सुखी रहा तू लाडके

सुखी रहा तू लाडके,दिल्या घरी
मोद हा मनी दाटला,जा सासरी।।धृ।।

कन्यारत्न जन्मताच,आनंदलो
वाढवले ना लाडात,धन्य झालो
बालक्रीडा सुखविती,हो संस्कारी
मोद हा मनी दाटला,जा सासरी।।१।।

आला हो राजकुमार,नेण्या परी
नववधू दिसे कशी,ही गोजिरी
माय तुझी मालत्यांनी,ओटी भरी
मोद हा मनी दाटला,जा सासरी।।२।।

येता दाटुनी कंठ हा,काय करू
पाठवणी करतो,कसा सावरू
जा निवांत तू,वळू नको माघारी
मोद हा मनी दाटला,जा सासरी।।३।।

सेतू बनूनी रहा,दोन कुलांचा
बंध रेशमी हा ,तू जोडायचा
सोबत तुझ्या,संस्कारांची शिदोरी
मोद हा मनी दाटला,जा सासरी।।४।।

-- सौ.माणिक (रुबी)



सुखी रहा तू लाडके,दिल्या घरी
मोद हा मनी दाटला,जा सासरी।।धृ।।

कन्यारत्न जन्मताच,आनंदलो
वाढवले ना लाडात,धन्य झालो
बालक्रीडा सुखविती,हो संस्कारी
मोद हा मनी दाटला,जा सासरी।।१।।

आला हो राजकुमार,नेण्या परी
नववधू दिसे कशी,ही गोजिरी
माय तुझी मालत्यांनी,ओटी भरी
मोद हा मनी दाटला,जा सासरी।।२।।

येता दाटुनी कंठ हा,काय करू
पाठवणी करतो,कसा सावरू
जा निवांत तू,वळू नको माघारी
मोद हा मनी दाटला,जा सासरी।।३।।

सेतू बनूनी रहा,दोन कुलांचा
बंध रेशमी हा ,तू जोडायचा
सोबत तुझ्या,संस्कारांची शिदोरी
मोद हा मनी दाटला,जा सासरी।।४।।

— सौ.माणिक (रुबी)

Author