फळ आज हे मधूर भासते, तपोबलातील अर्क असे ।
कष्ट सोसले शरिर मनानें, चिज तयाचे झाले दिसे.....१
बसत होतो सांज सकाळी, व्यवसाय करण्या नियमाने ।
यश ना पडले पदरी. केव्हा मान फिरविता नशीबाने....२
निराश मन सदैव राहूनी, मनीं भावना लहरी उठती ।
शब्दांना आकार देवूनी, लेखणी मधूनी वाहू लागती....३
लिहीता असता भाव बदलले, त्यात गुरफटलो पुरता ।
छंद लागूनी नशाच चढली, जीवनामधील रंग बघता...४
त्या रंगाच्या छटा उमटल्या, फुला फुलातूनी दिसूनी येती ।
सप्त रंगाचे मिलन दिसले, आकाशाच्या क्षीतीजावरती....५
काव्यावरती जगेल कोण, हवी भाकरी जगण्यासाठी ।
मानहानी ती सदैव होई, केवळ अल्पशा पैशापोटी....६
मदत कुणाची मिळत होती, आला दिवस जाई निघूनी ।
काव्यातील आनंदात परि, डुबता सारे विसरूनी.... ७
विवंचना आणि सुख दु:खे, बनली होती स्फुर्ती देवता ।
अनुभवले जे जे आजवरी, चित्रीत झाले बनूनी कविता....८
अनुभव होता तना मनाचा, म्हणूनी भासले सत्य काव्य ते ।
उचलून घेतले जनसामान्यांनी, मनास त्यांच्या पटले होते....९
लपली असती कला एक ती, सर्व जणांच्या अंतरंगी ।
परिस्थितीशी झगडा देवूनी, बाहेर आणती कुणी प्रसंगी....१०
गेलो विसरूनी उदास दिन , आज उमटले चित्र निराळे ।
सरस्वती नि लक्ष्मी दोघी, आशीर्वाद त्यांचा मिळे.... ११
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
November 22, 2017
माझे मन तुझे झाले
नवनितावणी होते झाले !
बंध रेशमाचे त्यास
मुलायम तंतूने विणलेले !
तुझ्या टपोऱ्या डोळ्यात
मन माझे तुंतत जातं,
वटारल्या डोळ्याने
परत ते भानावर येतं !
माझ्या मनातील घालमेल
तुझ्याही मनात होत होती!
काय सांगावे किती सांगावे
तुझ्या मुक्या संमतीने, मानाने सोडले मौन,
बोलता तुझ्याशी एकरूप झाले केव्हा मन !
स्पर्शाने बऱ्याच गोष्टी नकळत कळतात,
आहे मनात हळुवार प्रेमातील स्पर्शज्ञान !
जगदीश पटवर्धन
September 20, 2017
बलात्काराच्या बातम्या वाचल्या की लाज वाटते ...
आपण पुरुष असल्याची...
त्या षंढांमुळे पुरुष बदनाम होतो...
प्रत्येक पुरुष स्त्रियांच्या नजरेत दोषी दिसतो...
प्रत्येक पुरुष लबाड असतो पण षंढ नसतो...
तिच्या रक्षणासाठी कित्येकदा तो आपल्या प्रणाचीही बाजी लावतो...
ती मिळविण्यासाठी असतानाही तिला मिळविण्याचा प्रयत्न करतो...
तिला पाहून पुरुष उत्तेजित होतही असेल पण बेभान होतोच असे नाही...
पुरुषाच्या मिठीत स्त्री सुरक्षित असते पण स्त्रीच्या मिठीत पुरुष सुरक्षित असतोच असे नाही...
पुरुषांतला पुरुष नाही तर षंढ बलात्कार करतो पण बदनाम मात्र पुरुष होतो...
स्त्रियांच्या नजरेत आज प्रत्येक पुरुष बलात्कारी दिसतो...
स्त्रीला पुरुषाचा चुकून झालेला स्पर्श ही तिला तिच्यावरील बलात्कार वाटतो...
या षंढांमुळेच स्त्रियांना पुरुष फक्त पुरुष नसतो तो बाप, नवरा, मुलगा, भाऊ ही असतो याचाही विसर पडतो...
प्रत्येक पुरुष षंढ नसतानाही या बलात्कारी षंढांमुळे आज प्रत्येक पुरुष उगाच बदनाम होतो...
कवी- निलेश बामणे
June 3, 2017
उत्साहाने करित होता, सारे कांहीं इतरांसाठी
क्षीण होवूनी जाता शरीर, आधार तयाला झाली काठी...१,
धनाचा तो प्रवाह वाहतां, गंगाजळीचे पाणी पाजले
दुजाकरिता त्याग करूनी, समाधानी ते इतरा केले....२,
धन संपत्तीचे झरे आटतां, प्रेमळपणाचे शब्द राहीले
कालक्रमणाच्या ओघामधल्या, दुर्बलतेस कुणी न जाणले...३,
अपेक्षा ती सदैव असते, मिळत रहावा सहयोग
अवमूल्यन ते केले जाते, दुर्लक्ष करूनी दुर्बल अंग...४
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
April 16, 2019
प्रसवते रोज कविता
कां कशी कोण जाणे...
मीही, होतो संभ्रमित
कसे जमते व्यक्त होणे...
मन हे चंचल पाखरू
त्याचेच कां फडफडणे...
अंतरी काहूर कल्लोळ
भावनांचेच ते प्रसवणे...
मीच शब्दातुनी मांडतो
अव्यक्ताला सहजपणे...
आज हा छंद जीवाला
रिझवितो, हळुवारपणे...
आनंद हा एक आगळा
सहजसुकर होते जगणे...
रचना क्र. ५९
२७/६/२०२३
-वि.ग.सातपुते. (भावकवी)
9766544908
July 31, 2023
ध्यानाने काय साधले
ऐका सगळे लक्ष्य देऊनी
हेच साधले ध्यान लावूनी ।।धृ।।
संसारांत रमलो मोहांत गुंतलो
सुख दुःखात अडकलो
उकलोनी जीवन कोडे समर्पित झालो प्रभू चरणीं ।।१।।
जाई पैशाच्या पाठीं देह सुखासाठीं
समाधानापोटीं
धडपडीतील चुक दिली दाखवूनीं ।।२।।
धानाची समज उपदेशिला मज
ऐक मनाचा आवाज
तोड सर्व विचार चित्त एकाग्र करुनी ।।३।।
एकाग्रतेची स्थिति ही ध्यानाची शक्ति
समाधान मिळविती
शांत करी मन देई चंचला घालवुनी ।।४।।
सुख दुःखाची जाण तीव्रता कमी करुन
देऊनी तर्क ज्ञान
करी मनाची समज वाढवूनी ।।५।।
-- डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
February 2, 2019
ज्योतिष्याची चढूनी पायरी,
जन्म कुंडली दाखवी त्याला ।
अडले घोडे नशिबाचे,
कोणते अनिष्ट ग्रह राशीला ।।
नशिबाची चौकट जाणूनी,
आशा त्याची द्विगुणित झाली ।
मनांत येतां खात्रीं यशाची,
जीव तोडूनी प्रयत्ने केली ।।
प्रयत्नांती असतो ईश्वर,
म्हणूनी मिळाले यश त्याला ।
आत्मविश्वास जागृत करण्या,
'भविष्य' शब्द कामी आला ।।
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
October 22, 2016
कावळ्याचे नवे फेसबुक
भलतेच आले बघा रंगात
रोजरोज न जाता शाळेत
शिका म्हणे नेटच्या घरात
कोल्होबाचे व्हॉट्सऍप
करते करामती भारी
जंगलातील बित्तंबातमी
येते लगेच स्क्रीनवरी
सिंहाचे यूट्यूब चॅनल
सबस्क्राईब करा म्हणे
जंगली कविता म्हणतो
लाईक्स वाढवा म्हणे
सारा सोशल मिडिया
जंगलात शिरला आहे
म्हातारीचा मोबाईल
वाघानंं पळवला आहे!
जंगलातील शांतता
मोबाईलने भंगली
कोल्हेकुई,डरकाळी
नेटवर्कने थांबली!
-- विठ्ठल जाधव
शिरूरकासार जि.बीड
सं. ९४२१४४२९९५
November 22, 2018
खेळत होता बाळ अंगणीं इकडूनी तिकडे
मेघनृत्य ते बघत असतां दृष्टी लागे नभाकडे
उलटी सुलटी कशी पाऊले घनांची पडत होत
लय लागून हास्य चमकले त्याच्या मुखावरती
तोच अचानक गडगडाट झाला एक नभांत
दचकून गेले बाळ तत्क्षणी होऊन भयभीत
धावत जावून घरामध्यें आईला बिलगले
वाचविण्या त्या भीतीपासून पदराखालीं दडले
जरी थांबला गडगडाट भीती कायम होती
आवाजाचे नाद अद्यपि कानीं त्याच्या घुमती
भीतीने नजिक चिकटला आईच्या जवळीं
धडकन ऐकूं आली त्याला पुनरपि त्यावेळीं
गडगड धडधड आवाजाचा धसका घेवूनी मनीं
तोंड लपविले हळूंच जाऊन गादीमध्यें त्यानी
पिच्छा न सोडी आवाज अजूनी बसली ज्याची भिती
श्वास वाढूनी, स्वह्रदयाची धडकन होती ती
तगमग बघूनी बाळाची ती थोपटे मांडीवर आई
निद्रेच्या तो अधीन झाला ऐकून मधूर अंगाई
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
October 13, 2019
प्रदीप निफाडकरांची गझल
April 17, 2010
Copyright © 2025 | Marathisrushti