वाढदिवस माझ्या आयुष्यात महत्व फक्त एकाच दिवसाच ज्या दिवशी माझा जन्म झाला जो लक्षात ठेऊन माझ्या मित्रांनी माझ्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला मित्रांच्या शुभेच्छा स्वीकारताना मला
May 14, 2012
चंचल मन हे चंचल धारा, पंख पसरीत उडे भरारा ।
झेप घेवूनी उलटी सुलटी, लक्ष तयाचे चमकत तारा ।।
लुकलुकणारे तारे अगणित, नभांग सारे प्रसन्न चित्त ।
ताऱ्यावरूनी ताऱ्यावरती, झोके घेते सहज अविरत ।।
वेळ क्षणाचा पुरतो त्याला, टिचक्या टपल्या मारीत गेले ।
आवर घालणे कठीण होता, चटकन निसटून हातून गेले ।।
कोठून येते त्याला शक्ती, सटकून जाण्याची ही युक्ती ।
अन्न पाणी हे कसे घेई ते, पचनी सारे कसे पडते ।।
हटवादी हे असे केवढे, नको तिथेची जाय बापडे ।
देहाला त्या भोग देऊनी, भोग भोगण्या लावी तेवढे ।।
स्वैराचारी बंध मुक्त ते, देहावरती राज्य करीते ।
अवचित मिळता संत महात्मा, बंधनात ते अडकून पडते ।।
राज्य उलटते सारे आता, मनावरती ताबा बसता ।
माया जाते हारून जेथे, ब्रह्मरूप ते सारे होता ।।
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
August 17, 2016
एका मोठ्या कारखान्याचा मालक,
भासत होता छोट्या विश्वाचा चालक
लाखो रूपयाची उलाढाल रोज होत होती,
मागणी, पूरवठा, उत्पन्न याचा बनला होता त्रीकोण
उत्पन्नानी घेतला होता उंची वरचा कोन,
लक्ष्मी मालकावर प्रसन्न होती,
खातां आलं असतं तर प्रत्येक जेवणांत पाव किलो सोनं आणि तोंडी लावायला चार हिरे
पण नशीब दुर्दैवी बिचारे,
मधूमेह आणि रक्तदाब होता त्याला,
वर्ज्य केल होत साखर व मिठाला
नाचणीची भाकरी व उकडलेल्या अळणी भाज्यांमधून शोषित होता जीवन सत्व.
जगण्यासाठी आहार नियंत्रण
समजला होता हे तत्व. वात पित्ताची प्रकृती त्याची. थंड पाणी थंड हवा यांचे पासून दूर राहण्याची. लाकडाच्या टणक फळींचा केला होता खास पलंग,
कारण मऊ गादीमुळे ठणकत होते त्याचे अंग,
आणि त्याच पलंगावर बसून नैसर्गिक हवा व प्रकाशामध्ये, कंपनीच्या लाखो रूपयाच्या Balance Sheets वर व चेक्सवर स्वाक्षऱ्या करित होता.
पाने मागे पुढे चाळीत होता, मध्येच मान वर करून बघत होता, विचारत होता, समजल आहे हे दाखवित होता, हिशोब तपासनीस, सेक्रेटरी, पर्सनल मॅनेजर सारे उभे होते सभोवताली.
माना त्यांच्या झुकत होत्या, शब्द त्याचे ते उचली,
कसला तरी आंतरीक अभिमान अहंकार चेहऱ्यावर चमकत होता.
आपल्या एका स्वाक्षरीमध्ये लाखो रूपयाच्या उलाढाली सहजगत्या होण्याची ताकद आहे ह्या जाणीवेने, मध्येच थांबून सेवकाने टेबलावर ठेवलेले लिंबू सरबताचे घोट पित होता... सरबत.... स्वच्छ निर्मळ पाणी त्यांत लिंबाचा रस. साखर मिठ वर्ज्य असलेले,
हा भोगत होता आणि इतर उपभोगात होते,
तरी देखील हे सारे माझे आहे, हीच खोलवरची जाणीव त्याला जगवीत होती..
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
November 12, 2019
असावा सुन्दर पापलेटचा बंगला
चंदेरी रुपेरी सुरमईचा चांगला
पापलेट्च्या बंगल्याला सारंग्याचे दार
धारदार डेग्याच्या कुर्ल्या पहरेदार
दोन कोळंब्याच्या खिड्क्या दोन
हॅलो हॅलो करायला लॉबस्टरचा फोन
मांदेल्याचा सोनेरी रंग छानदार
बांगड्यांना अंगभर खवले फार फार
बंगल्याच्या छतात कालवा रहातो
शिंपल्यातल्या तिसर्यांशी लपाछपी खेळतो
लांब लांब करल्यांचा नाच रंगला
बोंबिलाचा मासा मस्त चांगला
किती किती चवीचा पापलेट्चा बंगला
सोलकढी भातासंगे मस्त हाणला
(व्हॉटसऍप वरुन)
May 20, 2016
November 14, 2021
नको जाणे सिनेमाला,
गर्दीचा आहे पहिलाच दिवस
याच विचाराने थिएटर पडले ओस
चला जावू सिनेमाला, आजच्या दिवशी शेवटी.
निराशली मंडळी, बघूनी हाऊस फूल पाटी
-- डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
January 19, 2019
पाठिंबा देणारी माणसं कमवा,
पाठीमागे नाव ठेवणारी तर खूपच असतात…
समोर उभं राहून खांद्यावर हात ठेवणारी माणसंच
खरं बळ देऊन जातात.
सावलीसारखी साथ करणारी कमीच भेटतात,
बाकी प्रकाशात उभी राहून
अंधारात दगड फेकणारी गर्दी असते.
तुमच्या यशावर टाळ्या वाजवणाऱ्यांपेक्षा
तुमच्या अपयशातही
“मी आहे” म्हणणारी माणसं कमवा.
नाव ठेवणारे शब्द फेकतात,
पाठिंबा देणारे आयुष्य घडवतात.
पहिले आवाज करतात,
दुसरे माणूस घडवतात.
म्हणूनच…
लोक काय म्हणतात याकडे नाही,
कोण सोबत उभं राहतं याकडे पाहा.
कारण शेवटी आठवणीत राहतात तेच,
जे पडताना हात देतात,
नाव ठेवणारे नाही.
* कीर्तिराज आगलावे
July 13, 2026
का वाटले तुला रे मी लागलो मिटाया
July 12, 2026
February 14, 2022
उडत उडत एक मक्षिका, देव घरांत ती शिरली,
पुजा साहित्य आणि मूर्तिवरी स्वच्छंदानें नाचूं लागली...१,
धुंदीमध्ये बागडत होती, मूर्तीच्या ती बसे शिरावरी
धूप, गंध आणि सुमनावरूनी, जाई मध्येच प्रभू चरणावरी...२,
पंख चिमुकले हलवीत ती, मूर्तीपुढें गांवू लागली
प्रसाद दिसतां पंचामृताचा, प्रभू अर्पिण्यासी झेपावली...३,
नैवेद्याच्या क्षीर सागरीं, आत्मसमर्पण तिने केले
प्रभू सेवेत तल्लीन होवूनी, जन्माचे ते सार्थक केले...४
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
December 2, 2019
Copyright © 2025 | Marathisrushti