(User Level: User is not logged in.)

कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • गवाक्ष

    जीवनप्रवाहात खूप काही मागे सुटतं. पूढे पूढे चालतांना जरी वाट दिसत असली तरी नियती चा मोठ्ठा धोंडा आला की प्रवाह भरकटतो. आणी जे हवंय ते मागे ,खूप मागे सुटून जातं. पण सतत प्रवाहीत असणे हा निसर्ग नियम पाळायलाच हवा.

      February 1, 2019


  • एक होती शाळा

    एक होती शाळा
    शाळेत होता फळा
    फळ्यासमोर मुले बसत
    असेच रोज वर्ग भरत

    शाळेचे एक होते मैदान
    चाले तिथे रोज घमासान
    खेळांचे मग डाव भरत
    दिवसा मागून दिवस सरत

    बुद्धी आणि व्यायाम यांची होती गट्टी
    रविवारी मात्र , त्यांना असे सुट्टी

    आता कसली शाळा
    आणि कसले मैदान
    कोरोना च्या धाका पाई
    मुले झालीत हैराण

    हात धु , मास्क घाल, हेच रोज ऐकू येतं
    अन मोबाईल हाती घेऊन, युद्ध त्यांचे सुरू होतं.

    -- भैय्यानंद वसंत बागुल.

      January 21, 2022


  • कधी कधी दूरवरून चांगले दिसते

    कधी कधी दूरवरून चांगले दिसते
    असे म्हणतात ...पण प्रेमात मात्र
    कधीकधी तसे नसते,
    दूरचे जेव्हा जवळ येते
    तेव्हा खूपच चागले भासते..
    आत्ता भासणे आणि असणे
    यातील फरक ज्याचा त्यानेच
    शोधायचा असतो....
    पण शक्यतो शोध घेण्याच्या फंदात पडू
    नये कारण...
    हा शोध पुढे
    अपघात ठरू शकतो...
    -- सतीश चाफेकर.

      December 2, 2021


  • न मागितलेल्या वेदना

    काही बाण खूप खोलवर, जिव्हारी लागतात
    भरलेल्या भासूनही जखमा विव्हळत रहातात

    काही क्षण अश्वत्थाम्याची जखम होतात
    आयुष्य सरल्यावरही वेदनांना जिवंत ठेवतात

    एकाकीपण झाकायला आपल्या सावल्या पसरत जातात
    नि शरमेची टांगती शवं सारायला हात तोकडे पडतात

    हातांनी झाकला तरी चेहेरा स्वतःला खिजवत रहातो
    स्वत:पासून पळायचं असूनही पाय थिजवून ठेवतो

    वास्तवाची नग्नता रहाते सारं आभाळ व्यापून
    'सुखी माणसाचा सदरा' विरविरतो लक्तरं होऊन

    हर एक सकाळी जिवंत असणं असावं का हे वरदान
    का लिखिताच्या अभिशापाने असावं फर्मावलेलं दंडविधान

    जळजळता अनाहूत, कलंक भाळी लेवून
    जीवनाला सामोरं जाणं मान वर करुन
    भार शिक्षेच्या कवचकुंडलांचा अंगावर धारुन
    खूप आतून यावा लागतो निर्धार हुंकार होऊन!

    सोनं होणं नशीबी नसलं तरीही
    आगीतून जाणं क्रमप्राप्त होतं
    आपल्या सजेचा खलिता गळ्यात टांगून
    पाय ओढत रहाणं आपल्याला भाग असतं

    वावटळीने विखुरलेल्या मनाची जुळव चिवटपणाने करतो
    आश्वासित आत्म्याला तो, माझ्या अस्तित्वाचा पुनः शोध असतो

    खंतेच्या खळग्यांवर आठवणींचे दगड ठेवून
    कालच्या काळोखाकडे मी जेव्हा पाठ फिरवतो
    उद्याच्या उष:कालाच्या किरणांवर चालत रहाणं
    हा एकच मार्ग तेव्हा मला खुला असतो

    -यतीन सामंत

      September 1, 2022


  • कधीतरी , कुठेतरी , केव्हाही

    कधीतरी , कुठेतरी , केव्हाही
    दिसतात प्रेमाचे रंग..
    म्हणून नाक मुरडणारे खुप दिसतात ,
    म्हणे काही काल-वेळ आहे का,
    ही आपली संस्कृती आहे का,
    पण त्याला आणि तिला
    काहीच सोयर सुतक नसते...
    तो आणि ती मस्तपणे
    आपल्या विश्वात असतात,
    आणि संस्कृती आणि इतर काटे
    त्यांना कधीच बोचत नसतात
    परंतु इतर मात्र तडफडत असतात
    संस्कृती आणि वगैरे मध्ये...
    -- सतीश चाफेकर.

      December 3, 2021


  • सत्य, अहिंसा, साधी राहणी

    सत्य, अहिंसा, साधी राहणी, . महात्मा गांधींची विचारसरणी
    तत्वांची सगळ्या किती हेटाळणी, ‌
    कोण आणतो सांगा आचरणी, --!!!

    असत्याच्या आधाराने,
    हिंसक, मारक, वर्चस्वाने,
    वागतात पोकळ दिमाखाने, राष्ट्रपुरूषाची मनोरथे"च निराळी,-!

    स्वातंत्र्याचा वाईट अर्थ,
    सगळे स्वैराचाराचे भक्त,
    माणसाचे वागणे नि:सत्व,
    गांधींच्या तत्वांना तडा जाई,--!!

    सोदाहरणाने राष्ट्रपित्याने, स्वच्छतेचा मार्ग शिकवला,
    आम्ही घाणीच्या बुजबुजाटाने,
    समतोल निसर्गाचा बिघडवला,-!
    घर , गाव शहर परिसरां,
    "अस्वच्छ" बघा किती ठेविती,--!!!

    बोलू बघू ऐकू नका ,
    असे सांगती तीन माकडे,
    कोण पाळते तत्त्वांना या,
    गिरवती अनिती"चेच धडे,
    माणूस म्हणुनी माणसाला,
    किंमत मुळी ना देती,--!!!

    हिमगौरी कर्वे.

      April 1, 2019


  • प्राण ज्योत

    दिवा होता छोटासा, एक मजकडे ।
    इन्धन मिळतां तेलाचे, प्रकाश तो पडे ।।

    तळांत होती योजना, तेल सांठवण्याची ।
    शिरीं असूनी वात ती, क्रिया चाले जळण्याची ।।

    छिद्र पडतां तळाला, व्यर्थ जाई इंधन ।
    मंदावली ज्योत दिव्याची, शक्ती ती जावूनी ।।

    देह आहे दिव्यासारखा, चैतन्य तेज तयाचे ।
    प्रकाश फेकी आनंदाचा, इंधन मिळतां शक्तीचे ।।

    केंद्रित होते देह उर्जा, नाभीच्या भोवतीं ।
    व्यय टाळून प्रवाही करा, तीच प्रभूवरती ।।

    ऐहिक सुखाच्या जातां मार्गीं, गुरफटतो संसारीं ।
    तीच उर्जा प्राणास मिळतां, चेतवी ज्योत ईश्वरी ।।

    डॉ. भगवान नागापूरकर
    संपर्क - ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

      January 18, 2017


  • मैत्री

    मैत्री असते आंबट गोड
    हृदयाला हृदयाची जोड
    मैत्री असते मायेची पाखर
    तुझ्या सुखाला माझ्या आनंदाची झालर
    मैत्री असते राधाकृष्णाची
    बासरीच्या सुरात विरघळण्याची
    मैत्री असते जिवाभावाची
    मनातले गुपित हळूच ओळखण्याची
    मैत्री असते हळवे पणाची
    माझे अश्रु तिने पुसण्याची
    मैत्री म्हणजे सतारीची तार
    माझ्या वेदनेचे
    तुझ्या काळजात झंकार
    मैत्री म्हणजे आंधळ्याचा डोळा
    रणरणत्या उन्हात बर्फाचा गोळा

    -स्वप्ना साठे

    व्यास क्रिएशन्सच्या कस्तुरी - महिला विशेषांकातून साभार

      July 10, 2023


  • चोरलेले पुस्तकच भेट म्हणून मिळते तेंव्हा…

    शालेय शिक्षण पुरे करून,  महाविद्यालयात जाऊ लागलो. नवा उत्साह, नवे मित्रमंडळ आणि उच्च ते वातावरण. मनाचे, विचारांचे आणि बागडण्याचे एक वेगळेच स्वतंत्र. मला त्यावेळचा एक गमतीचा प्रसंग आठवला. ज्याचे धागेदोरे पुढील  जीवनात पंधरा वर्षानंतर विणले गेलेले आढळले. महाविद्यालयातील  तो दिवस आठवतो.

      October 8, 2020


  • दुर्लभ जीव मानवी

    अंगवळणी पडल्या दुःखवेदनां
    सभोती निर्विकार सुख संवेदना
    सारेच आपुले सख्ये सखेसोयरे
    परी दुर्मिळ झाल्या प्रीतभावनां....

    भास शुष्कतेचे, संपली मृदुलता
    गोठले प्रेम, प्रीती कवटाळतानां
    हरविला प्रीतवात्सल्य जिव्हाळा
    हाच शाप कां? जन्म भोगतानां....

    अंमल हाच कलियुगाचाच सारा
    वाटते, भोग प्रारब्धाचे भोगतानां
    युगायुगांचा हा दुर्लभ जन्म मानवी
    तिथे कुठली सुखदा वात्सल्याविना....

    रचना क्र. ९९

    ८/८/२०२३

    -वि.ग.सातपुते.(भावकवी)

    9766544908

      August 22, 2023