जगलो जरी सारे खेळ प्राक्तनाचे
तरी अर्थ जीवनाचा कळला नाही
भाळीचे, भोग भोगले जरी सारे
हव्यास मनीचा अजूनी सरला नाही
जडली नाती, जगता जीवन सारे
गूढ नात्यांचे आजही उकलले नाही
सत्य ! जन्मदात्यांचेच ऋणानुबंध
अन्य रक्ताची नाती कळलीच नाही
सारेच माझे, म्हणता संपला काळ
ओढ प्रीतीची ती जाणवलीच नाही
सांगा, या मनालाच कसे सावरावे
काहूर ! वेदनांचे कधी शमले नाही
जखमा साऱ्याच अजूनही ओल्या
लेप प्रीतचंदनी कुठे भेटलाच नाही
शोधीतो, मीच वाट आत्मसुखाची
रुसली पाऊले, तरी थांबणार नाही
-- वि.ग.सातपुते. (भावकवी)
9766544908
रचना क्र. ४८.
१५ - २ - २०२२.
March 3, 2022
अक्कण ओटा चिक्कण ओटा
अस्सा ओटा सुरेख बाई
ग्रॅनाइटचा असावा
अशा ओट्यावरती बाई
मिक्सर लावावा
अस्सा मिक्सर सुरेख बाई
सुमीतच्या मिक्सरमध्ये
इडली रवा फेटावा
अस्से सुरेख पीठ बाई
फ्रिजमध्ये ठेवावे
अस्सं पीठ थोडं थोडं
इडलीपात्री उकडावं.
अश्शा इडल्या सुरेख बाई
चटणीसवे वाढाव्या
अस्सा बेत सुरेख बाई
कष्टांना वाचवतो
अश्शा पोळ्या द्वाड बाई
टाळाव्या शक्यतो.
October 13, 2018
मित्रराज उगवताना,
सृष्टीवर घडे करामत,
आभाळ उतरे जळात,
त्याचे रूप दिसे पाण्यात,
आरस्पानी निळे सौंदर्य,
नजरा खिळवून ठेवी,
हलते डोलते आभाळ,
पाण्यात प्रतिबिंबित होई,
वृक्षांचे समूह किती,
धरतीवर कोण पेरती,
निळाईत उठून दिसती, पहा,हिरवाईने नटती ,--!!
तमाची शामत नसे, हळूहळू तो नाहीसा होई,
प्रकाशाचे किरण घेऊनी,
दिनकराचा प्रवेश होई,-!
अंधारी बुडालेली सृष्टी,
रंग तिचा बदलून जाई,
कडेकडेने सोनेरी सोनेरी,
पिवळसर उजेडाची घाई-!!
प्रकाशाचा रांजण भरुनी,
सूर्यराज दिमाखात येई,
तांबड्या सोनसळी किरणांची,
आता भाऊगर्दी होई,-!!
डोंगर आपल्या डुलक्या सोडुनी,
हात जोडुनी उभे राहती,
सूर्यसम्राटाचे स्वागत करण्यां,
भालदार चोपदार खडे होती,--!!!
भास्कर जसा उगवतसे,,-
पिवळसर प्रकाश सांडी, धरणीवरचे किरण ते,
करत, दिवसाची नांदी ---!!!
©️ हिमगौरी कर्वे.
March 30, 2020
नव्हतो कधींही कवि वा लेखक कसे घडले कांहीं न कळले
साहित्य सेवेचा गुण मिळूनी काव्य मजला सूचू लागले १
वाङ्मयाविषयी प्रेम होते वडीलांना त्या काळी
अथांग ज्ञान त्यांनी मिळविले पुस्तके वाचूनी सगळी २
खो – खो मधल्या खेळा सारिखे खो देत ते गेले बसूनी
साहित्याची ठेव सोपवूनी मज ते गेले चटकन निघूनी ३
गोंधळून गेलो होतो मनीं नव्हते ज्ञान कांहीं मजला
बरसत असतां त्यांचे ज्ञान छिद्रे होती मज झोळीला ४
कुणीही नसता मार्गदर्शक घडत होते सारे अवचित
चेतना देण्यास मज लागी आशिर्वाद त्यांचा होता सतत ५
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
November 16, 2019
प्रभात झाली रवी उगवला
दाही दिशा उजळल्या
रात्रीचा अंधार जावूनी
नवीन आशा अंकूरल्या १
बरसत आहे सूर्यकिरणे
पृथ्वीच्या भूतली
आनंदाने पुलकित होवून
धरणीमाता शहारली २
निघूनी गेला रात्रीचा गारवा
त्याच्या आगमानाने
उल्हासीत होवून प्राणी जीवन
नाचत राही ऊबेने ३
पुनरपि आता झाले सुरु
चक्र जीवनाचे
मिळवू आज काही तरी
किरण चमकती आशेचे ४
काळोखाची भयाणता
आता गेली निघूनी
प्रकाशाच्या मदतीने
कामास लागती जोमानी ५
-- डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
June 3, 2020
March 10, 2022
June 10, 2010
या वळणावर
खुप हुंदडलो
बहुत बागडलो
मनमानी जगलो
लाडाकोडात वाढलो
*बालपण*
या वळणावर
थोडा शिस्तिचा बडगा
झालो थोडा मी कोडगा
अभ्यासाचा असे तगादा
काय करू आता सांगा
*कौमार्यपण*
या वळणावर
मौज मस्ती व्याख्या बदलली
यौवनाची नशा चढली
स्वतंत्रतेची बाधा जडली
*तारुण्यपण*
या वळणावर
सारी नशा उतरली
लग्नबेडी पायी आली
संसारी खेळी चालली
जबाबदारीने कंबरडे वाकली
*प्रौढपण*
या वळणावर
संपल्या जबाबदाऱ्या
चला करू आता मौजमजा
कसले काय.......
आजारपणात देह गांजला
दवाखान्याची पायरी चढताच खिसा फाटला
*म्हातारपण*
या वळणावर
शिणला हा देह
आधी-व्याधीने
मरणासन्न देहास
वेध लागले मृत्यूचे
धिंडवडे ओल्या देहाचे
*आजारपण*
या वळणावर
-- सौ.माणिक शुरजोशी
नाशिक
November 25, 2019
दरवर्षी आषाढी एकादशी येते आणि वारकरी नेहमीच पायी पंढरीची वारी करतात. त्या वारीत वयोवृद्ध, तरुण, स्त्री/पुरुष, गरीब/श्रीमंत, वारा/पाऊस याची तमा न बाळगता पायकरी पंढरीची वारी करत असतात. कित्येक दशके हे अव्याहत चालू आहे आणि चालू रहाणार. त्यांना कधी दम, कंटाळा किंवा थकवा जाणवत नाही. खरचं सगळ्या वारकर्यांना मनापासून नमस्कार आणि त्यांचे अभिनंदन…!!
June 30, 2012
माऊली मराठीच माझी मायबोली..
ज्ञानयोगीयांची कनवाळू माऊली..
ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या..
स्वसंवेद्या मराठी माझी मायबोली..।।..१
ज्ञानेश्वरी , ही ज्ञानेश्वर माऊलीची..
अभंगगाथा तुकयाची भक्तीरंगली..
भाषाबोध सकल संतसद्गुरूंचा..
माऊली मराठीच माझी मायबोली..।।..२
शब्द मराठीच अस्मिता अंतरीची..
गीता,भागवत,दासबोधादी ग्रंथाली..
अक्षर , अक्षर , साक्षात्कार कृपाळू..
माऊली मराठीच माझी मायबोली..।।..३
माझ्या मराठीचा मला स्वाभिमान..
जगतवंद्य ! ती जगतवंद्य शोभली..
प्राणांहूनही ती श्रेष्ठ आम्हा निरंतर..
माऊली मराठीच माझी मायबोली..।।..४
अती आदरे , मराठी अंतरी जपावी..
मराठी मातृभाषा जी आम्हा लाभली..
मराठी भाषा हा अलंकार वैखरीचा..
माऊली मराठीच माझी मायबोली..।।..५
रचना :- वि.ग.सातपुते. (विगसा)
दिनांक :- २५-२-२०२१
June 1, 2021
Copyright © 2025 | Marathisrushti