गुज सांगती

झाडा वरल्या
खोप्या मधल्या
गुज सांगती
पिला आपल्या.... १

चारा खाऊनी
पाणी पिऊनी
घरी आपल्या
सुखी राहूनी.....२

पंखात बळ
येता बक्कळ
उडून जाती
पिले सकळ......३

पिले उडाली
आई एकली
पाखरांसाठी
हळहळली.....४

दुनियादारी
ऐक रे न्यारी
गुज सांगती
समर्थ सारी....५

-- सौ.माणिक शुरजोशी



झाडा वरल्या
खोप्या मधल्या
गुज सांगती
पिला आपल्या…. १

चारा खाऊनी
पाणी पिऊनी
घरी आपल्या
सुखी राहूनी…..२

पंखात बळ
येता बक्कळ
उडून जाती
पिले सकळ……३

पिले उडाली
आई एकली
पाखरांसाठी
हळहळली…..४

दुनियादारी
ऐक रे न्यारी
गुज सांगती
समर्थ सारी….५

— सौ.माणिक शुरजोशी

Author