सहवास होता तुझा,
सदोदित साथ देणारा…!
संयम होता तुझा,
माझे बोल झेलनारा…!
जिद्द होती तुझी,
नितांत प्रेम करण्याची…!
तुझ माझ नातं कस्तुरीचं,
एक थेंब सागरात मिसळलेलं….!
एक थेंब सागरात मिसळलेलं….!
– श्र्वेता संकपाळ
August 22, 2018
खोलीमध्ये कोंडूनी मांजर, हाती घेई काठी ।
मारून टाकण्यासाठी तीला, लागला तो पाठी ।।
अतिशय भीत्री असूनी ती, जीवासाठी पळे ।
हतबल होता पळून जाण्या, मार्ग तो ना मिळे ।।
उपाय नसता हाती कांहीं, चमत्कार घडे ।
सर्व शक्तीनी त्याच्यावरती, तुटून ती पडे ।।
उडी मारूनी नरडे धरले, दोन्ही पंजानी ।
मृत्यूचाच तिने गळा घोटला, शक्ती युक्तींनी ।।
प्रत्येकामध्ये सुप्त असते, शक्ती लपलेली ।
अवचित वेळ पडता दिसे, बाहेर आलेली ।।
मदत देतो निसर्ग तुम्हां, संधी बचावासाठी ।
जीवनासाठी झगडत रहा, शिकवण ही त्याची ।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
April 7, 2020
मानव देह देऊनी ईश्वरा,
उपकार केले मजवरती,
सेवा करण्या तव चरणाची,
संधी लाभली भाग्याने ती ।।१।।
कर्म दिले मानव योनीसी,
श्रेष्ठत्व येई त्याचमुळे,
उद्धरून हे जीवन नेण्या,
कामी येतील प्रयत्न सगळे ।।२।।
मुक्त होणे जन्म मरणातूनी,
साध्य होई प्रभूसेवेने,
परि तीच मुक्ती वंचित करते,
आनंदमयी प्रभू दर्शने ।।३।।
एक मागणे प्रभू चरणी,
मुक्ती न देई मजला,
संधी देऊनी तव सेवेची,
सहवास मिळवा हर घडीला ।।४।।
-- डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
June 13, 2016
दु:ख जाणण्या दु:खी व्हावे,
या परि अनूभव दुजा कोणता
सत्य समजण्या कामी न येई,
तेथ कुणाची कल्पकता १
धगधगणारे अंगारे हे,
जाळती जेथे काळीज
शब्दांचे फुंकार घालूनी,
येईल कधी का समज २
मर्मा वरती घाव बसता,
सत्य येते उफाळूनी
चेहऱ्यावरले रंग निराळे,
हलके हलके जाती मिटूनी ३
त्या दुःखीताला जाणीव असते,
जीवनामधली निराशा कशी
झेप घेवूनी समरस होतो,
इतर जणांच्या काळजाशी ४
सुख दु:खातील दु:ख आधीक ते,
पदोपदी जे दिसून येई
दु:खीतांचे अश्रू पुसण्यासाठी,
दु:खी अनूभवी धाव घेई ५
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
April 6, 2021
हवाच मजला तोच चंद्रमा
तेच नभी चांदणें
गतकाळाच्या आठवणी शिकवती आनंदातील जगणें ।।धृ।।
आजीसंगे गच्चीवरती
फुलराण्यांच्या कथा ऐकती
बसुनी सारे एक वर्तुळी, टाळ्या पिटूनी गाती गाणें ।।१।।
गतकाळाच्या आठवणी शिकवती, आनंदातील जगणें
फुलले होते यौवन सारे
अंगी झोंबे शितल वारे
पुनव चांदणे धुंदी आणी, बघूनी तारांगणे ।।२।।
गतकाळाच्या आठवणी शिकवती, आनंदातील जगणें
सगे सोयरे मित्रमंडळी
परसदारी तुळशीजवळी
गप्पा टप्पा विनोंद बौधिके, रात्र घालवी करुनी भजने ।।३।।
गतकाळाच्या आठवणी शिकवती, आनंदातील जगणें
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
December 25, 2017
तारकांचे पुंज माळून, वाटते तुझ्या कवेत यावे,
दुःखांच्या आभाळीही,
मुक्त बघ जरा हिंडावे,--!!!
घायाळ जीव तो आंत आंत,
तो कोणा कसा कळावा,-? आत्म्यानेच आत्म्याला,
दिलासा कसा कुशीत द्यावा,--!!
ओढ नसावी शरीरातून,
असावी प्रीत मनामनांची,
धागे एकमेकांत गुंफत,
वीण गुंतावी काळजांची,--!!!
तुझे दुःख माझ्या उरात सले,
माझे व्हावे ना रे तुझे,
अश्रू माझे गाली सांडताना,
राजा,अंतर मात्र तुझे उले,--!!!
बंबाळलेली दोन्ही हृदये,
हाक परस्परांना देती,
प्रेमावाचून संकेतांची,
ताकदवान भाषा कोणती,--!!!
दुनिया केवढी निष्ठूर असे, निरपराधास शासन मिळे,
जो करतो काम प्रामाणिक,
त्याची कदर ठेवत नसे,--!!!
हुंदके दाबून ठेवलेले,
तुझ्या मिठीतच सांडावे, सामर्थ्यशाली बाहू तुझे,
वाटते मला भोवती असावे,--!!!
जग तूच केवळ माझे,
तुझ्या सुखी जर आंच येते,
टेकडीसमान खंबीर मी, कोसळल्यागत पाहत राहते,--!!!
मिलन व्हावे दोन जिवांचे, एकरूपता अशी यावी,
तुझ्या मिठीत मरण सुखे एकमेव आंस माझ्या हृदयी,--!!!
शृंगाराची पूजा निव्वळ,
वासनेचा लवलेश नसे,
मुक्त त्या प्रणयक्रिडांत,
प्रेम ओतप्रोत असे,--!!!
तुझे भरले डोळे पुसुनी,
त्यावर ओठ टेकत आपुले,
दुःखच सारे घेईन पिऊनी,
खुशाल जगास मग झिडकारले,--!!
हिमगौरी कर्वे
February 25, 2020
ध्यान कसे लावावे, मार्ग असे मनोहर,
सुलभ ते समजावे, त्याचे मिळण्या द्वार ।।१।।
स्वच्छ एक आसन, शांत जागी असावे,
मांडी त्यावर घालून, स्थिर ते बसावे ।।२।।
लक्ष्य केंद्रीत करा, तुमच्या श्वासावरी,
कसा फिरे वारा, आत आणि बाहेरी ।।३।।
साक्षी तुम्ही बना, श्वासाच्या हालचालीत,
शांत करील मना, बघून प्राण ज्योत ।।४।।
काहीही न करावे, यालाच म्हणती ध्यान,
करण्यास तुम्ही जावे, जाईल सारे बिघडून ।।५।।
ध्यानात झोपे शरीर, शांत करूनी मन,
आंत शोधते ईश्वर, करूनी आत्मचिंतन ।।६।।
वेळ थोडा जाता, ध्यान सहज लागते,
अंतरीचा प्रकाश दिसता, मन आनंदात डुबते ।।७।।
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
January 19, 2016
नाजूक असेल स्त्री जन्म
तू नेहमी कणखर रहा..
बिकट असतील साऱ्या वाटा
तू वाट शोधत रहा...
नसेल तेज सूर्यासारखं
दिव्याप्रमाणे उजळत रहा..
स्वप्ने असतील तुझी अनेक
स्वप्नांच्या दिशेने चालत रहा..
रंगांच्या पसरूनी छटा
जीवनाचे चित्र रेखाटत रहा..
मने जपशील तू सर्वांचीं
पण तू स्वतः स्वच्छंदी रहा..
लेवूनी लेणे अस्तित्वाचे
स्त्री जन्मा तू सुखी रहा.
प्रतिभा चौगले यांच्या प्रतिभास या कवितासंग्रहाच्या इ-पुस्तकातील ही कविता.
हे इ-पुस्तक आपण खालील लिंकवर खरेदी करु शकता.
किंमत : रु.८०/-
सवलत किंमत : रु.५०/-
https://marathibooks.com/books/pratibhas-by-pratibha-chougale/
June 1, 2026
दुष्काळानंतरचा पाऊस गारवा देणारा असतो,
प्रेयसीने प्रियकराच्या जखमेवर प्रेमाने फुंकर घालावी तसा...
तापलेली जमिन पावसाने थंड झाल्यावर आनंदाने हिरवा शालू नेसते,
साखरपुड्यात नववधू नेसते तसा...
सृष्टीचे हे बदलेले रूप शेतकरी डोळेभरून पाहातो,
प्रियकर आपल्या प्रेयसीचे अप्रतीम सौंदर्य चोरून पाहातो तसा...
शेतकर्याच्या स्वप्नांना पावसात नवीन पालवी फुटून तो आनंदी होतो,
प्रेयसीशीच लग्न ठरल्यावर प्रियकर होतो तसा...
कवी – निलेश बामणे
202, ओमकार टॉवर, बी – विंग, गणेश मंदिरा जवळ, श्रीकृष्ण नगर, संतोष नगर, जन.ए.के.वैद्य मार्ग, गोरेगांव ( पूर्व ), मुंबई – 400 065.
मो. 8652065375 / 8692923310
Email- nileshbamne@yahoo.com
nileshbamne10@gmail.com
June 30, 2016
-- स्वाती ठोंबरे.
December 1, 2021
Copyright © 2025 | Marathisrushti