जीवन सांगता

झाकोळलेले आभाळ, गतस्मृतींचेच कृष्णमेघ



झाकोळलेले आभाळ
गतस्मृतींचेच कृष्णमेघ
झरझरणारी सुखदुःखे
धून वेणूची मधुर मंजूळ ।।१।।

अंतर्मुख झाल्या भावनां
जे , जे भोगले ते संचित
दृष्टांत साराच प्रारब्धाचा
सत्कर्मीच रचावी ओंजळ ।।२।।

भाग्यवंती जन्म मानवाचा
मनामना नित्य सांधण्याचा
विवेकी ! भावप्रिती भाळी
सांगता जीवनाची सोज्वळ ।।३।।

©️ वि.ग.सातपुते.(भावकवी)

9766544908

रचना क्र. ८३

२२ – ६ – २०२१.

Author