(User Level: User is not logged in.)

कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • विष्ठा

    विष्ठा बघूनी थुंकलो, घाण वाटली मजला
    अमंगल संबोधूनी, लाखोली देई तिजला....१,

    संतापूनी मजवर , कान उघडणी केली
    तुझ्याचमुळें मुर्खा मी, अमंगळ ती ठरली, २

    आकर्षक रूप माझे, लाडू करंज्यानें युक्त
    कपाटातूनी काढूनी, केले सारे तूंच फस्त ३

    परि मिळतां तुझा तो, अमंगळ सहवास
    रूप माझे पालटूनी, मिळे हा नरकवास ४

    डॉ. भगवान नागापूरकर
    ९००४०७९८५०

      May 15, 2019


  • क्षण भाळीचे

    अस्तित्वाचा क्षणभंगुर भरोसा

      October 6, 2021


  • निरोप द्या आतां (राघवाची गाथा)

    राम : ( दशरथाला) –
    शोक आवरा अपुला, आणिक निरोप द्या आतां
    करील तुमची वचनपूर्ति हा सुत मोदें, ताता ।। १

    ब्रीद हेंच आपुल्या कुळाचें –
    ‘वचन दिलेलें पाळायाचें’
    माझ्या प्रेमापोटीं कां कर्तव्याला चुकतां ? २

    वचनपूर्तता तुमची व्हाया
    सिद्ध असे मी वनात ज़ाया
    भाग्य म्हणूनच मला लाभला तुम्हांसमान पिता ।। ३

    पुत्रनीति जी आहे सक्षम
    पितृसुखा ती देइ अग्रक्रम
    गुरुजन, ज्ञानी, मुनी दुजोरा देती याच मता ।। ४

    लोभ नसे राज्याचा मजला
    पहा मुगुट हा लगेच त्यजला
    राहो आनंदात त्यामुळे कैकेयी माता ।। ५

    नको रडूं कौसल्या-माते
    तात विनंती, पुसा नयन ते
    राज्य अयोध्यानगरीचें भोगो माझा भ्राता ।। ६

    द्या भरताला हें सिंहासन
    वराप्रमाणें, द्या मजला वन
    यत्न फोल हा थांबविण्यांचा मज जातां-जातां ।। ७

    दिनरातीं मज नका आठवूं
    कुणां भेटण्यां नका पाठवूं
    चौदा वर्षें झाल्यानंतर येइन मीच स्वत: ।। ८

    आशिष गुरुजन-आप्तेष्टांचे
    चरण वंदुनी निजमातांचे
    निघतो मी तात्काळ काननीं, क्षणहि न घालवितां ।। ९

    ही मज वाटत नाहीं शिक्षा
    सुतधर्माची आज परीक्षा
    लागल्यास अर्पीन प्राण, राज्याची काय कथा !! १०

    - सुभाष स. नाईक

      April 22, 2021


  • नक्कीच कुणाततरी हरवावं!

    नक्कीच कुणाततरी हरवावं!
    नक्कीच कुणी तरी आवडून जावं!
    नक्कीच कुणाच्या आठवणीत रहावं!
    नक्कीच कुणाच्या मनात मिटून जावं!
    नक्कीच कुणाच्या हृदयात राहावं!
    नक्कीच कुणाच्या प्रेमात पडावं...
    आयुष्य क्षणभंगुर आहे...आज आहे पण उद्याच कुणी बघितलं आहे!! राग यावा तसा लोभ असावा.... माया, ममता, जिव्हाळा जीवनात अंतरी ठेवावा...प्रेम तर सुखद, सुंदर भावना नक्कीच तिच्या, त्याच्या प्रेमात पडावं...तिच्या बोलण्यात, लाजण्यात, स्वरात,शब्दांत, हास्यात मधुर भावनेच्या ओल्याव्यात नक्कीच प्रेम करावं... आज मी आहे उद्या असेल का ? हे प्रत्येक व्यक्ती बाबत सत्य आहे....!
    कुणाशी 2 शब्द आपुलकीने बोला, त्यात प्रेम असतं.. कुणाचं भरभरुन कौतुक करा त्यात प्रेम असतं... कुणाची निखळ तारीफ करा त्यात प्रेम असतं.... नाजूक कळीवर प्रेम करा...सुंदर फुलांवर प्रेम करा... उधाणलेल्या सागरावर प्रेम करा... कोसळणाऱ्या धबधब्यावर प्रेम करा... गंधित फुलांवर प्रेम करा.. माणसांवर प्रेम करा.. निसर्गाने मुक्त उधळण केली आहे..
    त्या सगळ्यावर प्रेम करा... मनुष्य जन्म दुर्मिळ असा मग राग नकोच तर प्रेमाचा गंध हवा...
    केलं तर प्रेम आहे आणि तेच सुंदर आहे....!

    -- स्वाती ठोंबरे.

      November 30, 2021


  • हे कराल का ?

    कशासाठी जगतो आपण,

    विचार तुम्हीं करतां कां ?

    मृत्यू येई तो जगावयाचे,

    हेच धोरण समजतां कां ?

    खाणे – पिणें वंश वाढविणे,

    हेच जीवन असते कां ?

    ऐष आरामी राहूनी तुम्ही,

    देहासाठी सारे, हे मानता का ?

    पाठीं लागूनी धनाच्या त्या,

    बरोबर संपत्ती न्याल कां ?

    पैसा मुलांसाठी ठेवून ही,

    शिव्या त्यांच्या चुकवाल कां ?

    सारे कळूनी वळत नसते,

    तत्व हे जाणून घ्याल कां ?

    उपयोग करूनी ज्ञानाचा,

    जीवन चांगले कराल कां ?

    सारे आहे प्रभूचे समजून,

    शांत चित्ताने जगाल कां ?

    दया क्षमा शांती हे गुण,

    अंगी आपुल्या बाणाल कां ?

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

      July 29, 2020


  • नाम मार्ग

    ईश्वर आहे नामांत परि,

    नाम कुणाचे घेता?

    विठ्ठल हरि पांडूरंग वा

    अल्ला येशू असतां ।।१।।

    असंख्य त्याची नामे असतां

    एकच आहे भगवान ।

    कांहीही म्हणता येईल तो,

    त्याची करीतां आठवण ।।२।।

    आठवणीतच तो लपला आहे,

    दिसत नाही कुणा ।

    रुप कुठलेही स्मरा,

    दिसेल तुमच्या नयना ।।३।।

    रंग रूप आणि आकार देणे,

    असते सोई साठी ।

    एकाग्र करण्या चंचल चित्ता,

    सारे कामी येती ।।४।।

    निर्गुण निराकार भासतो,

    एकाग्र होता चित्त ।

    नाम मार्ग हे लय आणूनी,

    हेच असते साधीत ।।५।।

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

    bknagapurkar@gmail.com

      May 25, 2016


  • स्वप्न आणि जागेपण

    एक ती झोप स्वप्न बघत राही
    शिणवून शरीर ताप जीवास सुख देई

    स्वप्न जाई विसरुन जाग येता मनां
    जागे मन स्वप्नांत भासवी वेगळेपणा

    एकाच मनाच्या दिसे ह्या दोन भुमिका
    भिन्नता त्यांत भासे जाऊन दोन टोकां

    स्वप्न आणि जागेपण देहाच्या दोन स्थिती
    नाण्याच्या बाजू दोन एकमेका न मिळती

    डॉ. भगवान नागापूरकर
    २४- १११२८३

      September 28, 2014


  • दृष्टी

    व्यास क्रिएशनच्या प्रतिभा दिवाळी २०२० च्या अंकामध्ये प्रकाशित झालेली वैभव दळवी यांची हि कविता

      December 23, 2023


  • गॅगरीन !

    जुलैच्या शेवटच्या आठवड्यात वरुणराजाने अख्ख्या महाराष्ट्राला अक्षरश: झोडपून काढले. या विक्रमी पावसाने मुंबई आणि कोकणाची पार वाताहत केली. विदर्भातील काही भागालाही मोठा फटका बसला.

      August 21, 2005


  • असे दान द्यावे की

    असे दान द्यावे की,
    समोरचा अचंबित व्हावा,
    मापे भरून ओतावे,
    हात ओसंडून वहावा,
    करावे रक्तदान सारखे,
    रुग्णांसाठी ते जीवनदान,
    अन्नदानासारखे पुण्य नसते, भुकेल्याला करते तृप्त,
    विद्यादान श्रेष्ठ दान,
    सरस्वती प्रसन्न होई,
    दुसऱ्याला दिल्याने ज्ञान,
    आपुले बघा वाढत जाई
    कला दान करता आपण,
    निर्मितो एक कलाकार,
    सेवा तिची करत करत,
    जिवंत,ठेवेल कला तर ,
    अवयव दान केल्याने पण,
    एका असहाय्य वरच उठे ,
    अशा रुपे जगतो माणुस,
    पुन्हा जसे जगाया मिळे, नेत्रदानाची महती सगळी,
    डोळस होतात काही अंध,
    दुनिया बघत बघत सगळी,
    आनंदे बागडती स्वच्छंद,
    शरीर त्याचे- डोळे आपुले,
    दृग्गोचर होण्या आपली दृष्टी,
    नजर करून पुन्हा पारखी,
    वेगळीच सारी भासते सृष्टी,
    निसर्ग देतो जसे भरभरून',
    अलोट, असीम दानाचा सागर,--
    दातृत्व दाखवावे लुटून-लुटून,
    उदारतेचेच व्हावे आगर--!!!

    हिमगौरी कर्वे.©

      May 24, 2019