दिवाळी स्पेशल – फराळाचं गाणं

चकली, कडबोळी, भाजाणी आणि करंज्या… या गाण्यात…



WhatsApp वरुन आलेलं हे छान गाणं…. कुणीतरी हे गायलाच हवं….

तोच चंद्रमा नभात तीच शरद यामिनी|
एकांती मम मनात धाक घाली भाजणी||

नीरवता ती तशीच
घरही शांत झोपले
कीचनात मी बळेच तळणयुध्द मांडिले
कोडी सतत घालितात
त्या चकल्या नी कडबोळी
एकांती…….

सारे जरि ते तसेच
तेच धान्य डाळीही
रेसिपीही ती जुनीच
कंजुषी न मोहनी
हसतील कधी
कधी तुटतील
सुटतील कधी भेंडोळी
एकांती…..

त्या सुगंधी सारणास
बंदिवास नावडे
श्वेत शिंपला फुटोन
मोतीचूर ओघळे
ती करंजी गौरवर्णी
लाल होई तापुनी
तूप तेच थंड करुनी
घेइन मी गाळुनी
एकांती…..

तोच चंद्रमा नभात तीच शरद यामिनी एकांती….।।।

Author

Author
लेखकाबद्दल
sachingadkari (29664 लेख)

This is editor1

सर्व लेख पहा →