(User Level: User is not logged in.)

कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • मानवतेचा वसा

    झाले गेले सारे विसरूनी जावे
    व्हायचे ते ते सारे होतची असते

    क्षणाचा कां कधी असे भरोसा
    जगणे पूर्वप्राक्तनी कर्मची असते

    जन्म! देणे घेणे भोग प्रारब्धाचे
    पूर्वसंचित भाळीचे जगणे असते

    युगायुगांतुनी लाभे जन्म मानवी
    त्यावर केवळ सत्ता ईश्वरी असते

    कठपुतलीपरी हे जीवन मानवी
    दोरी अनामिकाच्या हाती असते

    किल्मीषे मनातील दूर सारिता
    अंतरी मन:शांती सुखवित असते

    मानवास अपूर्व वसा मानवतेचा
    विवेकी जीवनाची सांगता असते

    -- वि.ग.सातपुते (भावकवी)

    9766544908

    रचना क्र. २९२

    १५/११/२०२२

      November 20, 2022


  • सुन्न एकांत

    सजलेले घर हे सुंदर
    सजलेल्या चारभिंती
    सुन्न सारे, मनही सुन्न
    एकांती बोलती भिंती ।।१।।
    नाही, काही उणे इथे
    दरवळ सारा सुखांती
    तरी, जीव घुसमटतो
    शांतता पोखरते भिंती ।।२।।
    जीव सुखे जरी नांदतो
    मन, शोधिते विश्रांती
    व्याकुळ हा जीव सारा
    याचितो नित्य मन:शांती ।।३।।
    जगण्याची एक स्पर्धा
    अविश्रांत चाले जगती
    सौख्याचीच सारी नशा
    उद्विग्न आज चारभिंती ।।४।।
    स्पंदने आज सरावलेली
    साशंक, जगी भावप्रीती
    खुंटलेली ओढ नात्यांची
    एकांती मुसमुसती भिंती ।।५।।
    -- वि.ग.सातपुते.(भावकवी)
    9766544908
    रचना क्र. ७१.
    ५ - ३ - २०२२.

      March 21, 2022


  • आमची राजहंसी जोडी

    आमची *राजहंसी जोडी,
    फिरते मस्त या तलावी,
    डौलदार माझा राजा,
    लोक आम्हा पाहत राहती,--!!

    सौंदर्य आमुचे राजसबाळे,
    मुखडे तर किती देखणे,
    आम्हा पाहण्या होड चाले,
    नेहमीच या तलावाकाठी,--!!!

    डुबुक डुबुक पाण्यामध्ये,
    आम्ही विहरतो शानदार,
    रंग शुभ्र लोभसवाणे
    आकर्षित लोक इथे फार,--!!!

    पर' फैलावीत, सूर मारत,
    सुळकन् पाण्यात जातो दिमाखदार जोड पाहुनी,
    कुणी प्रवासी थक्क होतो,--!!!

    लाटांच्या सिंहासनीकसे
    झोकदार,आम्ही बसतो, वरखाली हालती त्या,
    किती ऐटदार बघा दिसतो,--!!!

    आम्हां न लागते रंगरंगोटी,
    तुम्हा नकली माणसांगत,
    नैसर्गिक सौंदर्य आमचे,
    कित्येक वाखाणती अव्याहत,--!!!

    अप्राप्यही लौकीकाला, स्वर्गीय आमची जात,
    राजबिंडे लावण्य का,
    कधी येते सामान्यात,--!!!

    तेजस्वी आमची काया,
    पाहण्यास खूप तरसती,
    कुणास ठाऊक किती आम्हा,
    कसे केव्हा पाण्यात पाहती,-!?

    पाण्यातील प्रतिमा आम्हा,
    उगाच पहा खुणावतसे,
    वाटून खालील दोघांचा हेवा,
    मन आंत डचमळतसे*,---!!!

    हिमगौरी कर्वे.©

      May 16, 2019


  • देह समजा सोय

    जेव्हां मी म्हणतो माझे, सोय माझी असते त्यांत,

    देह जगविण्या कामीं, प्रयत्न हे सारे होतात....१,

    देह वाटते साधन, प्रभूकडे त्या जाण्याचे,

    त्यासी ठेवतां चांगले, होते चिंतन तयाचे.....२

    भजन करा प्रभूचे, सूख देवूनी देहाला

    परि केवळ सुखासाठीं, विसरूं नका हो त्याला......३,

    देह चांगला म्हणजे, ऐश आरामीं नसावे,

    ती एक सोय असूनी, त्यांने प्रभू मिळवावे.....४

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

    bknagapurkar@gmail.com

      September 18, 2018


  • गणपतीचे मनोगत

    टिळक तुम्ही फिरुन एकवार
    या हो जन्म घेऊन
    हव तर ब्रम्हदेवाकडे शिफारस तुमची
    मी देतो पाठवून

    किती उदात्त हेतूने गणेशोत्सव
    तुम्ही केला होतात सुरु
    पण हल्ली त्याच स्वरुप पाहून
    मीच लागलोय गुदमरु

    मोठया आतुरतेने मी वाट पाहायचो
    भाद्रपदातल्या चतुर्थीची
    वाट आता पाहावी लागते
    अनंत चतुर्दशीची

    काय सांगू टिळक तुम्हांला?
    संयोजकांनी मलाही केलय कार्पोरेट
    उत्सवांत माझ्या दर्शनाचे
    चढते झालेत रेट

    गल्लोगल्ली स्थापना माझी
    मंडपी बेगडी आरास,
    सोन-चांदी अंगावरती
    पुढयांत धनाची रास

    बुध्दीदायक मी खर तर
    बुध्दी देणेच माझ्या हाती,
    इथल्या मागण्या नवस ऐकून
    माझी कुंठीत झालेय हो मती

    टिळक ह्यावर कळस म्हणजे
    उत्सवांत खंडणीची वर्गणीरुपी दहशत
    वर चोवीस तास माझ्या भोवती
    पोलिसांची वसाहत

    असली जीवघेणी भक्ती
    नाही हो आता सोसवत,
    विसर्जनाच्या मिरवणुकीतला
    उन्माद नाही बघवत

    म्हणून तर म्हणतोय टिळक तुम्हीं
    घ्यावा अवतार फिरुन
    अन् समाजकारण हाती घेऊन
    हे बाजारीकरण टाका संपवून
    उत्सवातल राजकारण टाका चिरडून
    टिळक तुम्ही या हो
    जन्म घेऊन, या हो जन्म घेऊन

    -- सौ. अलका वढावकर

      January 16, 2016


  • मी विलीन झालो

    पांडुरंग रंगीं रंगुन नामामृता प्यालो

    पांडुरंग अंतरंगीं, मी विलीन झालो ।।

    द्वैत आणि अद्वैतातिल फरक मज कळेना

    निर्गुण-सगुणातिल मजला भेद आकळेना

    तरी परब्रह्म दिसलें, धन्य धन्य झालो ।।

    नकळतांच हृदयीं मोठा चमत्कार झाला

    निमिषातच माझा सारा मीपणा गळाला

    चिंता-भय मिटले सारे, अंतरीं निवालो ।।

    मावळतां ‘मी’, उरला गर्व ना ज़राही

    वंदत वा निंदत कोणी, भान मुळी नाहीं

    पांघरून विठ्ठलशेला, अनासक्ति ल्यालो ।।

    गहिवरलो पाहुनिया तो पंढरिचा नाथ

    चरण स्पर्शतां मी, उठवी घरूनिया हात

    देहभान विरलें, त्याच्यासंगतीं निघालो ।।

    -- सुभाष स. नाईक

    पंढरीचा राणा

      July 3, 2017


  • नशीब

    का असा धांवतोस तूं ,

    नशिबाच्या मागें मागें,

    यत्न होता भगिरथी,

    नशीब येईल संगे ।।१।।

    प्रयत्न होतां जोमाने,

    दिशा दिसताती तेथें,

    यशाचे ध्येय सदैव,

    योग्य मार्गानें मिळते ।।२।।

    प्रयत्न करूनी बघा,

    ईश्वर देखील मिळेल,

    इच्छा शक्ती प्रभावानें,

    नशीबही बदलेल ।।३।।

    -- डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

      December 9, 2020


  • जपमाळ कशास हवी, सखये ? (स्मृतिकाव्य )

    जपमाळ कशास हवी, सखये ? न हवे रुद्राक्षमणी, सखये
    जप करतो आहे तुझाच, माळेविणाच मी सखये ।।

    ईशप्राप्तिसाठी ऋषीमुनी जपतप करती खूप
    ऋषी न मी, करि तुजसाठी जपतप परी, सखये ।।

    जप केल्यानें प्रसन्न होउन, देई दर्शन देव
    तुझ्या दर्शना मी आतुर, देशील कधी, सखये ?

    उघड्या नेत्रीं वसतें कायम तुझेंच रूप, प्रिये
    जपात, मिटल्या नयनां दिसते मूर्ति तुझी, सखये ।।

    ओढुनही जपमाळ, न येणें मरणाचें थांबे
    माळेवाचुन ना अडलें स्मरणाचेंही सखये ।।

    जप करि मी, तूं ‘ज़प’ म्हणशी, पण तुजविण काय ज़पूं ?
    ‘जीवन झपझप संपो’ , एकच आस मनीं, सखये ।।
    ११.०७.२०१६

    - सुभाष स. नाईक. Subhash S. Naik
    सांताक्रुझ (प), मुंबई. Santacruz (W), Mumbai.
    Ph-Res-(91)-(22)-26105365. M – (91)-9869002126
    eMail : vistainfin@yahoo.co.in
    Website : www.subhashsnaik.com / www.snehalatanaik.com

      July 16, 2016


  • नव्या श्वासांची सुरुवात

    उगवत्या सूर्याच्या कुशीत,
    नवं वर्ष अलगद जागं होतं।
    मनाच्या शांत अंगणात,
    आशेचं एक फुल उमलतं॥

    दारी उभी गुढी निरभ्र,
    आकाशाशी बोलत राहते।
    "जगणं म्हणजे पुढे जाणं",
    हळुवार सांगत राहते॥

    कडू-गोड त्या नीम-गुळात,
    जीवनाचं गूढ दडलंय।
    हसत-रडत, पडत-उठत,
    सुखाचं बीज रुजलेलंय॥

    वाऱ्यावरती सणाची चाहूल,
    घराघरात शांत आनंद।
    साध्या क्षणातही सापडतो,
    मनात दरवळणारा सुगंध॥

    गुढीपाडवा म्हणजे फक्त सण नाही,
    तो मनाचा एक नवा श्वास आहे |
    जुनं सगळं मागे सोडून,
    नव्यानं जगण्याचा विश्वास आहे ||

    •ॲड.कीर्तिराज शैलेंद्र आगलावे, पुणे ✨
    मो:- 9011841212

      July 2, 2026


  • वियोग

    सहवासाचे सुख जेवढे, वियोगाचे दुःखही तेवढे ।
    बांधल्या प्रेम बंधन गाठीं, तुटता विसरुन जाती ।।

    लपुन बसती दुःख खुणा, समज न येई त्याची कुणा ।
    उडून जातां शाल सुखाची, व्यक्त होई मग दुःखे जीवाची ।।

    कशास करितो प्रेम असे ते, सहवासाने वाढत जाते ।
    फुग्यापरी जातां फूटूनी, दुःख सारे जीवनीं आणिते ।।

    दाखव प्रेम त्याच ठिकाणी, बघणार नाही वियोग कुणी ।
    केवळ प्रभूचा सहवास, तेच असे वियोगरहीत ।।

    प्रेम वाढते प्रभूसहवासे, निस्वार्थी भक्ती त्यांत वसे ।
    समरस होता एक रुपानें, वियोग मिटतो क्षणाक्षणाणे ।।

    डॉ. भगवान नागापूरकर
    संपर्क - ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

      March 12, 2017