(User Level: User is not logged in.)

कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • “मी”

    माणसाचा अहंभाव रसातळाला नेतो. समाजात राहून आपल्या वेगळ्याच भ्रमात राहणा-या लोकांचे परिवर्तन या शब्दपुष्पाच्या माध्यमातून होर्इल अशी आशा बाळगूया!

      July 5, 2012


  • “माणूस”

    उजाड रस्ता,

    मोकळा पण भकास सूर्य

    आणि उध्वस्त दिशा !

    वाट नजरेच्या टप्प्यात आहे ,

    पण पावलंच नाहीयेत ,

    तरीही मला जायचंय

    रांगत का होईना

    मला जायचंय..


    सगळं वाळवंट आहे.

    तप्त उष्ण वाळू,

    चटके बसतायत पावलांना,

    गिधाडं घिरट्या घालतायत.

    पाणी दिसतंय मला ,

    पण फक्त डोळ्यातलं.

    मला पळायचंय

    वाचवायचंय स्वतःला...


    काय सांगतोस ?

    तो पण अडकलाय ?

    अरे रे, तो ही अडकलाय,

    हो मला कळलं

    सगळेच अडकलेत.

    बंधनात,

    नात्यात,

    प्रेमात

    आणि व्यवस्थेत!

    हळूहळू पोखरतेय ती मला.

    कुरतडतेय माझी बोटं,

    बधिर करत चाललीये माझी प्रत्येक नस,

    जेणेकरून मी विसरेन मला,

    मी विसरेन तुला,

    मी विसरेन माणूसपणाला,

    होईन एक प्राणी,

    सर्कशीतला एक प्राणी,

    "माणूस" नावाचा!

      January 13, 2017


  • हळवा एकांत

    तुझ्या आठवणीत
    शब्द विरघळतात
    पाझरतात भावनां
    हळवा होतो एकांत...

    मी आभाळ पहातो
    तरळतेस तूच नेत्रात
    हाच भास विलक्षण
    हळवा होतो एकांत...

    ही सुरम्य प्रीत वेडी
    तुझेच रुप पापणीत
    मी मज भुलुनी जाता
    हळवा होतो एकांत...

    स्मरण तुझेच लाघवी
    नित्य माझ्या अंतरात
    तुजविण सुनेच सारे
    हळवा होतो एकांत...

    --वि.ग.सातपुते.( भावकवी )

    9766544908

    रचना क्र.२०८

    १९/८/२०२२

      September 21, 2022


  • खरा एकांत

    निसर्गाचा अप्रतिम ठेवा, नदीकाठच्या पर्वत शिखरीं ।

    बाह्य जगाचे वातावरण, धुंदी आणिते मनास भारी ।।

    त्याच वनी एकटे असतां, परि न लाभे एकांत तुम्हांला ।

    चित्तामध्यें वादळ उठतां, महत्त्व नव्हते बाह्यांगाला ।।

    खडखडाट सारा होता, दैनंदिनीच्या नित्य जीवनी ।

    समाधानी जर तुम्हीं असतां, शांतता दिसते त्याच मनीं ।।

    एकांततेची खरी कल्पना, मनावरती अवलंबूनी ।

    अंतर्मन शांत असतां, बाह्य एकांत बघेना कुणी ।।

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

      April 25, 2020


  • बहिणीची एक इच्छा

    विसरू नकोस मजला माझ्या भाऊराया
    नाते अतूट असते घे, हे समजुनिया
    आठव सारे बालपण कसे गेले खेळांत
    भांडत होतो, रुसत होतो सारे केले प्रेमांत
    ओवाळणीची तुझी सुपारी ठेवली मी जपुनी
    आठवण होता तुझी मजला काढून बघते पेटीतुनी
    जाणीव आहे मजला संसार जीवनाची
    कर्तव्ये पडली शिरावरी तुझाच संसाराची
    खूप प्रेम दे वाहिनीला संसार कर सुखाने
    काढून ठेव अल्पसे प्रेम देण्या मज त्या साठ्यातुनी
    वर्षातून एके दिवशी बांध राखी प्रेमाची
    स्वार्थी आहे रे मी काढते तुझाच आठवणी

    डॉ. भगवान नागापूरकर

    संपर्क - ९००४०७९८५०

    bknagapurkar@gmail.com

      November 8, 2016


  • नातं इतकं सुदंर असावं

    भेटावसं वाटलं तर भेटता यावं,
    कुठलंच कारण न लागावं.
    मनात आलं, हसू उमटलं,
    आणि दार आपोआप उघडावं.

    न सांगताही सगळं कळावं,
    नात्यात शब्दांची गरज नसावी.
    हक्क नको, अटी नको,
    फक्त आपुलकीची ओढ असावी.

    ना अपेक्षांचा ओझं असावं,
    ना गैरसमजांची भिंत.
    भेटावसं वाटलं तर भेटता यावं,
    नातं इतकं साधं… सरळ… नितांत सुंदर असावं.

    * कीर्तिराज आगलावे

      July 13, 2026


  • मिष्किल तारे

    चमकत होते अगणित तारे, आकाशी ते लुक लुकणारे

    लक्ष्य वेधूनी घेतां घेतां, फसवित होते आम्हांस सारे....१

    कधी जाती ते चटकन मिटूनी, केंव्हां केंव्हां दिसती चमकूनी

    खेळ तयांचा बघतां बघतां, चित्त सारे गेले हरपूनी....२

    एक एक ते जमती नभांगी, धरणीवरल्या मांडवी अंगीं

    संख्या त्यांची वाढतां वाढतां, दिसून येती अनेक रांगी....३

    हसतो कुणीतरी मिश्कील तारा, डोळे मिटतो दुजा बिचारा

    स्थिर राहूनी लपतां लपतां, खेळांचा तो वाढवी पसारा....४

    निशा राणीची मुले ही सारी, खेळत राहती रात्री बिचारी

    उशास बघूनी हसतां हसतां, निघूनी जाती आपल्या घरी....५

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

      January 9, 2020


  • आई नावाची कविता

    हात खंगले भंगले
    या रानाच्या मातीत
    स्वप्न उद्याचे पाहिले
    थोर गर्भार रातीत

    तुडी चिखल अनोनी
    भेगा भिजुनी पायात
    पीकं वाढवी उरात
    ओढ संसारी राबत

    आता माखला संसार
    दही हातानं गाडगे
    उभा जलम घातला
    झाडी संसार वाडगे

    तुझ्या चविष्ट हाताची
    भूल रूतून राहिली
    आई नावाची कविता
    मूक होऊन गायली

    वाट लेकरांच्या वाटे
    डोळे लाऊन पाहते
    दिसे रानात लेकरू
    थेंब डोळ्यात टिपते

    रूपे अनंत दिसती
    पाहू जाता मन भरे
    कधी आटत नाहीत
    मनातील खोल झरे

    नाते तुझेच मातीशी
    माती तुझीच ऐकते
    गावाकडून येताना
    दावण ओढ का घेते?

    मोती उड्या मारी अंगा
    मनी पायाला चाटते
    डेऱ्यातील मऊ लोणी
    तुझे बोटं पाझरते

    -- विठ्ठल जाधव.

    शिरूरकासार, जि.बीड

      November 26, 2021


  • रेणूके जगदंबे आई

    रेणुके जगदंबे आई दर्शन दे मजला

    तुझ्या मंदिरी आलो पावन हो तू भक्तिला ।।धृ।।

    तुझे अजाण बालक करितो खोड्या अनेक

    न होई चित्त एक

    तूंच समजोनी घेई मम चंचल मनाला ।।१।।

    रेणूके जगदंबे आई, दर्शन दे मजला

    जमदग्नीची कांता परशूरामाची तूं माता

    मनीं तुजला भजतां

    आशिर्वाद तूं देई आनंदानें सर्वांला ।।२।।

    रेणूके जगदंबे आई दर्शन दे मजला

    गेले माझे जीवन तुझे नाम घेऊन

    कंठ आले दाटून

    चुका आमच्या होई क्षमा कर अज्ञानाला ।।३।।

    रेणूके जगदंबे आई दर्शन दे मजला

    सारे अर्पिले प्रेमांत आळविले भक्तित,

    परि न कळली रित

    अत:करण गाणे गाई आवाज नसे ओठाला ।।४।।

    रेणूके जगदंबे आई, दर्शन दे मजला

    नको मजला धन विटले आतां मन

    सोडव मोहमायेतून

    चरणांवरी लोळण घेई हात पसरुं कुणाला ।।५।।

    रेणूके जगदंबे आई दर्शन दे मजला

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

      April 14, 2020


  • आपला एकतर पाहिजे (गझल)

    शेवटी साथ जर पाहिजे
    माणसांची कदर पाहिजे

    तूच असशील ज्याच्यामधे
    स्वप्न ते रात्रभर पाहिजे

    जीव तर लावतो गाव पण
    माणसाला शहर पाहिजे

    कर्जमाफी नको उद्धवा
    शेतमालास दर पाहिजे

    जीव होईल वेडापिसा
    फक्त पडली नजर पाहिजे

    फक्त एका क्षणाची नको
    साथ आयुष्यभर पाहिजे

    तू असे चुंब की आठवण
    राहिली जन्मभर पाहिजे

    काल होता हवा पायथा
    आज त्याला शिखर पाहिजे

    जी हवी ती दवा दे मला
    व्हायला बस् असर पाहिजे

    भोवती लाख असतात पण
    आपला एकतर पाहिजे

    - महेश मोरे (स्वच्छंदी)
    9579081342

      October 15, 2020