(User Level: User is not logged in.)

कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • जन्म मानवाचा

    जीवन, जगण्यासाठी
    जीव, आतुरलेला आहे

    जन्म! हा मानवाचा
    विवेकी जगायचाआहे

    ऋतूऋतूंचे आविष्कार
    निसर्गाचे वरदान आहे

    नाती सारी ऋणानुबंधी
    भावप्रिती! साक्ष आहे

    अंतरी लळा जिव्हाळा
    प्रारब्धाचे वरदान आहे

    शिरी आभाळ नक्षत्रांचे
    मनस्वी सुखशांती आहे

    निर्मोही स्पर्श भावनांचे
    स्वर्गसुखाची नांदी आहे

    जगता जगता जगवावे
    मानवी नितीमुल्य आहे

    येताजाता रिक्त ओंजळी
    अंतिम नग्न सत्य आहे

    सदा भजावे अनामिका
    तो कृपाळू तारणार आहे

    -- वि.ग.सातपुते.(भावकवी)

    9766544908

    रचना क्र.१३६

    २१ - १० - २०२१.

      October 22, 2021


  • शिळा झालोल्या अहिल्या

    आजही बऱ्याच अहिल्या पडल्या शिळा होऊनी

    कांहीं पडल्या वाटेवरी कांही गेल्या उद्धरुनी ।।१

    कित्येक होती अत्याचार अबला स्त्रीयांवरी

    उध्वस्त करुनी जीवन शिळा त्यांची करी ।।२

    काय करील ती अबला डाग पडता शिलावरी

    दगड होऊनी भावनेचा फेकला जातो रस्त्यावरी ।।३

    भेट होता तिची अवचित् कुण्या एखाद्या रामाची

    शब्द मिळता सहाऱ्याचे अंकुरे फुटती आशांची ।।४

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

      February 9, 2020


  • गावाचं घर

    मराठी कविता

      July 24, 2011


  • किनारा

    चल सखये,जरा विसावू नदी किनारी
    बघ आठवांचा खोल डोह या किनारी
    गुणगुणते तृप्त प्रीती इथे मनहृदयीची
    साक्षी! नयनरम्य दीपमाळ ही किनारी।।१।।

    वाळुत झऱ्याझऱ्यातुन उमले प्रिती
    ओसंडिते गं पावन गंगेच्या किनारी
    ओढ निरंतर, सारितेला मिलनाची
    चल सखये, जरा विसावू या किनारी।।२।।

    मिठीत घेवू, त्या साऱ्या गतस्मृतींना
    भावगंधल्या सुखदुःखांच्याच किनारी
    रूप,जीवनाचे प्रीतरंगलेले हृदयस्पर्शी
    चल न्याहळू त्या निरव शांत किनारी।।३।।

    दरवळ! प्रितीचा बघ गगनी गंधला
    इंद्रधनुचे प्रतिबिंब, तरंगते किनारी
    भावासक्त! प्रीती दैवी जन्मांतरीची
    अखंड वाहते गं बघ या गंगाकिनारी।।४।।

    -- वि.ग.सातपुते.(भावकवी)

    9766544908

    रचना क्र. १२८

    २ - १० - २०२१.

      October 8, 2021


  • एक होती शाळा

    एक होती शाळा
    शाळेत होता फळा
    फळ्यासमोर मुले बसत
    असेच रोज वर्ग भरत

    शाळेचे एक होते मैदान
    चाले तिथे रोज घमासान
    खेळांचे मग डाव भरत
    दिवसा मागून दिवस सरत

    बुद्धी आणि व्यायाम यांची होती गट्टी
    रविवारी मात्र , त्यांना असे सुट्टी

    आता कसली शाळा
    आणि कसले मैदान
    कोरोना च्या धाका पाई
    मुले झालीत हैराण

    हात धु , मास्क घाल, हेच रोज ऐकू येतं
    अन मोबाईल हाती घेऊन, युद्ध त्यांचे सुरू होतं.

    -- भैय्यानंद वसंत बागुल.

      January 21, 2022


  • रात्र

    रात्र वाढत चाललीय
    हळूहळू बाहेरचे आवाज एकेक कमी होतील
    काही कर्कश्श, काही गुणगुणते, काही सवयीचे,
    मग वाढतील आवाज किर्रर्र रातकिड्यांचे
    लांब कुठेतरी घुमणाऱ्या घूत्काराचे
    हळूहळू सगळे बाहेरचे आवाज थांबतील... निशब्द
    मग सुरु होतील आतले मनाचे आवाज, त्याचे दबके शब्द
    दिवसाच्या कोलाहलात गर्दीत विरलेले
    गुदमरून आत आत कोंडलेले, सारे काहीं वाहत जाते
    विचारांची एकच झुंबड गर्दी होते
    त्याची गती अशी कि ध्वनीलाही मागे फेकते
    क्षणात इथे क्षणात तिथे, सप्त पातळ फिरून येते
    काही मागचे, काही पुढचे गोफ गुंफत रात्र जाते
    मिटतात, थकतात पापण्या अलगद
    अन रात्र सारी मिटून जाते...
    -- वर्षा कदम.

      November 20, 2021


  • एकदा कवेत घे

    एकदा कवेत घे,
    संपवून सारा अबोला,
    जीव तुझ्यासाठी राजा,
    बघ, कसानुसा झाला,--!!!
    स्पर्श तुझा होता सखयां,
    सर्व दु:खे नमून जातील,
    अडचणींचे डोंगर सारे,
    क्षणार्धात ते वितळतील,
    बाहूंत तुझ्या वेड्या जिवां,
    कधी मिळेल रे आसरां,--!!!!
    ओढ वाटे सारखीच,
    छळते मज रात्रंदिवसा,
    तू येतां, जवळी परंतू,
    मिठीत घेते आभाळां,--!!!
    प्रितीच्या रंगी रंगता,
    तुझ्याच रंगात रंगते,
    होऊन वेडिपिशी कशी,
    हात नकळत देते हातां,--!!!
    माझी मी नसते,
    तुझ्याबरोबरी असतां,
    भानही हरपून जाते,
    तव समीप राहतां,--!!!
    रंगतदार तुझी साथ,
    मोह तिचा माझ्या जिवां,
    परोपरीने वाट पाहते,
    उन्हात थंडगार विसावा,--!!!!

    हिमगौरी कर्वे

      March 7, 2019


  • वैभव शब्दांचे

    मी मनामना जोडित राहिलो..
    मी माणसा माणसात राहिलो...

    नाही कधीच क्षणभर थांबलो
    नाही कुणास बोचलो टोचलो...

    जग सारे मायबाप बंधुभगिनी
    समजुनी जगती जगत राहिलो...

    काय मिळविले, काय हरविले
    या विचारात न मी कधी गुंतलो...

    देणे घेणे हिशेब सारे संचिताचे
    असे समजुनी समाधानी राहिलो...

    वैभव! शाब्दिक प्रेमभावनांचे
    मीच सदोदित मिरवित राहिलो...

    तळहातांच्या ठळक रेषामधुनी
    मीच मन:शांती शोधित राहिलो...

    -- वि.ग.सातपुते. (भावकवी)

    9766544908

    रचना क्र. २३८

    १७ /९/२०२२

      September 22, 2022


  • प्रेमस्पर्ष

    मुरलीधरा वाजीव रे मुरली
    जीवसृष्टी सारी आसुसलेली...

    सुर वेणुचे दशदिशा उजळती
    खगगण, मंजुळ स्वरे गाती...

    गोकुळीची जित्राबे गोधूली
    तुझ्याच ओढ़ी हंबरत येती...

    झुळझुळती मोदे वृक्षवल्ली
    मीरा, राधा भक्तिगीत गाती...

    स्वर तव मुरलीचे मनोहारी
    प्रेमस्पर्शे जीवास जगविती

    -- वि.ग.सातपुते. (भावकवी)

    (9766544908)

    रचना क्र. २८०

    २/११/२०२२

      November 9, 2022


  • काव्यातील गुरु

    एकलव्यापरीं शिकलो विद्या, गुरुद्रोणा विणा ।

    काव्यामधल्या जाणून घेतल्या, साऱ्या खाणाखुणा ।। १

    शोधू लागलो प्रथम गुरुला, पद्य रचनेसाठीं ।

    कुणी न शिकवी कला श्रेष्ठ ही, राहून माझे पाठी ।। २

    उठत होती भाव तरंगे, अन आकाशी भिडती ।

    शब्दांनी परि पकड न येता, निष्टूनी ती जाती ।। ३

    मार्गदर्शक तो भेटत नाही, खंत लागे मना आता ।

    व्याकूळ झाला जीव बघूनी, मनाची ही दुर्बलता ।। ४

    गोविंदाग्रज नि केशवसूत, आणिक ग.दि.मा. ।

    तांबे- बोरकर- यशवंत, सर्वजण आले कामा ।। ५

    ग्रंथ तयांचे सारे जमवूनीं, एकत्र ठेवियले ।

    शब्द भावना यांची सांगड, मन करुं लागले ।। ५

    द्रोण मुर्तिपरी भासूं लागली, त्यांची ग्रंथ संपदा ।

    काव्यामधली स्फूर्ति मिळूनी, आनंदी झालो सदा ।। ६

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

      January 25, 2021