(User Level: User is not logged in.)

कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • मंगलमय

    नक्षत्रांचे दीप उजळले
    अवनीवर आकाश उतरले
    अशा घडीला अवघी सृष्टी
    मंगलमय झाली

      August 20, 2026


  • परमार्थ व संसार आहेत एकच

    उपास तापास करुनी, शिणवित होतो देहाला

    भजन पूजन करुनी, पूजीत होतो देवाला

    कथा किर्तनें ऐकूनी, पुराण मी जाणिले

    माळ जप जपूनी, प्रभू नामस्मरण केले

    वेचूनी सुमनें सुंदर, वाही प्रभूचे चरणीं

    फुलांचे गुंफूनी हार, अर्पण केले कंठमणीं

    जाऊनी तीर्थ यात्रेत, दर्शन घेतले तीर्थांचे

    प्रसिद्ध देवालयांत, चरण स्पर्षिले मूर्तीचे

    मनामध्यें ठेऊन शांती, मूल्यमापन केले जीवनाचे

    कांहीं न मिळाले हातीं, व्यर्थ दवडिले क्षण वेळेचे

    संसारातील प्रेम व राग, ह्यातच मन गुरफटले

    कर्तव्यातील एक भाग, प्रभू भक्तीसी संबोधले

    परमार्थ आणि संसार, भिन्न नाहींत दोन

    प्रभूचाच आहे संसार, मनी तूं हे जाण

    कर्म फळ आशा, बाळगूं नको मनीं

    तेंव्हा न येईल निराशा, कर्म करिता क्षणीं

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

      January 17, 2021


  • ते डोंगर सुंदर

    ते डोंगर सुंदर दूरदूरचे बाई,
    पाहीन गडे त्या हिरव्या हिरव्या राई ।

    त्या विमल जलासह वळणे वळणे घेत,
    हिंडेन झऱर्‍यांच्या शीतल कुंजवनात ।

    दरडीवर बसल्या चढून चिमण्या वेली,
    परि हाय फुलांची पाखर पायाखाली ।

    उचलून उराशी धरीन चुंबुनि त्याते,
    गुंफिन तयांची माला मी निज हाते ।

    ती हरिण-बालके नयनी पाहुनि माते,
    म्हणतील आज हे नवेच कोणी येथे ।

    उडतील भरारा राघू बोलत बोल,
    आकाश मंडळी त्यांची माळ खुलेल ।

    कुरणातहि किलबिल करिती बहिणी सात,
    मी बघेन भांडण कसले चाले त्यांत ।

      June 11, 2026


  • हार-जीत बनुनी बघ

    हार-जीत बनुनी बघ

    https://youtu.be/0rAv7mcDBwU

    मित्रांनो, "हार-जीत बनुनी बघ " ही मराठी कविता आपल्यासाठी सादर करीत आहे.
    मराठी कविता आवडली तर share करायला विसरू नका.
    "माझी डायरी " या आपल्या चॅनलला अवश्य Subscribe करा.
    "माझी डायरी" आपल्यासाठी आणखी नव्या कविता-गझल-कथा घेऊन येत आहे.

    subscribe me : https://www.youtube.com/channel/UCWg4s4JepryoGlUdgiAFttQ

      June 26, 2018


  • बघून सूर्यपूजा पावन झालो

    हांसत आली सूर्य किरणे
    झरोक्यातून देव्हारयांत
    नाव्हू घालूनी जगदंबेला
    केली किरणांची बरसात

    पूजा केली किरणांनी
    जगन्माता देवीची
    प्रकाश स्पर्शुनी चरणाला
    केली उधळण सुवर्णांची

    तेजोमय दिसू लागले
    मुखकमल जगदंबेचे
    मधुर हास्य केले वदनी
    पूजन स्वीकारते सूर्याचे

    रोज सकाळी प्रात:काळी
    येउनी पूजा तो करितो
    भाव भक्तीने दर्शन देउन
    स्रष्टीवर किरणे उधळतो

    कोटी कोटी किरणांनी
    तो देवीची पूजा करितो
    केवळ त्याची पूजा बघुनी
    मनी पावन मी होतो

    डॉ. भगवान नागापूरकर
    संपर्क - ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

      March 6, 2017


  • लोभस चांदणे

    चंद्र आज एकला नभी उगवला ।
    रात पुनवेची मधूर भासला ।।
    मेघांचा गालीचा आज नाहीं दिसला ।
    शितल वारा अंगी झोंबू लागला ।।

    उलटून गेली रात्र मध्यावरती ।
    लुक लुकणारे तारे आतां दिसती ।।
    पेटल्या गगनीं असंख्य फुलवाती ।
    तीव्र-मंद प्रकाशानें त्या चमकती ।।

    त्या असंख्यात चंद्रमा एकची सापडे ।
    जो लोभसवाणा म्हणूनी सर्वा आवडे ।।
    उघडूनी देई मनाची प्रेम कवाडे ।
    निघूनी जाई रात बघतां त्याजकडे ।।

    डॉ. भगवान नागापूरकर
    संपर्क - ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

      March 2, 2016


  • हा दुरावा साहवेना (स्मृतिकाव्य)

    हा दुरावा साहवेना, संपवी क्षणभर स्वयें
    एकदा स्वप्नांत तरि ये, एकदा तरि ज़वळ ये ।।

    कां अशी गेलीस सखये प्रेमबंधन तोडुनी ?
    कां अशी गेलीस सखये एकला मज सोडुनी ?
    सात-जन्मीं-साथिचें तें वचन मजला आठवे ।।

    काय झालें सांग, मजवर एकदम रुसलिस अशी
    काय आलें सांग, जगतां त्यागुनी गेलिस कशी ?
    जन्मभरचे पाश तुटणें , चांगलें ऐसें नव्हे !

    तूं ज़री नाहींस पुढती, राहसी नयनीं तरी
    तूं ज़री नाहींस ज़वळी, आठवण ज़वळी परी
    राहते, राहील कायम स्मृति तुझी माझ्यासवें ।।

    एकादा भेटून माझी तृप्ति नाहीं व्हायची
    विकलता, त्या भेटिनें ज़ाईल वाढत हृदयिंची
    रोज़ ये स्वप्नांत सखये, रोज़ मजला ज़वळ घे ।।
    रोज़ ये स्वप्नांत सखये, रोज़ तूं स्वप्नांत ये ।।

    - - -
    ( दिवंगत प्रियपत्नी डॉ. स्नेहलता हिच्या स्मृतीत )

    - सुभाष स. नाईक. Subhash S. Naik
    सांताक्रुझ (प), मुंबई. Santacruz(W), Mumbai.
    Ph-Res-(91)-(22)-26105365. M – (91)-9869002126
    eMail : vistainfin@yahoo.co.in
    Website : www.subhashsnaik.com / www.snehalatanaik.com

      July 4, 2016


  • चालला घेऊन तो

    चालला घेऊन तो, श्रीरामाला वनवासाला,
    नौकानयन करत करत,
    पाण्यातील प्रवासाला,
    नौका चालवे नावाडी,
    नदी तरुन जाण्या,
    श्रीरामासंगे जानकी,
    लक्ष्मण रक्षण करण्या,
    त्रिकूट' चालले जलप्रवासा,
    जसे ओलांडती भवंसागरा,--!!!
    नावाडीच श्रीराम ते,
    संसार सागरातून तारण्या,--!!
    प्रवासीच इथे खरा नावाडी,
    अन् नावाडी असे प्रवासी,
    संसार सागर उफाळतां,
    नावाड्याचे कसब पणाशी,--!!

    हिमगौरी कर्वे.©

      March 26, 2020


  • गुंतू नको आता उगा

    गुंतू नकोस, प्रीतीत वेडया जीवा
    निस्वार्थी! नूरली प्रीती ही मानवा ।।धृ।।

    वनांतरी सीता, सुख त्यागी रघुराजा
    हनुमंत दावी, हृदयीचे रूप रघुराया
    रक्ताळला हरि, काटे बोचता सुदामा
    पांचालीची, लज्जा राखे मुरलीवाला
    भाव भक्तीप्रीतीचा हा कुणा सांगावा ।।१।।

    अर्थ प्रीतीचा अर्थ! अर्थची रे गुणवत्ता
    नटली प्रीती नाटकी, बेगडी हसूं आता
    औपचारिक, पोकळ प्रीतीभाव आता
    नका दुःख ते सांगु, सुख तेवढेच सांगा
    निष्पाप! भाव प्रितीचा कसा जाणावा ।।२।।

    जोवरी शिजती शिते, तोवरी येती भुते
    यौवनी, दाटते मिठी, वृद्धत्वे रे दुरावा
    नसता माया,नसे माया, रुक्ष जिव्हाळा
    प्रीत, सारी विखुरलेली मृगजळी आता
    निष्प्राण प्रीतीत, काय सुखदा मानवा ।।३।।

    -- वि.ग.सातपुते.(भावकवी)

    9766544908

    रचना क्र. ७.

    ७ - १ - २०२२.

      January 23, 2022


  • तन मनातील तफावत

    देह मनाच्या वया मधील, तफावत ती दिसून येते
    चंचल असूनी मन सदैव, शरिर परि बदलत राहते...१,

    चैतन्ययुक्त ते मन सदा, स्थिर न राहते केव्हांही
    जन्मापासूनी मृत्यूपर्यंत भाग दौड ती चालत राही...२,

    परिस्थितीच्या चौकटीमध्यें, विचारांचा दबाव राहतो
    शरिराच्या सुदृढपणाचा, मनावरती परिणाम होतो...३,

    दिसून येते केव्हां केव्हां, मन अतिशय उत्साही
    परि शरिराचा दुबळेपणा, मनास त्याक्षणी साथ न देई....४

    विचित्र होते वातावरण ते, जेव्हां मनास साथ ना मिळे
    विचारांच्या चुका होऊनी, दु:खी होते जीवन सगळे...५

    -- डॉ. भगवान नागापूरकर
    ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

      January 30, 2019