UK निघालंय् काडीमोड घ्यायला EU पासून
देशाच्या भवितव्याची बाब आहे ही.
पण MPs वागतायत् असे, की
जगात UK ला काडीची किंमत राहिली नाहीं.
EU मोडतंय् बोटं
पण तें बेटं
करणार काय !
ब्रेक्झिटवाल्या UK ला
‘सुसरबाई तुझी पाठ मऊ’
म्हणणं आहे प्राप्त,
नाहीं अन्य उपाय.
कोण द्वाड?
EU की UK?
कोण unreasonable?
EU की UK?
कोणाला कायकाय हवं आहे ?
अन् कोण त्याला म्हणत नाहींये Ok ?
अगं बाई, थेरेसा मे
आतां झालं बस्स
आतां खाली बस.
आजवर झालीय् सगळी चर्चा फोल
आतां Parliament घेतेय् कंट्रोल.
अगं, तूं Houseमधें अऽस किंवा नऽस
आम्हाला ‘नन्ना’चा पाठ
झाला आहे पाठ.
ब्रेक्झिट चा आत्मा काय आहे ?
Exit की Backstop ?
की परदेशी नागरिक ?
की, टिकणें उद्योगधंद्यांची मत्ता ?
की, नोकर्यांची सुरक्षितता ?
अन् continued आर्थिक सुबत्ता ?
Priority काय आहे ?
Why आहे ?,
तें कुणीच सांगत नाहींये बेटा.
फक्त चर्विचर्वण चालूं आहे.
Parliament मधें जे कांहीं घडतंय्
तें फारच हळूं आहे.
Common Market
की Common Customs-tariff ?
पण कसल्याच विकल्पाची
होत नाहीं तारीफ.
सगळेच विकल्प
होतायत् fail.
होणार की काय
ब्रेक्झिट ची गाडी derail ?
UK ला घ्यायचाय् काडीमोड
ब्रेक्झिट च्या नांवं;
पण, त्याच्या terms काय
तें कुणालाच नाहीं ठावं.
ब्रेक्झिट-भाषणांत
Point of Order
उठसूठ.
चालूं आहे PM चं
बस आणि ऊठ
बस आणि ऊठ.
-- सुभाष नाईक
October 21, 2019
एकटाच बसलो होतो, खोलीमध्यें शांत
करमणूक करीत होते, दुरदर्शन आत..१,
दूरीवरील व्यक्ती बघूनी, शब्द त्याचे ऐके
केवळ चावी फिरवितां क्षणी, दृष्य दुजे देखे...२,
जगामधली सर्व ठिकाणें, खोलीत अदृष्य तीं
साधनांचा उपयोग करीता, जाण त्याची येती....३,
वातावरण निसर्गाने, व्यापले सर्व जगी
सुक्ष्मापासूनी अनंततेचे, गुण एकाचे अंगी....४,
तेथे आहे जे येथेही, व्यापूनी सर्व स्थळी
ब्रह्माडांची व्यापकता, बिंदूत एका सगळी....५
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
July 26, 2020
इंटरनेट च्या प्रवाहात रोज मी
काही ना काही सोडत असतो
फेसबुक व्हॅट्सअप वर वाहते ते
माणसं आपसूक जोडत असतो
कविता लिहिणे एक छान माध्यम
लिहून प्रवाहात सोडून द्यायच्या
पोहोचतात आपोआप सगळीकडे
प्रतिक्रिया तेव्हढ्या आपण घ्यायच्या
पोहोचतो हृदयात वाचणार्याच्या
संवेदना लगेच जाणवतात त्याच्या
असतो काहींमध्ये केमिकल लोचा
बघायच्या नाहीत प्रतिक्रिया त्याच्या
माणसं चांगली जोडत रहायची
नको असलेली सोडून द्यायची
आपली आवड आपण जपायची
इंटरनेटच्या प्रवाहात सोडून द्यायची
-श्रीपाद देशपांडे
April 25, 2023
वाणी मधूनी शब्द निघाला, कदर त्याची करीत होते ।
मुखावाटे बाहेर पडे जे, वचन त्याला समजत होते ।।
दिले वचन पालन करण्या, सर्वस्व पणाला लावीत होते ।
प्राणाची लावून बाजी, किंमत शब्दांची करीत होते ।।
स्वप्नामध्ये दिले वचन, हरिश्चंद्र ते पालन करी ।
राज्य गमवूनी सारे आपले, स्मशानी बनला डोंबकरी ।।
प्राण आहूती देई दशरथ, वनी धाडूनी राम प्रभूला ।
पालन केले तेच वचन, रणांगणी दिले जे कैकयीला ।।
आज लोपूनी तेज वाणीचे, तुटले विश्वासाचे नाते ।
बदलूनी जाती क्षणात सारे, घटकेपूर्वीचे शब्द जे होते ।।
मित्र वा आप्त कुणी, आई-बाप वा भाऊ-बहीण ।
स्वार्थीभाव अंगी मुरूनी, पाळीत नाही आपले वचन ।।
अंतर्यामी बसला ईश्वर, जाण त्याची सदैव असावी ।
‘वचन’रूपे व्यक्त होई , हीच भावना मनी ठसावी ।।
डॉ. भगवान नागापूरकर
June 24, 2019
आत्मा-ईश्वर, या शब्दांचा, अर्थ होई आई |
त्या मायेचा, थांग न लागे, इतुकी गहराई ||१||
आईवाचुनी, नसे वेगळा, जगात परमेश्वर |
स्वर्ग आणि सूर्य-चंद्रही, त्यापुढती नश्वर ||२||
सोशी वेदना, झेली यातना, नसे तया गणती |
स्वतः जळुनी, प्रकाशणारी, ऐसी ती पणती ||३||
चिमणचोचिने भरवी बाळा, राही स्वतः उपाशी |
होईल याची, तुलना कैसी, सांगा बरे कुणाशी? ||४||
लिंबलोण ती, नित्य उतारी, निजबाळावरूनी |
कळी काळाला, यम् राजाला, लावी ती परतुनी ||५||
काळीज कातरणारा ऐसा, कारुण्याचा स्वर |
स्वरातुनी या, जणु हाकारी, आई रुपात ईश्वर ||६||
कमलकरांचा, करुनी पाळणा, जोजवी लडीवाळा |
तिला भासते, बाळ तिचा जणु, पंढरीचाच नीळा ||७||
उत्सव कां तो, एक दिनाचा, करे साजरा कुणी ?|
क्षण क्षण सारे, जरी वेचले, तरिही शक्ति उणी ||८ ||
जीवन अवघे जरी अर्पिले, आईच्या चरणाशी |
तरिहि पुर्तता, कधी न होई, ऐश्या आशिषराशी ||९ ||
© कवी : उपेंद्र चिंचोरे
८ मे २०१६
कविता-गझल
May 8, 2016
चाले अवखळ । डोंबार्याचा खेळ । वदनीं कवळ । पडावया ।। तारेवर कुणी । करी कसरत । प्रयत्न अविरत । समतोलाचे ।। उलट सुलट । उड्या माकडांच्या । लोकांचे रंजन । करावया ।। घ्यावया आनंद । चालल्या खेळाचा । आपुले अस्तित्व । विसरावे ।। गर्दीत मिसळावे । गर्दीचेच व्हावे । अवघे विसरावे । देहभान ।।
-- श्री.उदय विनायक भिडे
July 19, 2013
मी सवंगड्यां सोबती राहतो
जीवनी, सुखसागरी डुंबतो
विसरूनिया साऱ्या व्यथ्यांना
वैफल्यातही सुखानंदी जगतो
शैशवी, आठव सारे खट्याळ
मैत्रभावनांच्या स्मृतीत जगतो
मित्र भेटीस, मी आसुसलेला
गळाभेटीच्या प्रतीक्षेत जगतो
जरी हरविले क्षण सारे यौवनी
अंतरी, निज शैशवात जगतो
मित्रांसोबती, नशा यौवनाची
निडर, निवांत तृप्ततेत जगतो
जीवास नाही कुठलीच चिंता
हसुनी, हसवत नित्य जगतो
मी आज उभा, पसरुनीया बाहु
स्वानंदा! मुक्त उधळीत जगतो
-- वि.ग.सातपुते. (भावकवी)
9766544908
रचना क्र. ८१.
१४ - ३ - २०२२.
March 27, 2022
रक्तवर्ण कांती । कटी पितांबर।
नयन सुंदर। तेजोमय।।१।।
ललाटी त्रिशूल। सोनेरी मुकुट।
त्यावरी किरीट। नागेश्वर।।२।।
स्थानापन्न झाली। लंबोदर मूर्ती।
गण अधिपती। वरदात्री।।३।।
पाश अंकुशाचे। दोन कर उभे।
मोदक ही शोभे॥ एक हाती ।।४।।
दुजे हस्ते देतो। फळ आशीर्वाद।
विघ्न निर्विवाद। दूर होई।।५।।
अष्टविनायक। सभा मंडपात।
बसले मध्यात। चतुर्भुज।।६।।
दिव्य भव्य तुच। गणाधीश देवा।
घडवावी सेवा। प्रतिभेने।।७।।
प्रतिभा चौगले यांच्या प्रतिभास या कवितासंग्रहाच्या इ-पुस्तकातील ही कविता.
हे इ-पुस्तक आपण खालील लिंकवर खरेदी करु शकता.
किंमत : रु.८०/-
सवलत किंमत : रु.५०/-
https://marathibooks.com/books/pratibhas-by-pratibha-chougale/
June 11, 2026
मोठ-मोठ्याने आरडत ओरडत, स्वत:शीच बोलत होता
विचार जरी गतिमान होते, विषय तोच तो घोळत होता.....१
तऱ्हेवाईक बघूनी वागणे, खुळा त्याला समजत होते
वेडेपणाचा प्रकार समजूनी, दुर्लक्ष्य त्याजकडे करीत होते...२
वृक्षाखाली बसूनी एकटा, डोळे मिटूनी शांत दिसला
त्याच विषयाचा विचार मनी, चक्र गतीने घोळू लागला...३
बाह्यांगाची बघूनी शांतता, ज्ञानी त्यास समजू लागले
मतप्रदर्शनी तर्क आधार, चुकीचे घेणारे ते ठरले...४
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
November 12, 2015
या कातरल्या क्षणांना,
सय तुझी येते,--
उन्हाची तप्त काहिली,
चटकन् दूर होते,
वारा धुंद वाही,
ढग जाती प्रवासी,
अधूनमधून बिजलीही,
उगा आपुले दर्शन देई,
अशा वेळी आठवे मज,
सोनेरी प्रभेची सांज,
याच समुद्रकिनारी,
वाजली मिलनाची गाज,
नभ सुंदर सोनबावरे,
होते भेटीस साक्षी,
कूजन करीत बागडती,
पक्षी आनंदें वृक्षी,
किनारा दूरवर तटस्थ,
उभ्याने राखी सागराला,
मिलनाची किती उदाहरणे,
ठेवून समोरी चंद्राला,---!!!
या मंतरलेल्या क्षणांना,
आठवे चांदणी उगवती,
प्रेमाखातर सुधाकराच्या,
नशेत त्या नाचती -गाती,
तिच्यावर चढली धुंदी,
आजही मज नीट स्मरे,
इकडे धरणीवर खाली,
कुणी प्रेमवीर गात फिरे,
अशी चांदणी नाचती-गाती,
इथेच त्याला ओढत आणी,
खळाळूंन उत्तेजित होई,
निळ्याशांर लाटांचे पाणी,--!!!!
हिमगौरी कर्वे.©
March 21, 2019
Copyright © 2025 | Marathisrushti