं पाडी ||३||

    मुरलीचा तो नाद मधूर मन गेले हरपूनी
    डोलूं लागले सारे भवतीं मग्न झाल्या गौळणी ||४||

    टिपऱ्या घेवूनी नाच नाचला गोपी साऱ्या जमवूनी
    लय लागूनी जातां सारी संसार गेली विसरूनी ||५||

    राधा तर वेडी झाली तुझ्यावरील प्रेमानें
    लूटून जावे प्रेमामध्यें शिकविले श्रीकृष्णानें ||६||

    गीतेचे तर ज्ञान आगळे उकलेले जीवन कोडे
    आत्मज्ञान घेतां त्यातील जीवनाचे दर्शन घडे ||७||

    डॉ. भगवान नागापूरकर
    ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

      December 25, 2017


  • माझं मैत्र

    अरे हे मैत्र मैत्र काय असतं?

    अरे हे मैत्र मैत्र काय असतं?

    मैत्रीच्या घट्ट नात्याने जमलेल्या
    दुधावरची साय असतं
    तासंतास शाळेच्या आठवणीत रामल्यावर
    भावनांच्या मंथनातून निघालेलं लोणी असतं
    अरे हे मैत्र मैत्र काय असतं?

    बऱ्याच वर्षांनी अचानक
    शाळेतील क्रश समोर दिसताच
    हृदयाच्या आतून उमटलेले
    हाssssय असतं
    तरीही मनातलं दुःख बाहेर न दाखवता
    हसून केलेलं हाय असतं
    अरे हे मैत्र मैत्र काय असतं?

    मित्रांसोबत अड्डा जमल्यावर
    आपसूकच कनेक्ट झालेलं वाय फाय असतं
    स्वतःची आतली परिस्थिती कशीही असली
    तरी बाहेर दाखवताना एकदम हाय फाय असतं
    अरे हे मैत्र मैत्र काय असतं?

    आपला मित्र त्याचं दुःख सांगत नसला
    तरी नुसती नजरा नजर होताच
    या हृदयीचं त्या हृदयाला कळतं
    त्याच्या मनात नेमकं काय डाचत असतं
    अरे हे मैत्र मैत्र काय असतं?

    रोजच्या जीवनात कभी खुशी-कभी गम
    सहन करत आयुष्य पार पडायचं असतं
    पण मित्राची थाप पाठीवर पडतांच
    आनंदाच्या लाटांवर स्वार होऊन
    पुन्हा नव्यानं fresh होवून
    जग रहाटीत मिसळून जायचं असतं
    अरे हे मैत्र मैत्र काय असतं?

    आपण कामाच्या कितीही धावपळीत असतो
    पण मित्राचा फोन आला तर
    त्याच्या नुसत्या हॅलो शब्दाला ऐकून
    त्याला काय म्हणायचंय हे जाणायचं असतं
    अरे हे मैत्र मैत्र काय असतं?

    या GT ला टाटा करताना
    पुढच्या GT ला भेटेपर्यंत
    आठवणींचं गाठोडं बांधून
    मनात लॉक केलेलं फिक्स डिपॉझिट असतं
    अरे हे मैत्र मैत्र काय असतं?
    हे तर आपलं सर्वस्व असतं
    हे तर आपलं सर्वस्व असतं.

    @ मी सदाफुली?
    ✍️ संध्या प्रकाश बापट

      April 5, 2020


  • गिरनार यात्रा (भाग – २)

    आजूबाजूचा परिसर सपाट ओसाड होता. जसे जसे आम्ही गिरनार पायथ्याशी पोहचत होतो, आम्हला गिरनारच्या डोंगर रंगांचे दर्शन होत होते. गिरनार पायथ्याला गिरनार तलेठी म्हणतात.

      December 20, 2021


  • मायमराठीचे काव्यरत्न

    जरी मी संपलो इथे
    प्रवास संपणार नाही
    चार लाकडांसोबत
    माझा ध्यास जळणार नाही
    राख निजेल मातीच्या कुशीत
    स्वप्ने निजणार नाही
    राहतील रेंगाळत येथेच
    पण सावली दिसणार नाही...

    मायमराठीचे काव्यरत्न
    कविवर्य मंगेश पाडगावकर
    प्रथम पुण्यस्मरण
    ३० डिसेंबर २०१६

      January 1, 2017