(User Level: User is not logged in.)

कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • मन

    मन कुठे असत, कस ते दिसत
    कधी कळलच नाही कुणा,
    मात्र पावलोपावली जाणवतात,
    त्याच्या अस्तित्वाच्या खुणा !

    मन इतक मोठ,
    कि आभाळ त्यात माईना,
    मनाच्या गाभार्‍यांत
    अगणित भावना !

    कडू-गोड आठवणींचा,
    मन एक खजिना,
    भावनांच्या प्रतिमेचा
    तो सुंदर आईना !

    चिंता-भिती-संशयाचा
    मनी सतत पिंगा
    भल्याबुर्‍या विचारांचा
    तिथे भारी दंगा !

    मन जस कांही
    एखाद हटवादी पोर
    हटकायला जाव तर
    होत बंडखोर !

    पण मन म्हणजे ईश्वर
    मन म्हणजे मैतर
    मन म्हणजे गुरु
    मनांतल्या मनांत सार्‍यांना स्मरु !

    -- सौ.अलका वढावकर

      January 6, 2016


  • कुठल्या वाटेवर या

    कुठल्या वाटेवर या
    पाऊल अलगद पडते
    ही वाट कुठे हरवून
    अनामिक मग होते..
    फुलतील फुलांचे मळे
    फुलपाखरे फुलात बागडे
    गंधित मन होईल अलगद
    सुवास अंतरी मोहक दाटे..
    ही वाट अशी मग चालता
    रमते क्षणभर मन हसरे बावरे
    पाहूनी निसर्ग फुलतील गात्रे
    नयनी साठविते हे फुलांचे ताटवे..
    किती किती मन हरखून जाई
    सुखद क्षण आनंद हृदयात भावे
    मोहरुन जाईल अबोल काया
    चुंबीता फुलास भुंगा कळी ती लाजे
    हरवते या वाटेवर पाऊल माझे
    किती रंगुन जाईल मनाचे धागे
    उरतील पाऊलखुणा या वाटेवरती
    ते धागे असतील धुंद रेशमी लडीचे..
    फुलतील फुले मोहक सारे
    फुलांचे गालिचे अलगद अंथरले
    मन तृषांत अधिर आल्हाद ओथंबले
    फुलात गंधाळून लाजले फुलपाखरे..
    -- स्वाती ठोंबरे.

      November 14, 2021


  • दया प्रेम भाव

    दया प्रेम हे भाव मनी,
    जागृत कर तू भगवंता ।
    तुला जाणण्या कामी येईल,
    हृदयामधली आद्रता ।।१।।

    शुष्क मन हे कुणा न जाणे,
    धगधगणारे राही सदा ।
    शोधत असता ओलावा हा,
    निराश होई अनेकदा ।।२।।

    पाझर फुटण्या प्रेमाचा ,
    भाव लागती एकवटूनी ।
    उचंबळणारे ह्रदय तेथे,
    चटकन येईल मग दाटूनी ।।३।।

    दया प्रेम या भावांमध्ये,
    दडला आहे ईश्वर ।
    मनांत येता हेच भाव ,
    घडवी त्याचे दर्शन ।।४।।

    डॉ. भगवान नागापूरकर
    संपर्क - ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

      March 8, 2016


  • मेघ- गर्वहरण

    अंहकाराचा पेटून वणवा,
    थैमान घातिले त्या मेघांनी ।
    तांडव नृत्यापरि भासली,
    पाऊले त्यांची दाही दिशांनी ।।१।।

    अक्राळ विक्राळ घन दाट,
    नी रंग काळाभोर दिसला ।
    सूर्यालाही लपवित असता,
    गर्वाचा भाव चमकला ।।२।।

    पृथ्वीवरती छाया पसरवूनी,
    चाहूल देई आगमनाची ।
    तोफेसम गडगडाट करूनी,
    चमक दाखवी दिव्यत्वाची ।।३।।

    मानवप्राणी तसेच जीवाणे,
    टक लावती नभाकडे ।
    रूप भयानक बघून सारे,
    कंपीत त्यांची मने धडधडे ।।४।।

    त्याच वेळी वादळ सुटूनी,
    देह घनाचा टाकी विखरूनी ।
    गर्व हरण होऊन जाता,
    अश्रू पडती नयनामधूनी ।।५।।

    डॉ. भगवान नागापूरकर
    संपर्क - ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

      December 8, 2015


  • ती तशी शाळेतली

    ती तशी शाळेतली
    तो ही तसाच
    ती दोघे नेहमी
    बोलताना दिसतात
    संपूर्ण नवखेपण
    जाणवत होते
    त्यांच्या बोलण्यावरून...
    एक दिवशी त्याचा हात
    तिच्या
    हातात आला..
    आणि मग सुरवात झाली..
    नवखेपण जाण्याची ती
    खुण होती......
    त्यानंतर..त्यांनतर
    बरेच काही घडणार होते...
    प्रेमाच्या बाराखडीला
    सुरवात तर झाली....
    पुढे काय झाले....
    तुम्ही विचारणार ना ,
    उत्तर तुमच्याकडेच आहे
    तुमच्या स्वभावात ?
    -- सतीश चाफेकर.

      December 14, 2021


  • सखी मज सांग

    सखी मज सांग, तो राजकुमार कोण,
    उंच सरळ धिप्पाड,
    बघ हाती धनुष्यबाण,--!!!
    सखी मज सांग,
    जमला समूह आगळा,
    हा त्यातला, पण वेगळा,
    रूप देखणे नीलवर्णा,
    आला मजसी विवाह करण्या,--!!

    राजकुमार सगळे जमले, सगळ्यात उठून दिसे हा,
    मज तो शांत वादळ भासे,
    नुसते बघून पुरुषोत्तमा,--!!!

    वाटे मज तो निर्भय निडर,
    जणू शिव शंभूचा अवतार,--
    उठला तो अगदी सत्वर,--
    शिव धनु पेलण्या तत्पर,--!!!

    बघता बघता ते उचलत,
    सर्व येथले """आहा--अचंबित,
    केली सर्वांची मती कुंठित,
    तातही माझे किती चकित,--!!!

    मोडले ते मध्ये काडकन्,
    कोण हा तडफदार तरुण,--?
    नायक बनला समूहातून ,
    का मुनी हासतीअसे गालात,-?

    मघाशी लंकेचा राजा रावण,
    पडता खाली हसले खुदकन,
    तुलना कर बघ दोघांत,--
    सखी वर्णन करून मज सांग,--!!!

    बघ तात किती आनंदित,
    जनकराजे अगदी सद्गदित,
    सखी धडधडते ग माझे हृदय,
    सखी मज सांग,--!!!

    हाच योग्य म्हणती वर,
    लागणार आता स्वयंवर,
    डोळ्यात मावेना त्याची मूर्त, आवडला मज माझा प्रिय,--!!!

    करत पापण्यांची पीट -पीट,
    उभी बघा मी कशी अवगुंठत,
    अशी कशी बघ लाजत बुजत,
    माझीच लागेल भाग्या दृष्ट,--!!!

    सखी मज सांग,--
    ते तर अयोध्येचे राघव,
    बघ संयम अन मार्दव,
    उचंबळत सारे तनमन,
    बघती, हळूच स्मित करत,
    सखे, आता काय करू सांग,--!!!

    हिमगौरी कर्वे.©

      July 23, 2019


  • कृपा तुजवरती

    कृपा होऊनी शारदेची,
    कवित्व तुजला लाभले
    शिक्षणाच्या अभावांतही,
    भावनांचे सामर्थ्य दिसले ।।१।।

    कुणासी म्हणावे ज्ञानी,
    रीत असते निराळी,
    शिक्षणाचा कस लावती,
    सर्व सामान्य मंडळी ।।२।।

    कोठे शिकला ज्ञानोबा,
    तुकोबाचे ज्ञान बघा,
    दार न बघता शाळेचे,
    अपूर्व ज्ञान दिले जगा ।।३।।

    जिव्हेंवरी शारदा,
    जेव्हा वाहते प्रवाही,
    शब्दांची गुंफण होवूनी,
    कवितेचा जन्म होई....४

    भाव शब्दांचा सुगंधी हार,
    माझी अंबिका भवानी
    वाहत रहा आनंदाने,
    यशस्वी होशील जीवनी ।।५।।

    डॉ. भगवान नागापूरकर
    संपर्क - ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

      February 18, 2016


  • भातुकली

    बालपणीची मैत्रीण माझी
    भातुकलीतील ती सवंगडी
    निरागस तो खेळ आगळा
    मी राजा, ती राणी भाबडी ।।

    कितीतरी हा काळ हरवला
    पण आज तीच राणी मनी
    ती दूर, दूर तर मी हा इथे
    आठवण, तिची नित्य मनी ।।

    मला वाटते, भेटावे तिजला
    अन बोलावे सारे गुज मनीचे
    जे घडले ते आता घडुनी गेले
    पुनर्जन्मी! खेळ खेळू मनीचे

    -- वि.ग.सातपुते.(भावकवी)

    9766544908

    रचना क्र. २४.

    २४ - १ - २०२२.

      February 3, 2022


  • शक्य आहे का ते ?

    आज हे आकाश मजला,
    थोटके का भासते ।
    झेप घेण्या पंख फुटतां,
    हाती येईल काय ते ?।।१।।

    उंच हा गिरीराज देखूनी,
    शिखर चढावे वाटते ।
    चार पावले टाकतां क्षणी,
    चढणे सोपे काय ते ? ।।२।।

    अथांग सागर खोल जरी ,
    डूबकी घ्यावी वाटते ।
    जलतरण कला अवगत होता,
    सूर मारणें जमेल कां ते? ।।३।।

    काव्य सरिता वाहत आहे,
    ज्ञान गंगोत्री भासते ।
    केवळ कविता चार रचूनी,
    त्यात डुबणे शक्य कां ते? ।।४।।

    डॉ. भगवान नागापूरकर
    ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

      June 26, 2016


  • आयुष्य वाया घालू नका

    दवडू नका आयुष्य तुम्ही, वेळ घालूनी असा तसा,

    पदरी येई निराशा तुमच्या, गेला क्षण येईल कसा....१,

    मर्यादेतच जीवन असूनी, गतीमान असते बघा,

    स्वत: भोवती केंद्रीत होता, कसे जाणाल इतर जगा....२,

    ईच्छा असते वाया न जावे, आयुष्य सारे विनाकारण,

    हर घडीला विचार असावा, इतरांसाठी असते जीवन....३,

    जेंव्हां तुम्ही सेवा करीता, इतर मनाचे भाव जाणूनी,

    तेच अर्पण होत असते, सारे एकत्र ईश्वर चरणी .....४

    डॉ. भगवान नागापूरकर

    संपर्क - ९००४०७९८५०

    bknagapurkar@gmail.com

      September 12, 2016