(User Level: User is not logged in.)

कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • पण आणि परंतु….

    पण आणि परंतु,
    मध्ये सारखे येती,
    निर्माण करती किंतू ,
    जीवनही ते बिघडवती --!!!

    गोष्ट कुठली सरळ ,
    आयुष्यात होत नाही,
    प्रत्येकाचे त्यांच्यावाचून ,
    पदोपदी अडत राही,--!!!

    सुख-- दु:खांची असो भेळ,
    असो अडसर भोवती,
    मार्ग नसण्यात निव्वळ
    चोख भूमिका निभावती,--!!!

    ते नसते तर आयुष्याची,
    मग न्यारी नसती कुठली गंमत, त्यांच्याशिवाय भाषा अडतसे, सतत सारखी केव्हाही अविरत,--!

    अस्तित्व त्यांचे जन्म देई, आभाळाएवढ्या कर्तृत्वाला, मातीतून वर उठत,
    काही स्पर्शती आभाळाला,--!!!

    सुखदुःखामधील रेषा,
    पण परंतु सदैव आखती, अहंकाराचे पाय कापावया, अविश्रांत ते तयार असती,--!!!

    अमर्याद सगळ्या दुःखांची, परिभाषा तिथूनच सुरू होई,
    पण परंतु आणखी किंतू ,
    शब्द महत्व राखत जाई,--!!!

    ते नसते तर जीवनच बेचव, असल्यामुळे किती खोळंबा,? मानत नाही त्यांना मानव,
    नीट समजून त्यांचे मर्म बा,--!!

    © हिमगौरी कर्वे

      October 18, 2019


  • देवाचिया दारीं

    देवाचिया दारीं, मनाचा मुजरा,

    झुकवूनिया मान, हासे तो चेहरा ।। धृ ।।

    जाई जेव्हां मंदिरी,

    घेतां प्रभू दर्शन,

    आनंदानें नाचते,

    हर्षित चंचल मन,

    नयन साठविती, त्या मंगल ईश्वरा,

    देवाचिया दारी मनाचा मुजरा ।।१।।

    नदीनाले धबधबा,

    उंच उंच वृक्ष वेली,

    कोकीळ गाती, मोर नाचे,

    इंद्रधनुष्याच्या खाली,

    रोम रोमातूनी शिरे, निसर्गाचा फवारा,

    देवाचिया दारी मनाचा मुजरा ।।२।।

    दु:खी – कष्टी दुबळा,

    दीनवाणा दिसे,

    प्रभूच्याच आज्ञेने,

    भोग भोगीत असे,

    जातां हृदय भरूनी, करि आसवांचा मारा,

    देवाचिया दारी मनाचा मुजरा ।।३।।

    -- डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

    bknagapurkar@gmail.com

      April 27, 2016


  • आधुनिकता

    नवलाईचे विश्व सारे, नवलाईतच जगते ।
    आगळ्याच्या शोधामध्यें, नव-नवीन इच्छीते ।।

    ताजे वाटते आज जें, शिळे होई उद्यांच ते ।
    प्रवाही असूनी जीवन, बदल घडवीत जाते ।।

    मुल्यमापन बदलांचे, संस्कारावरी अवलंबूनी ।
    परिस्थीतीच्या भोवऱ्यामध्यें, विचार फिरे क्षणोंक्षणीं ।।

    मुळतत्व ते राही कायम, आकार घेई जसा विचार ।
    ताजा शिळा भाव मग तो, ठरविला जाई वेळेनुसार ।।

    डॉ. भगवान नागापूरकर
    संपर्क - ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

      January 25, 2017


  • स्वप्नात माझ्या येशील का?

    आज रात्री पुन्हा एकदा
    स्वप्नात माझ्या येशील का?
    पुन्हा एकदा तशीच मला
    आर्त साद घालशील का?

    जीवनाचा एक डाव
    माझ्या संगे मांडशील ना!
    अमोलिक आसवांना
    माझ्यासंगे देशील का?

    तुझ्या माझ्या बंधनांना
    भावनांत गुंफशील का?
    सांग माझ्या वेदनांना
    तू दिशा देशील का?

    काळजाची स्पंदने
    माझ्या तू होशील का?
    चांदण्यात वेचलेली
    फुले तू नेशील का?

    माझ्यासाठी आसवांना
    वाट मोकळी देशील का?
    ओघळणाऱ्या मोत्यांची त्या
    ओंजळ मला देशील का?

    थबकणारं पाऊल तुझं
    माझ्याचसाठी असेल ना?
    वळून पुन्हा पुन्हा मागे
    व्याकुळ-व्याकुळ बघशील ना!

    प्रिये तरल लाटांवरुन
    काव्य माझे होशील का?
    उद्या फिरुन पुन्हा एकदा
    स्वप्नात माझ्या येशील का?

    -- यतीन सामंत

      November 3, 2022


  • रात्र सरकता आल्हाद

    रात्र सरकता आल्हाद
    तुझी आठवण नित्य येते,
    तुझ्या अव्यक्त मिठीत
    तुझी सल मनात बोचते
    येशील का तू अवचित कधी
    मला सहज सख्या भेटायला,
    घेशील मिठीत अलवार तेव्हा
    डोळ्यांत अश्रू होतील जमा
    तुझ्या मिठीत मी पुरती
    हलकेच मोहक गुंतून गेले,
    दूर जरी मी अलगद जाता
    सय तुझी रोज आताशा येते
    कसे सहज विसरावे तुला
    मोह तुझ्या मिठीचा होता,
    वाट पाहते तुझी अधर हृदयी
    दोष कसा देऊ अबोल माझ्या मनाला
    -- स्वाती ठोंबरे.

      June 6, 2022


  • रात्र…चिरःकाल टिकणारी 

    लहानपणी रात्र कशी
    अगदी लवकर यायची
    थकलेल्या मला कशी
    पटकन निजवायची.

    कळु लागले तशी
    रात्र ही शांत झाली
    तिला मला जणु
    स्वतःची ओळख मिळाली.

    तरूण झालो तेंव्हा
    रात्र कशी रोमांचित होई
    रातराणीच्या वासानं
    ती धुंद होउन गाई.

    संसाराच्या धावपळीत
    चैन रात्रीची हरपली
    काळजीने ग्रस्त रात्र
    उशीराने झोपू लागली.

    स्वप्नाळु रात्र फार काळ
    नाही स्वप्नात रमली
    वास्तवाच्या जाणीवेने
    दचकून वारंवार उठली.

    कोसळण्याऱ्या दूःखानी

    रात्र जरी पूरती भिजली
    मायेची चादर घेऊन
    मला गुरफटून झोपली.

    कधी रात्र विनाकारण
    माझी चिंता करते
    मलाही नाही झोपू देत
    आणि स्वतः उगाच जागते.

    आजकाल रात्र पूर्वीसारखी
    वाटत नाही खुशीत
    येत नाही जवळ आणि
    घेत नाही मला कुशीत.

    माहित आहे मला, रात्र
    चिरःकाल टिकणार आहे
    केंव्हा तरी कायमच झोपुन
    मी तिला मुकणार आहे.

    - डॉ.सुभाष कटकदौंड

      October 14, 2018


  • मुक्ताफळें

    “सुमनांजली” या काव्यसंग्रहातून…

      June 15, 2012


  • खोडकर कृष्ण

    किती रे खोड्या करिशी कृष्णा

    यशोदा तर गेली थकूनी..।।धृ।।

    झोपू दे रे तिजला आतां, ती तर गेली खूप दमूनी

    दही दुधांनी भांडी भरली,

    काही प्याली, काही वाटली,

    काही तर ती उपडी झाली,

    पिऊनी सांडूनीच सगळे, नासलेस दही दूध लोणी...१,

    किती रे खोड्या करशी कृष्णा, यशोदा तर गेली थकूनी

    गणरायाचे पूजन करितां

    मग्न झाली यशोदा माता

    लक्ष्य तुझे नैवेद्यीं पडतां

    फस्त करशी कांहीं मोदक, ताटामधले तूंच खाऊनी....२,

    किती रे खोड्या करशी कृष्णा, यशोदा तर गेली थकूनी,

    गोपींच्या तूं फोडल्या घागरी,

    पळवी त्यांची वस्त्रे सारी,

    दुधा तुपाची केली चोरी,

    मौज वाटते गोप-गोपींना, नटखटता तुझी बघूनी...४

    किती रे खोड्या करशी कृष्णा, यशोदा तर गेली थकूनी,

    खोंड्या नच लीला बघूनी,

    प्रेमभावना उचंबळूनी

    जाई यशोदा ती बावरूनी

    डोळ्यामधले लपवून आश्रू, लटका राग दिसे शब्दानी...५,

    किती रे खोड्या करशी कृष्णा, यशोदा तर गेली थकूनी

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

      August 24, 2020


  • भिकारीण

    मधूर आवाज मिळूनी, उपकार झाले तिजवर

    सुंदर गाणे गाऊनी, आनंदीत करी इतर // १

    हातपाय दुबळे होते, दृष्टी नव्हती तिजला

    कष्ट करण्या शक्ति नव्हती, कसा मिळेल घास तिला // २

    परी ती होती आनंदी, गाण्याच्या ओघांत

    उचलित होती पैसे, पडता तिच्या पदरांत // ३

    जरी झाला देह दुर्बल, जगण्याची होती आंस मनी

    मिळालेल्या आवाजाला, ऋणी समजे ती मनी // ४

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

      March 20, 2021


  • प्रेम …

    तू कधीच नाही माझ्या
    माझे हृदय तुझ्या प्रेमात पडले
    तू स्वछंद बागडत राहिलीस
    ते विनाकारण झुरत राहिले ...

    तू नाही माझ्यावर
    मी तुझ्यावर प्रेम केले
    तू गालात गोड हसत
    माझ्या मनाला भुलविले ...

    तू नाही दगाबाज
    दगाबाज मीच आहे
    तुझ्यासारख्या कित्येकींना
    मी दुखावले आहे...

    आठवतात ते सारे क्षण
    त्यांच्या सोबत प्रेमाचे
    आणि तुझ्यावरील माझे प्रेम
    मला फार हलके वाटते...

    तुझ्या प्रेमात पडणे
    हे माझे वेड होते
    वेड असले तरी
    तेच खरे प्रेम होते...

    © निलेश बामणे

      May 31, 2017