ग्रामीण संस्कृती आणि परंपरा या यात्रौत्सवानिमित्त पहायला मिळते.
March 18, 2017
तपसाधना करूनी मिळवी,
सत्वगुणाची शक्ती अंगी ।
त्याच शक्तीच्या जोरावरती,
स्थान लाभे त्यांना स्वर्गी ।।
शक्ती ऱ्हास जे करिती त्याचा,
सारे सुख आणि भोग भोंवतीं ।
परिणामी तो फेकला जाऊनी,
पुनरपी येई याच भूवरती ।।
एक दया दाखवी ईश्वर,
वातावरणी देऊनी संधी ।
जन्म मिळे ते त्याच ठिकाणी,
कमविले पुण्य ज्याने आधी ।।
चक्र खेळ हा चाले सदैव,
स्वर्ग मृत्यू या लोकी त्याचा ।
अंतिम ध्येय तेच ठरते,
मिळविणे क्षण तो मुक्तीचा ।।
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
December 1, 2015
मागत होता प्रभूला हात जोडूनी कांही
भक्तिभाव बघूनी त्याचे मिळत ते जाई
एका मागून एक मिळे मागणी होता त्याची
निराश करणे न लगे इच्छा होता भक्ताची
जे जे बघे भोवती घेतले होते मागुनी
कशांत दडले सुख उमज येईना मनीं
देरे बुद्धि देवा मजला योग्य मागण्यासाठी
समाधानी मी होईन तुझ्या कृपे पोटी
ज्ञान झाले गंमतीचे सांगे सोड मागणे
न मागतां मिळाले जे आनंदी केले जगणे.
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
April 9, 2021

प्रतिबिंब तुझे रे घरात माझ्या
आशिर्वादच हा अरे कल्पवृक्षा
तुझी कृपादृष्टी सदैव राहो
मनीमानसी एवढीच इच्छा
August 18, 2026
खिडकीमधूनी टिपत होतो
बाह्य जगाचे द्दष्य आगळे
लोभसवाणें चित्र बघण्या
आतूर होऊन गेले डोळे
नयन नव्हते बघत ते
बघत होतो मीच खरा
खिडकीसम नयनातूनी
द्दष्य उमटते आंत जरा
संगीताचे सूर निनादूनी
लहरी त्यांच्या उठताती
कर्णा मधल्या पडद्यायोगे
आनंद मजला देवून जाती
मालक असूनी मी देहाचा
इंद्रिये सारी असती सेवक
ती केवळ साधने असूनी
आंतील 'मीच' असे साधक
मालक असूनी ताबा नसणें
स्वच्छंदी बनवी सेवकाला
इंद्रिये ती गोंधळ घालती
जागृकता नसतां मनाला
सोडून द्यावी वृत्ति मनाची
अरोप करणें इंद्रियावरी
ती तर केवळ सेवक असूनी
मनाची इच्छा पूर्ण करी
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
April 7, 2017
जगातून पोलिओच्या उच्चाटनात जोनस सॉल्क यांचं काम खूप मोठं आहे. त्यांनी आणि त्यांच्या टीमने पोलिओची पहिली लस शोधून काढली होती.
October 24, 2021
हो!!!!
हो मी महानायिका बोलतेय
नाव माझे सावित्रीबाई
माझी जन्मदात्री लक्ष्मीआई
३जानेवारीला सुदिन उगवला
खन्दोजी नेवसे यांच्याघरी कन्यारत्नास "पहिली धनाची पेटी"चा मान मिळाला.
आजच्या सारखा गर्भपाताचा शाप नाही मिळाला.
हो !!!!!!!
हो मी महानायिका बोलतेय
उपवर होताच १८४०सात ज्योतिरावांच्या घरचा उंबरठा ओलांडला.
संरक्षक,समर्थक गुरू लाभता साक्षरतेचा वसा घेतला.
हो!!!!
हो मी महानायिका बोलतेय
मी तर ज्ञानदानाचा झेंडा रोविला
कर्मभुमी माझी युद्धभुमी
प्रतिकुलतेत अनुकुलतेसाठी लढा दिला
विधवा विवाह,अस्पृश्यता,
महिला स्वातंत्र्य,दिलीत महिलांचे साक्षरीकरण
यासाठी मी विष्ठेचा नि दगडांचा मार सोसला
हो!!!!!!
हो मी महानायिका बोलतेय
सामाजिक सुधारक,पहिली महिला शिक्षक होण्या स्वातंत्र्याचा पायंडा रचला
पण माझा पोषाख मी नाही पाश्चिमात्य केला
आधुनिक बाला स्वातंत्र्याला नको लागू दे स्वैराचाराची बाधा
हो!!!!!
हो मी महानायिका बोलते
नको मजला देवत्व इथे
नको माझ्या फोटोस हारतुरे
मला माझे स्वप्न हवे
अजूनही बऱ्याच निरक्षर दिसतात इथे
त्यांच्यासाठी थोडा वेळ द्या की गडे
हो!!!
हो मी महानायिका बोलतेय
आपल्या उत्कृष्ट मार्गावर चालत राहू
मृत्यूलाही घाबरवू
हो!!!!!!
हो मी महानायिकाच आहे
मी महानायिकाच बोलतेय
कारण.....................
१०मार्च १८९७ला महामारीत प्लेग ऋग्णांची सेवा करता करता प्लेगग्रस्त होऊनच ही क्रांतीज्योत समाजासाठी विझली असेल
पण ...................
पण ही धगधगती ज्ञानमशाल सावित्रीच्या लेकींनो तुमच्या रुपात धगधगत आहे
उठा..........
उठा अन् माझा ज्ञानयज्ञात प्रयत्नांच्या पराकाष्ठेची आहूती द्या
आहूती द्या
-- सौ.माणिक शुरजोशी
नाशिक
January 4, 2020
मी कविता का लिहितो
हे मला खरंच कळत नाही..
मीच, मला घातलेलं कोडं
कांही केल्या सुटत नाही !
कारण जिच्यासाठी मी
रात्रीचा दिवस करतो,
आणि लिहितो, तिच्या पर्यंत
त्या कधीच पोहोचत नाहीत..
आणि माझ्या व्याकुळ मनाची
परत घालमेल नको,
खपली निघायला नको म्हणून,
मी ही त्या परत वाचत नाही..
तरी हि मी लिहितो.....
का लिहितो कळत नाही
लिहायच नाही हे रोज ठरवतो
पण....रात्र होताच लिहू लागतो
विदीर्ण जखमी मनातून
कविता प्रसवत राहते ...
रक्त बंबाळ अंतःकरणातुन
शब्द शब्द स्त्रवत राहते......
© अरविंद टोळ्ये
९८२२०४७०८०
May 20, 2021
हास्यमुखाने निरोप दे ग, प्रेमाने भरला
विसरावी मी ओढ येथली, जाता सासरला.... ।। धृ ।।
खूप दिले तू प्रेम आजवरी, सदैव ठेवीत पदर शिरी,
पंखांना परि शक्ती देवूनी, सांग मला ग घेण्या भरारी
सैल कर तू पाश आपला...१,
हास्य मुखाने निरोप दे ग प्रेमाने भरला,
संसारातील धडे देवूनी, केलीस तयार कष्ट घेवूनी
कुठे लोपला आज विश्वास तो, जागृत होता सदैव मनी
नकोस देऊ वाव शंकेला...२,
हास्य मुखाने निरोप दे ग प्रेमाने भरला,
ते तर केवळ घर निराळे, मायेने भरलेले,
जसे मिळवले प्रेम माहेरी, वाटीत जाईन सासरी सगळे
आठवण करीता येईन भेटीला...३,
हास्य मुखाने निरोप दे ग प्रेमाने भरला
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
January 24, 2016
मन कुठे असत, कस ते दिसत
कधी कळलच नाही कुणा,
मात्र पावलोपावली जाणवतात,
त्याच्या अस्तित्वाच्या खुणा !
मन इतक मोठ,
कि आभाळ त्यात माईना,
मनाच्या गाभार्यांत
अगणित भावना !
कडू-गोड आठवणींचा,
मन एक खजिना,
भावनांच्या प्रतिमेचा
तो सुंदर आईना !
चिंता-भिती-संशयाचा
मनी सतत पिंगा
भल्याबुर्या विचारांचा
तिथे भारी दंगा !
मन जस कांही
एखाद हटवादी पोर
हटकायला जाव तर
होत बंडखोर !
पण मन म्हणजे ईश्वर
मन म्हणजे मैतर
मन म्हणजे गुरु
मनांतल्या मनांत सार्यांना स्मरु !
-- सौ.अलका वढावकर
January 6, 2016
Copyright © 2025 | Marathisrushti