(User Level: User is not logged in.)

कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • प्रेमाच्या नावाखाली

     

      November 20, 2013


  • मैत्रसुखदा

    मैत्र एकमेव ऋणानुबंधी नाते

      September 12, 2021


  • पाऊस पहिला वळवाचा !

    चाहूल पहिल्या वळवाची,

    मनात रिमझिम पावसाची,

    घोंग-घोंग वारे व्हायले,

    आकाशाने रंग बदलले !

    पाऊस पहिला वळवाचा,

    मनात साठवून ठेवायचा,

    घन:शाम ढगांना घेऊन आला,

    आठवणींना उजाळा दिला !

    पाऊस पहिला वळवाचा,

    अचानक धो-धो बरसायचा,

    डोंगर दर्यांना खुणवायचा,

    लता वेलींना हसवायचा !

    पाऊस पहिला वळवाचा,

    बच्चे कंपनीच्या आवडीचा,

    कारण शाळेला दांडी मारायचे,

    पावसात मनसोक्त भिजल्याचे !

    पाऊस पहिला वळवाचा,

    आवडता ऋतू प्रेमयुगलांचा,

    चिंब भिजत भटकायचे,

    दु:ख सारे विसरायचे !

    पाऊस पहिला वळवाचा,

    कणसं भाजून खायचा,

    कांदा भजी सोबत,

    वाफाळलेल्या चहा प्यायचा !

    पाऊस पहिला वळवाचा,

    बर्याच वर्ष अनुभवाचा,

    मनात गुदगुदल्या होतांना,

    ते दिवस आठवतांना !

    जगदीश पटवर्धन

      July 4, 2015


  • तवा

    या तव्यावरची भाकरी
    नाही निर्लेपला ऐकायची |
    कारण सरावलेल्या हातांनी
    तीला सवय होती फिरायची ||१||

    ठरावीक ठिकाणी दाबल्यावर
    ती टच्च अशी फुगायची |
    दोनच चिमटीत धरुन
    अलगतशी तुटायची ||२||

    तशीच जीवनाची भाकरी बाई
    तीला लेपनाची गरज नाही |
    कुठे फुगायचे कुठे ओसरायचे
    हे तिच्यावर अवलंबून नाही ||३||

    सराईत हात दिसणार नाहीत
    चिमटीतून कधी सुटणार नाहीत |
    त्यांच्या खोल तव्यामधून
    कोणी बाहेर पडणारच नाही ||४||

      July 27, 2015


  • जागतिक दहशतवादविरोधी दिन

    सामाजिक असंतुलन हे दहशतवादाचे मुळ आहे. सत्तेची हाव, अधिकार नाकारणे, स्वत:च्या फायद्यासाठी दुसज्याला ओलीस ठेवणे, धर्मसत्ता लादणे, जाती भिन्नता, धर्मभेद तसेच समाजातील भिन्न संस्कृतीचे लोक एकमेकांबरोबर आणि एकाच राजकीय छत्राखाली व एकाच न्यायव्यवस्थेखाली राहायला नाखुश असतात. बरेचदा राज्यकर्ते एखाद्या भागाकडे दुर्लक्ष करतात व त्या भागाची प्रगती खुंटते त्यामुळे एकाच देशात आर्थिक भेदभाव निर्माण होतात आणि त्यातून आतंकवादाचा जन्म होतो.

      May 21, 2022


  • मराठी भाषा

     

      February 27, 2014


  • एऽ येश्वदे

    एऽ येश्वदे, एऽ ममद्या, बाप्ये जमवा समदे
    बाया बी गोळा करा समद्या

    मारा समद्यांनला जोरात हाका,
    आन् ती समदी मेंढरं हाका.

    चला आपन बहिनी-भाऊ
    मतदानासाठी जाऊ.

    देऊ त्याला भलामोट्टा आपल्या मतांचा गठ्ठा.
    तो, जो गावीं आल्ता पठ्ठा ज्यानं आपल्या समद्यांनला वाटला हाय पैका.

    - सुभाष स. नाईक

      August 28, 2018


  • आत्म गुरू

    गुरूचा महीमा थोर | उघडूनी जीवनाचे द्वार
    सांगूनी आयुष्याचे सार | मार्ग दाखविती तुम्हां १

    वाटाड्या बनूनी | भटकणे थांबवूनी
    मार्गासी लावूनी | ध्येय दाखवी तुम्हां २

    न कळला ईश | न उमगले आयुष्य
    दु:ख देती जीवन पाश | बिना गुरू मुळे ३

    अंधारातील पाऊल वाट | ठेचाळण्याची शक्यता दाट
    प्रकाशाचा किरण झोत | योग्य रस्ता दाखवी ४

    तैसा गुरू तुमचा | पडदा फाडी अज्ञानाचा
    मार्ग दाखवी जीवनाचा | आनंद मिळण्यासाठी ५

    गुरूविना नाही ज्ञान | दूर करी तुमचे अज्ञान
    ज्ञान ज्योत देई पेटून । तुमच्या ज्ञानदिपाची ६

    ओळखावा आत्माराम | जाणावा ज्ञानराम
    समजावे मनोराम | आपल्या देहातील ७

    गुरू असता देहमंदिरी | कां फिरतोस दारोदारी
    करावी श्रद्धा प्रभूवरी | आत्म गुरूसी जाणोनी ८

    गुरू भेटणे कठीण | जाणील त्यासी कोण
    जवळी तुमच्या असून | कां शोधतासी ९

    तुमचा गुरू अंतर्मनी | महत्व त्याचे जानोणी
    घ्यावे त्यास ओळखूनी । हेची तुमचे यश १०

    जाणावे आत्मज्ञान | करावे स्वचिंतन
    तोच गुरू असून । उद्धारूनी नेई ११

    ज्याचा गुरू त्याचे जवळ | मग का दवडसी वेळ
    शोधण्यास जाई काळ | निरर्थक १२

    आयुष्य आहे थोडे | चित्त द्यावे प्रभूकडे
    जीवनाचे उकलेल कोडे | त्याच्या आशिर्वादे १३

    जीवनाचे मर्म | जाणावे हा धर्म
    त्याचप्रमाणे करावे कर्म | आयुष्य सार्थकी होणेसी १४

    गुरूसी करावे वश | समजोनी त्यास ईश
    घ्यावा त्याचा उपदेश | जीवनाचा १५

    एकदा अंतर गुरू लाभता | उपदेश त्याचा मिळता
    मार्गदर्शन सतत होता | तुमच्या जीवनाचे १६

    श्रेष्ठ गुरू अंतरीचा | परि विवेक पाहीजे मनाचा
    सराव करावा एकाग्रतेचा | उपदेश त्याचा घेण्या १७

    अंतरज्ञान मिळे कठीण | करावे लागते बहुत चिंतन
    श्रद्धा प्रभूवर ठेवून | ध्यान करावे १८

    एकाग्रतेचे चिंतन | लागता प्रभूध्यान
    विचार रहीत करावे मन | प्रकाश पडेल अंतरमनी १९

    आंतरमनातील प्रकाश | चेतना देईल सावकाश
    आनंदी करील आयुष्य | गुरू बनोनी तुमचा २०

    रोज करावे ध्यान | मनी एकाग्र भाव आणून
    जाता बाह्य जगाला विसरून | नियमाने २१

    योगाचे आसते सामर्थ्य | जीवनाचा दाखवी अर्थ
    न जाई प्रयत्न व्यर्थ | विश्वास ठेवावा प्रभूवर २२

    गुरू तुमच्या अंतरी | शोधता त्यासी बाहेरी
    हिच शोकांतिका खरी | तुमच्या जीवनाची २३

    सारे जीवन वाया जाई | जीवन तत्व ध्यानी न येई
    पश्चातापूनी उपयोग नाही | शेवटचे क्षणी २४

    चार दिवसांचे जीवन | सार्थकी लागावे म्हणून
    पाया त्याचा आत्मज्ञान | समजोनी घ्यावा २५

    संशय मनी न यावा | ध्यानयोग सिद्ध करावा
    तोच आपुला गुरू समजावा । अंतरात्मा २६

    गुरू नसतो कुणी व्यक्ती | अंतर्मनातील ती शक्ती
    आत्मा त्यास संबोधती । विद्वान जन २७

    जागृत अंतरात्मा । तोच होय परमात्मा
    श्रम न येई कामा । शोधता देहाबाहेरी २८

    तुमचा गुरू तुमचेपाशी । परी तुम्ही वाट चुकलासी
    जाणोनी घ्यावे गुरूसी । आत्मचिंतनाने २९

    प्रत्येक ती व्यक्ती । तिच्यातील सुप्त शक्ती
    सूचना देत असती । जिवन मार्गाच्या ३०

    जागृती आसवे चित्ती । चेतवावी सुप्त शक्ती
    मार्ग तयांना दिसती । ज्ञान प्रकाशाने ३१

    एकाग्र ज्याचे मन । न होत चुका त्याचे कडून
    संसार सागर जाय पोहून, केव्हांही ३२

    असावा आत्मविश्वास । मिळेल त्यासी यश
    मदत करी ईश । तयांना ३३

    आत्मबल महान । मार्ग त्यासी दिसून
    यश करी संपादून । जीवनाचे ३४

    इच्छा तेथे मार्ग असती । अंतरगुरू मार्ग दाखविती
    श्रद्धा ठेवावी त्याचे वरती । ध्येय गाठण्यासाठी ३५

    आपण चुका करिती । दोष प्रभूसी देती
    नशीबास नावे ठेवती । अज्ञानामुळे ३६

    निर्णयाचे बहूत क्षण । सुख - दु:खे त्यावरी अवलंबून
    जीवन होई कठीण । चूक तुमची घडता ३७

    चूक होते विचारांची । परिस्थिती जाणण्याची
    चाहूल न येती संकटाची । तुम्हांसी ३८

    भावना आणि विचार । यांची मर्यादा असणार
    नियती तिला न कळणार । हाच आहे निसर्ग ३९

    आपण जगतो विचाराने । आपल्यातील भावनेने
    परंतु जगावे आत्मज्ञानाने । हाच यशाचा मार्ग ४०

    आत्म्याचे सामर्थ्य श्रेष्ठ । त्यास कळे इष्ट
    अंश प्रभूचा स्पष्ट । असे तो एक ४१

    म्हणून जाणावे आत्मज्ञान । जावे त्यास शरण
    अंशात्मक परमात्मा समजून । चिंतन करावे त्याचे ४२

    निर्णय कधी न चुकती । जेव्हां तो आत्मा देती
    योग्य निर्णय आनंदती । तुम्हां लागी ४३

    आत्मज्ञान हाचगुरू । सुप्त शक्ती जागृत करू
    निर्णय त्याचे शिरी धरू । हाच करावा संकल्प ४४

    एकाग्र होता मन । लागेल तुमचे ध्यान
    निर्णय तोच देईन । तुमच्यातील सुप्त शक्ती ४५

    प्रसंग येता तुमचे वरी । एकाग्र चित्ती विचारी
    आत्मगुरू निर्णय करी । तुमचे साठी ४६

    आत्म्त्याचा निर्णय । समाधान देय
    चुका न होय । कधीही ४७

    जीवानाचे सार । समजता ईश्वर
    आत्मज्ञान गुरूवर । विश्वास ठेवावा ४८

    आत्मज्ञान गुरू । चिंतन त्याचे करू
    मार्ग तोच धरू | जीवन यशासाठी ४९

    आत्मज्ञान असे महान || घ्यावे समजोन सर्वांनी ५०

    डॉ. भगवान नागापूरकर
    संपर्क - ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

      October 24, 2016


  • आनंदी आनंद गडे !

    इकडे तिकडे चोहिकडे,
    वरती खाली मोद भरे,
    वायुसंगे मोद फिरे,
    नभात भरला, दिशात फिरला, जगात उरला
    मोद विहरतो चोहिकडे । आनंदी आनंद गडे ।

    सूर्यकिरण सोनेरी हे,
    कौमुदि ही हसते आहे,
    खुलवी संध्या प्रेमाने
    आनंदे गाते गाणे
    मेघ रंगले, चित्त दंगले, गान स्फुरले,
    इकडे तिकडे चोहिकडे । आनंदी आनंद गडे ।

    नील नभी नक्षत्र कसे
    डोकाऊनि हे पाहतसे,
    कुणास बघते? मोदाला
    मोद भेटला का त्याला ?
    तमामधें तो सदैव असतो, सुखे विहरतो
    इकडे तिकडे चोहींकडे ! आनंदी आनंद गडे !

    वाहति निर्झर मंदगती,
    डोलति लतिका वृक्षतती.
    पक्षी मनोहर कूजित रे
    कोणाला गातात बरे?
    कमळ विकसले, भ्रमर गुंगले, डोलत वदले
    इकडे तिकडे चोहिकडे ! आनंदी आनंद गडे !

    स्वार्थाच्या बाजारात
    किती पामरे रडतात,
    त्यांना मोद कसा मिळतो ?
    सोडुनि स्वार्था तो जातो
    द्वेष संपला, मत्सर गेला, आता उरला
    इकडे तिकडे चोहीकडे ! आनंदी आनंद गडे !

      June 16, 2026


  • लेक चालली सासरी

    लेक चालली सासरी,
    डोळ्यांच्या कडा पाणावल्या,
    आज निघाली आपल्या घरी,
    तिच्याही पापण्या ओलावल्या,--!!

    काळीज तिचे धपापे,
    अंतर्नाद ऐकू येती,
    उलघालीचे स्वर बोलके,
    थेट कानास बघा भिडती,--!!!

    बदलले जीवन सारे,
    मांडेल नवीन संसारा,
    मने आमुची कृतार्थ झाली,
    लेक निघता त्या घरा,--!!!

    जावई समजूतदार ते,
    सासू सासरे सूज्ञ असती,
    लेकी सुनांनी घर भरले,
    एकत्र कुटुंब म्हटल्यावरती,--!!!

    माणूस म्हटल्यावर तो चुके, सांभाळून घ्या हो सर्वांनी,
    आई बापाचे मन झुरते,
    एवढी ऐकावी विनवणी,--!!!

    लाडकी सगळ्यांची असे,
    तिचे कौतुकच आमच्या घरी, कोवळे वय आहे तिचे,
    सारखी आम्हा वाटे काळजी,--!!

    अनुभव नसल्यावर कसले, निभावेल कशी सासरी,--??
    भिजून पुन्हा पुन्हा आमचे डोळे, तिची पाठराखण मन करी,--!!!

    आई बाप आता तुझे,
    सासू-सासरे केवळ नसती,
    या घरात तुम्ही पाहुणे,
    रिवाज सामाजिक आजमिती,--!

    हिमगौरी कर्वे©

      October 21, 2019