(User Level: User is not logged in.)

कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • बदनाम

    सितेसाठीच रामालाही

    आज बदनाम केले आहे

    श्रीकृष्णाला गोपिकांनीच

    आज बदनाम केले आहे

    लक्ष्मीनेच तर सरस्वतीस ही

    आज बदनाम केले आहे

    महाभारता द्रोपदीनेच

    आज बदनाम केले आहे

    देवांनाही इंद्राने त्या

    आज बदनाम केले आहे

    कलियुगाने माणसालाच

    आज बदनाम केले आहे

    कवी – निलेश बामणे

    202, ओमकार टॉवर, बी – विंग, गणेश मंदिरा जवळ, श्रीकृष्ण नगर, संतोष नगर, जन.ए.के.वैद्य मार्ग, गोरेगांव ( पूर्व ), मुंबई – 400 065.

    मो. 8652065375 / 8692923310

    Email- nileshbamne@yahoo.com

    nileshbamne10@gmail.com

      June 30, 2016


  • लोभस चांदणे

    चंद्र आज एकला नभी उगवला ।

    रात पुनवेची मधूर भासला ।। १

    मेघांचा गालीचा आज नाहीं दिसला ।

    शितल वारा अंगी झोंबू लागला ।। २

    उलटून गेली रात्र मध्यावरती ।

    लुक लुकणारे तारे आतां दिसती ।। ३

    पेटल्या गगनीं असंख्य फुलवाती ।

    तीव्र-मंद प्रकाशानें त्या चमकती ।। ४

    त्या असंख्यात चंद्रमा एकची सापडे ।

    जो लोभसवाणा म्हणूनी सर्वा आवडे ।। ५

    उघडूनी देई मनाची प्रेम कवाडे ।

    निघूनी जाई रात बघतां त्याजकडे ।।

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

      March 19, 2021


  • नाजूक वेली

    नाजूक नाजूक वेली मनीं तु माझ्या बसली //धृ//

    हिरवी साडी अंगावरी खडी रंगीत किनारी

    ठिपके चमकती पांढरे त्या साडीवरती पसरे

    आकर्षक साडी नेसली //१//

    नाजूक नाजूक वेली मनीं तु माझ्या बसली

    शरीर तुझे बांकदार रुप तुझे मनोहर

    चपळाईने तूं वाढते दूर जाण्या झेपावते

    वाकड्या चालीत शोभली //२//

    नाजूक नाजूक वेली मनीं तु माझ्या बसली

    मिष्किलपणें तूं हासते विनम्रतेने वाकून जाते

    पसरवूनी तुझा सुगंध करी सर्वाना तूं धुंद

    राणी ठरतेस बागेमधली //३//

    नाजूक नाजूक वेली मनीं तु माझ्या बसली

    बघूनी नभीचे तारे भेटण्या तुझे मन हावरे

    परि खंत वाटे तुजला आधार हवा चढण्याला

    नको उंचावू इच्छा आपुली //४//

    नाजूक नाजूक वेली मनीं तु माझ्या बसली

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

    bknagapurkar@gmail.com

      November 26, 2017


  • बाळ चिमुकले

    बाळ चिमुकले,
    गोड हासले,
    रांगत आले ,
    पायाला धरुनी,
    उभे राहिले,
    बाळकृष्ण ते,
    मला भासले, --
    वदनांतून कोवळे,
    ध्वनि उमटले,
    बोबड्या स्वरांनी,
    मज जिंकीयले,
    उचलून घेता ,
    कसे आनंदले,
    हात हलवून ,
    मज कुरवाळले,
    कोण लहान,
    मग वाटले,
    कुशीत त्याच्या,
    मीच शिरले ,
    हलके हलके,
    त्याने थोपटले,
    गा,---गा कर ,
    मज म्हणाले,
    निश्चिंत जीव,---!!!
    निश्चिंत मन ,-----!!!
    मज विश्वरूपदर्शन,
    अलगद घडले,--!!!!

    हिमगौरी कर्वे.©

      May 27, 2019


  • निघून जाते आयुष्य

    निघून जाते आयुष्य खिसे आपुले भरताना

    वेळ जाते निघून दिवस रात्र धावताना

    हरवून गेले आहे सारे सुख विकत घेताना

    क्षणभर हसणे सुद्धा महाग झाले लोकांना

    विसरलीत नातीगोती सारे जवळ असताना

    धावपळीचे आयुष्य निमूटपणे जगताना

    आयुष्य आहे सुरेख कुणीच पाहत नाही

    नुसती दगदग सुरु वेळ कुणाजवळच नाही

    बसून मित्रांसोबत आज कुणी बोलत नाही

    सुखामागे धावताना माणूस आज हरवला आहे

    हातच सुख सोडून दुःखामागे लागला आहे

    आयुष्य काय आहे आज कुणाला कळले नाही

    जगण्याचे गुपित कोडे कुणालाच उमजले नाही..

    मधु दारसेवाड...

      May 30, 2022


  • जळजळीत वास्तव

    ग्रामीण महाराष्ट्रातली युवकांची आजची मानसिकता आणि त्याचे होणारे परिणाम यावर भाष्य करणारा आणि जळजळीत अंजन घालणारा हा लेख.

      June 8, 2017


  • मौलीक शब्द

    भावमनीचे उमटूनी पडती ज्याचे सहवासे

    काव्यामधला ईश्वर मजला तोच परि भासे

    शब्द तयाचे ऐकत असता मन येते भरूनी

    शब्दांना त्या बांध घालता काव्य पडे उमटूनी

    अनूभव ज्याचा वदला जातो कंठा मधूनी

    भोगलेला असे परि तो एके काळी त्यांनी

    सत्य सारे तेथे असता दिव्यत्वाची जाण

    म्हणूनच पटते मनास तेंव्हां हेच खरे जीवन

    वाचित गेलो धर्मामधूनी जे जे सारे काही

    शिक्षीत नसूनी स्वानूभवे तेच व्यक्त होई

    हेच भासले काव्य मजला साऱ्या जीवनाचे

    उतरत होते लेखणीतूनी बोल अनूभवाचे

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

      March 1, 2020


  • श्रावण मनभावन !

    सण उत्सवाने भरलेला श्रावण,
    चैतन्याने, आराधनेने भरलेला श्रावण,
    सृष्टीच्या नटण्या मुरडण्याचा श्रावण,
    ऊन-पावसाशी लपंडाव खेळणारा श्रावण,
    श्रावण मनभावन !

    देवदेवतांच्या भजन-पूजनात रंगून जाण्याचा श्रावण,
    व्रतवैकल्याने, धार्मिक परंपरेने आत्मबल वाढवणारा श्रावण,
    चांगुलपणा, भाविकता आणि भावुकता जागवणारा श्रावण,
    माणसांना खुलवणार, नाचवणारा, गाणारा श्रावण,
    श्रावण मनभावन !

    नागपंचमी, जन्माष्टमी, नारळीपौर्णिमा,
    रक्षाबंधन, मातृदिन आणि पोळ्याचा श्रावण,
    तरुणी, नाविवाहीतांचा, मंगळागौरीचा श्रावण,
    मन उल्हासित, सुगंधित, आनंदी करणारा असा श्रावण,
    श्रावण मनभावन !

    निसर्गाबद्दलची कृतज्ञता व्यक्त
    करण्याची संधी देणारा श्रावण,
    सप्त रंगाने गंधाने नाहू घालणारा श्रावण,
    श्रावण मनभावन !

    जगदीश पटवर्धन

      September 10, 2015


  • काळजाच्या भेटी

    काळजाच्या भेटी,
    आलीस सई गाठी,
    खूण पटता आत्म्यांची,
    किती आनंदी दिठी,--!!! ||१||

    काळजाच्या भेटी
    आलीस सखे राती
    पूर गप्पांचा येता ,
    वाढत जाय भरती,--!!! ||२||

    काळजाच्या भेटी ,
    आलीस मैत्रिणी,
    जिवांचे दुवे सांधीत,
    घट्ट हृदयाची नाती,--!!! ||३||

    काळजाच्या भेटी,
    आलीस सये पाठी,
    सुखदुःखांच्या हिंदोळी,
    दोघी बसू एकाच झुली,--!!! ||४||

    काळजाच्या भेटी ,
    आलीस तू सहेली,
    सह राहुनी राहुनी,
    केलीस दुःखे हलकी,--!!! ||५||

    काळजाच्या भेटी,
    आलीस माझ्यासाठी,
    तुझ्यातील तू अन् ,
    माझ्यातली मी,
    द्वैतातील अद्वैतासाठी,--!!! ||६||

    हिमगौरी कर्वे.©

      April 2, 2019


  • रचली जाते कविता

    मिळता मजला बाह्य एकांत, छळते गर्दी विचारांची

    मन गुंतविण्या कुणी नसता, चलबिचल होते भावनांची...१,

    शब्द वर्णांचा घेवून आधार, भावना काढी मार्ग आपला

    आविष्कार घडविण्यासाठी, विचार करितो मदत तिला...२,

    शब्दांना नटवी थटवी, ध्वनी लहरी नि सूर गेयता

    अलंकार मिळता अंगी, रचली जाते एक कविता...३

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

      June 29, 2020