(User Level: User is not logged in.)

कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • बाप वाटा

    या वाट वाटणीसाठी
    घालती बापाचे वाटे
    असे कोणते ठेवले
    पुरून धनाचे साठे?

    राख भरती डोक्यात
    कुणी फुकती कानात
    भाऊ भावाचा वैरी रे
    असं औषध क्षणात

    जमिन तुकड्यापायी
    माणूस विसरे धर्म
    एका आईची लेकरं
    कसे करती कुकर्म

    जागा बांधाच्या वांध्यान
    देश, माणूस तोडला
    मळा पडीक पाडला
    जीवा जुगार मांडला

    बघ साडेतीन फुट
    जागा तुला रे जाळाया
    लोकं मयता शेवटी
    लावी कर्दुडा तोडाया

    -- विठ्ठल जाधव.

    vitthalj5@gmail.com

    शिरूरकासार,बीड

      November 28, 2021


  • मैत्रभाव

    मी सवंगड्यां सोबती राहतो
    जीवनी, सुखसागरी डुंबतो

    विसरूनिया साऱ्या व्यथ्यांना
    वैफल्यातही सुखानंदी जगतो

    शैशवी, आठव सारे खट्याळ
    मैत्रभावनांच्या स्मृतीत जगतो

    मित्र भेटीस, मी आसुसलेला
    गळाभेटीच्या प्रतीक्षेत जगतो

    जरी हरविले क्षण सारे यौवनी
    अंतरी, निज शैशवात जगतो

    मित्रांसोबती, नशा यौवनाची
    निडर, निवांत तृप्ततेत जगतो

    जीवास नाही कुठलीच चिंता
    हसुनी, हसवत नित्य जगतो

    मी आज उभा, पसरुनीया बाहु
    स्वानंदा! मुक्त उधळीत जगतो

    -- वि.ग.सातपुते. (भावकवी)

    9766544908

    रचना क्र. ८१.

    १४ - ३ - २०२२.

      March 27, 2022


  • बदलती पिढी

    पिढी गेली रूढी बदलली, बदलून गेले सारे
    क्षणा क्षणाला बदलून जाते, चित्त चकित करणारे....१,

    सुवर्णाचे दाग दागीने, हिरे माणके त्यात
    पिढ्यान पिढ्याचे मोल राहती, श्रीमंताचा थाट....२,

    चमचम आली तेज वाढले, नक्षीदार होवूनी
    फसवे ठरले आजकालचे, क्षणक जीवन असूनी....३,

    हासणारी ती फुले बघीतली, आणिक इंद्र धनुष्य
    नक्कल करता निसर्ग कलेची, दिसे त्यात ईश....४,

    ओबड धोबड बटबटती ते, रंग पसरवी सारे,
    कुणा न कळे आधुनिक कला, ही फसती ज्याला बिचारे....५,

    नाद मधूर हा प्रवाह वाहे, हृदयस्पर्शी जो असे
    जीवंत वाटते काव्य सदैव ते, ज्ञान भरले ज्यात दिसे....६,

    अर्थ काय आणि भाव कोणता, उलघडण्याचे कष्ट पडे
    नव काव्याची चाल कशी ही, वाटते सर्वांना कोडे....७,

    जे जे होते सुंदर मौलिक, दृष्टी आड चालले
    सवंगपणा आणि नाविन्यात, आत्मा तोच विसरले...८

    डॉ. भगवान नागापूरकर
    ९००४०७९८५०

      October 19, 2019


  • ज्ञानेश्वराची चेतना

    जीवंतपणी घेई समाधी, ज्ञानेश्वर राजा ।
    दु:खी होऊनी हळहळली, विश्वामधली प्रजा ।।

    सम्राट होता बालक असूनी, राज्य मनावरी ।
    हृदय जिंकले सर्व जणांचे, लिहून ज्ञानेश्वरी ।।

    आसनीं बसत ध्यान लावता, समाधिस्त झाले ।
    बाह्य जगाचे तोडून बंधन, प्राण आंत रोकले ।।

    निश्चिष्ठ झाला देह जरी , बाह्यांगी दर्शनी ।
    जागृत आसती प्राण तयांचे, आजच्याही क्षणी ।।

    संचार त्यांच्या आत्म्याच्या , सदैव होत राही ।
    ज्ञान भुकेल्या भाविकाला, चेतना ते देई ।।

    डॉ. भगवान नागापूरकर
    संपर्क - ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

      February 5, 2017


  • ११ – तूं नियतीचा अधिपती

    तूं सुखकारी, तूं विघ्नारी, तूं नियतीचा अधिपती

    हे गुणदाता, पार्वतीसुता, आधार तूंच जगतीं ।।

    जे खलबुद्धी, सरळ ना कधी, तूं ताडसि त्यां दुष्टां

    पिडतात जनां अन् संतमनां, तूं गाडसि त्या कष्टां

    तूं प्रेमरूप, करुनास्वरूप, तुजमुळेच सुखदीप्ती ।।

    जोडुन हातां, टेकुन माथा, जनगण तुजला नमती

    फुंकून शंख, गर्जून मंत्र, जग करी तुझी आरती

    वाजे डंका, अन् आशंका मनिं कांहीं नच उरती ।।

    मी हतभागी, अंधार जगीं, पुढला ना मार्ग दिसे

    वाटेवरती काटे रुतती, दुर्भाग्यभुजंग डंसे

    देइ अनंता धरुन हात आनंदमयी मुक्ती ।।

    - -

    - सुभाष स. नाईक

      August 23, 2017


  • देह मंदीर

    शरीर एक साधन, साध्य करण्या प्रभूला
    ठेवूनी ती आठवण, चांगले ठेवा देहाला...१

    व्यायाम व आहार, असतां नियमित
    सुदृढ ते शरीर, असते मग बनत...२

    सुदृढ असता देह, करावे मनाला शांत
    टाळत असतां मोह, न येई तो भावनेत...३

    षडरिपू हे विकार, काढा विवेकांनी
    निर्मळ ठेवा शरीर, पवित्रता राखूनी...४

    देह आहे मंदीर, गाभारा तो मन
    आत्मा तो ईश्वर, आनंद देई आंतून...५

    डॉ. भगवान नागापूरकर
    ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

      June 21, 2017


  • तू फक्त तुझे चंद्र आवर …

    खुसखुशीत भाषेत नेमके व्यक्त करण्यात हातखंडा आहे ह्यांचा !

      May 29, 2017


  • सती व्रत

    आसक्ती सोडून सारी
    पार्वती पूजिते शिवाला..
    माथ्यावर चंद्र शीतल
    नृत्य तांडव शिव लीला..

    उपेक्षा नसावी म्हणून
    पार्वती स्थापिले शिवलिंग..
    लिंपण त्यास फुल पत्रीचे
    स्विकारावे तिला अर्धांग..

    ललाटी त्रिनेत्र स्थान
    गळ्यात डोले भुजंग..
    थंडी पाऊस वारा जरी
    सतीचे व्रत अभंग

    पार्वतीचे एक मागणे
    शिव हाच लाभावा वर..
    वैराग्याचा शेला सुंदर
    शिवशक्तीचे मिटावे अंतर

      July 23, 2026


  • गंध व्हा

    गंध व्हा, उधळा स्वतःला
    फूल आधी व्हा तुम्ही
    रंगवुनी ह्या जगाला
    इंद्रधनुषी व्हा तुम्ही

    उजळण्या हे विश्व सारे
    उजळणारी ज्योत व्हा
    ज्योत म्हणुनी मिरवताना
    राख बनण्या सिध्द व्हा

    विश्व सारे उजळताना
    ज्योत जळते अंतरी
    प्रेमपक्षी फुलवताना
    चंद्र झुरतो अंबरी

    व्हा प्रकाशी गा मनाशी
    गीत व्हा विश्वातले
    जीवनाचे व्हा प्रवासी
    शब्द व्हा गीतातले

    कोवळे ऊन व्हा
    अन् बरसणारा मेघ व्हा
    घन तमाला छेदणारी
    ती विजेची रेघ व्हा

    - हेमंत बर्वे

      January 18, 2023


  • माझे पणाची जाणीव

    एका मोठ्या कारखान्याचा मालक,

    भासत होता छोट्या विश्वाचा चालक

    लाखो रूपयाची उलाढाल रोज होत होती,

    मागणी, पूरवठा, उत्पन्न याचा बनला होता त्रीकोण

    उत्पन्नानी घेतला होता उंची वरचा कोन,

    लक्ष्मी मालकावर प्रसन्न होती,

    खातां आलं असतं तर प्रत्येक जेवणांत

    पाव किलो सोनं आणि तोंडी लावायला चार हिरे

    पण नशीब दुर्दैवी बिचारे,

    मधूमेह आणि रक्तदाब होता त्याला,

    वर्ज्य केल होत साखर व मिठाला

    नाचणीची भाकरी व उकडलेल्या अळणी

    भाज्यांमधून शोषित होता जीवन सत्व.

    जगण्यासाठी आहार नियंत्रण

    समजला होता हे तत्व.

    वात पित्ताची प्रकृती त्याची.

    थंड पाणी थंड हवा यांचे पासून दूर राहण्याची.

    लाकडाच्या टणक फळींचा केला होता खास पलंग,

    कारण मऊ गादीमुळे ठणकत होते त्याचे अंग,

    आणि त्याच पलंगावर बसून नैसर्गिक हवा व प्रकाशामध्ये,

    कंपनीच्या लाखो रूपयाच्या Balance Sheets वर

    व चेक्सवर स्वाक्षऱ्या करित होता.

    पाने मागे पुढे चाळीत होता,

    मध्येच मान वर करून बघत होता,

    विचारत होता, समजल आहे हे दाखवित होता,

    हिशोब तपासनीस, सेक्रेटरी, पर्सनल मॅनेजर

    सारे उभे होते सभोवताली.

    माना त्यांच्या झुकत होत्या,

    शब्द त्याचे ते उचली,

    कसला तरी आंतरीक अभिमान अहंकार

    चेहऱ्यावर चमकत होता.

    आपल्या एका स्वाक्षरीमध्ये लाखो रूपयाच्या

    उलाढाली सहजगत्या होण्याची ताकद आहे

    या जाणीवेने, मध्येच थांबून सेवकाने टेबलावर ठेवलेले

    लिंबू सरबताचे घोट पित होता... सरबत....

    स्वच्छ निर्मळ पाणी त्यांत लिंबाचा रस.

    साखर मिठ वर्ज्य असलेले,

    हा भोगत होता आणि इतर उपभोगात होते,

    तरी देखील हे सारे माझे आहे,

    हीच खोलवरची जाणीव त्याला जगवीत होती..

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

    bknagapurkar@gmail.com

      June 7, 2016