हृदय अर्पिले तुला

हृदय अर्पिले तुला,गजानना वाट दाखव मला,
*वेदना यातनांचा,
उठतो कल्लोळ,
शरीर आणि आत्मा,
नच कुठे मेळ*,
काया वाचा मने,
स्मरते रे तुला,
गजानना वाट दाखव मला,--!||१||

विघ्नहर्ता असशी तू ,
जागृत किती देवता,
हाक तुज मारता,
मदतीस धावतोस भक्ता, हृदयापासून करत अर्चना,
विनविते मी तुला,
गजानना वाट दाखव मला,--!||२||

रक्तवर्णी त्या सर्व पुष्पी,
अर्पिते मी तुझ्या चरणी,
दुर्वांकुररुपी मनोकामना,
साऱ्या समर्पित तुला,
गजानना वाट दाखव मला,--!||३||

निबिड या संसारण्यी,
आले भटकत, भटकत, ---
घायाळ मी जखमी,---
मनपाखरू भिरभिर करत,
आले दारी कृपा मागत,
तूच आता माय बाप मला,--!
गजानना वाट दाखव मला,--||४||

© हिमगौरी कर्वे



हृदय अर्पिले तुला,गजानना वाट दाखव मला,
*वेदना यातनांचा,
उठतो कल्लोळ,
शरीर आणि आत्मा,
नच कुठे मेळ*,
काया वाचा मने,
स्मरते रे तुला,
गजानना वाट दाखव मला,–!||१||

विघ्नहर्ता असशी तू ,
जागृत किती देवता,
हाक तुज मारता,
मदतीस धावतोस भक्ता, हृदयापासून करत अर्चना,
विनविते मी तुला,
गजानना वाट दाखव मला,–!||२||

रक्तवर्णी त्या सर्व पुष्पी,
अर्पिते मी तुझ्या चरणी,
दुर्वांकुररुपी मनोकामना,
साऱ्या समर्पित तुला,
गजानना वाट दाखव मला,–!||३||

निबिड या संसारण्यी,
आले भटकत, भटकत, —
घायाळ मी जखमी,—
मनपाखरू भिरभिर करत,
आले दारी कृपा मागत,
तूच आता माय बाप मला,–!
गजानना वाट दाखव मला,–||४||

© हिमगौरी कर्वे

Author