(User Level: User is not logged in.)

कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • Seen मध्येच विरलेलं प्रेम

    तू जवळ होतीस, पण कधीची निघून गेलीस,
    मी स्टेटस अपडेटमध्येच अडकून पडलो.

    चॅट ब्लू टिकवर थांबली कायमची,
    मी “seen” मध्येच हळूहळू विरलो.

    सोबत होतो, पण वेळच वेगळा होता,
    तू पुढे गेलीस, मी मागेच राहिलो.

    तुझ्या “busy” मध्ये दिवस संपून गेले,
    माझं “miss you” ड्राफ्टमध्येच झोपलं.

    स्पर्श होता, पण कनेक्शन तुटलेलं,
    हातात फोन, मन मात्र रिकामं झालं.

    तू जवळ असूनही दूर वाटू लागलीस आणि गर्दीतही मी एकटा झालो.

    •ॲड.कीर्तिराज शैलेंद्र आगलावे, पुणे

      July 13, 2026


  • चारोळी – आई भाकर

    आई भाकर
    थापते चार
    खायला सारे
    बेजार फार

    -- माणिक (रुबी)

      December 2, 2019


  • गोंड आदिवासी समाजातील परंपरेचे बळी – कुरमाघर (कथा ४)

    वास्तविक निसर्गपूजक माडियागोंड जातीच्या आदिवासीत मातृसत्ताक पद्धत असून  घर चालविण्यात स्त्रीचा मोठा वाट आहे .ती दिवसभर घर व शेतीकामात गढलेली असते,अशा स्त्रीला मासिक पाळीच्या वेळी मात्र कुरमाघरात राहते घर सोडून राहण्यास जावेच लागते.

      February 17, 2022


  • दुधामधील चंद्र

    कोजागिरीची पौर्णिमा परि, आकाश होते ढगाळलेले
    शोधूं लागले नयन आमचे, चंद्र चांदणे कोठे लपले
    गाणी गावून नाचत होती, गच्चीवरली मंडळी सारी
    आनंदाची नशा चढून मग, तल्लीन झाली आपल्याच परी
    मध्यरात्र ती होवून गेली, चंद्र न दिसे अजूनी कुणा,
    वायु नव्हता फिरत नभी तो, मेघ राहती त्याच ठिकाणा
    दूध आटवूनी प्रसाद घेण्या, उत्सुक होतो आम्ही सारे
    ढगात लपल्या चंद्राला मग, क्षीरात शोधी आमची नजरे
    स्वादिष्ट मधूर दुग्धांमृत ते, शशिधरांच्या चांदण्यापरि
    मेघांमध्ये तो लपला नसूनी, उतरलां होता ह्याच क्षिरी

    डॉ. भगवान नागापूरकर
    ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

      March 21, 2019


  • वचन

    वाणी मधूनी शब्द निघाला, कदर त्याची करीत होते ।

    मुखावाटे बाहेर पडे जे, वचन त्याला समजत होते ।।

    दिले वचन पालन करण्या, सर्वस्व पणाला लावीत होते ।

    प्राणाची लावून बाजी, किंमत शब्दांची करीत होते ।।

    स्वप्नामध्ये दिले वचन, हरिश्चंद्र ते पालन करी ।

    राज्य गमवूनी सारे आपले, स्मशानी बनला डोंबकरी ।।

    प्राण आहूती देई दशरथ, वनी धाडूनी राम प्रभूला ।

    पालन केले तेच वचन, रणांगणी दिले जे कैकयीला ।।

    आज लोपूनी तेज वाणीचे, तुटले विश्वासाचे नाते ।

    बदलूनी जाती क्षणात सारे, घटकेपूर्वीचे शब्द जे होते ।।

    मित्र वा आप्त कुणी, आई-बाप वा भाऊ-बहीण ।

    स्वार्थीभाव अंगी मुरूनी, पाळीत नाही आपले वचन ।।

    अंतर्यामी बसला ईश्वर, जाण त्याची सदैव असावी ।

    ‘वचन’रूपे व्यक्त होई , हीच भावना मनी ठसावी ।।

    डॉ. भगवान नागापूरकर

      June 24, 2019


  • जागतिक पोलिओ दिन

    जगातून पोलिओच्या उच्चाटनात जोनस सॉल्क यांचं काम खूप मोठं आहे. त्यांनी आणि त्यांच्या टीमने पोलिओची पहिली लस शोधून काढली होती.

      October 24, 2021


  • तू मला कधी भेटणार…

    तू मला कधी भेटणार...

    निर्विकार तुझ्या चेहऱ्यावर

    विकार कधी दिसणार...

    सुंदर पण कोमेजलेल्या तुझ्या

    चेहर्‍यावर हस्य कधी फुलणार ....

    कठोर आवाजात तुझ्या

    गोडवा कधी येणार...

    गुलाबी गालावर तुझ्या

    पुन्हा खळी कधी हसणार...

    पुर्वीचे ते चैतन्य

    तुझ्या वागण्यात कधी जागणार...

    माझ्या आठवणीतील ती

    तू मला कधी भेटणार...

    © कवी – निलेश बामणे

      January 1, 2025


  • कलेचे खरे मुल्य

    पर्वत शिखरीं जाऊन खोदून आणली माती
    कौशल्य पणास लावून केला मी गणपती ।।१।।

    मुर्ती बनली सुरेख आनंद देई मनां
    दाम मिळेल ठिक हीच आली भावना ।।२।।

    घेऊन गेलो बाजारीं उल्हासाच्या भरांत
    कुणी न त्यासी पसंत करी निराश झालो मनांत ।।३।।

    बहूत दिवस प्रयत्न केला कुणी न घेई विकत
    कंटाळून नेऊन दिला गणपती मी शाळेत ।।४।।

    भरले होते भव्य प्रदर्शन हस्तकला कौशल्याचे
    नवल वाटले गणपती बघून दालनातील सुरवातीचे ।।५।।

    चकीत झालो जाणूनी मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
    गणपतीच्या भव्यतेनी मिळवीला हा अधिकार ।।६।।

    -- डॉ. भगवान नागापूरकर
    ९००४०७९८५०

      May 4, 2019


  • भातुकली

    बालपणीची मैत्रीण माझी
    भातुकलीतील ती सवंगडी
    निरागस तो खेळ आगळा
    मी राजा, ती राणी भाबडी ।।

    कितीतरी हा काळ हरवला
    पण आज तीच राणी मनी
    ती दूर, दूर तर मी हा इथे
    आठवण, तिची नित्य मनी ।।

    मला वाटते, भेटावे तिजला
    अन बोलावे सारे गुज मनीचे
    जे घडले ते आता घडुनी गेले
    पुनर्जन्मी! खेळ खेळू मनीचे

    -- वि.ग.सातपुते.(भावकवी)

    9766544908

    रचना क्र. २४.

    २४ - १ - २०२२.

      February 3, 2022


  • काळाची चाहूल

    जो जो येईल पाया खालती, तुडविला जातो त्याचक्षणी
    कुणी मरावे अथवा जगावे, सारे प्रभूवर अवलंबूनी....१,

    भक्ष्य शोधण्या किटक चाले, तसाच फिरतो प्राणी देखील
    जगण्यासाठी फिरत असता, मृत्यूची येते त्याला चाहूल...२,

    चालत असतो काळ सदैव, दाही दिशांनी घिरट्या घालीत
    झडप घाली अचानक तो, जो जो येई त्याच्या टापूत...३,

    जरी दिसे मारक कुणीतरी, करवूनी घेतो काळच सारे
    विश्वाचा खेळ खेळविण्या, जन्म-मृत्यूचे चक्र फिरे....४

    डॉ. भगवान नागापूरकर
    ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

      April 19, 2017