सुमनांजली या काव्यसंग्रहातून…..
June 3, 2012
नासिकांसमोर हात ठेवा, लागेल तुम्हां गरम हवा
थंड हवा आत जाते, गरम होवून बाहेर येते
अन्न पाणी घेतो आपण, ऊर्जा निघते त्याच्यातून
भात्यापरि फुगते छाती, हवा आत खेचूनी घेती
आतल्या ज्वलनास मदत होते, उष्णता त्यातून बाहेर पडते
भावना जेव्हां जागृत होती, रोमरोम ते पुलकित होती
अवयवे सारी स्फूरीनी जाती, देहामधूनी विज चमकती
धनको ऋणको विद्युत साठे, अलग अलग दिसती मोठे
विजातीय लिंग येता जवळी, परिणाम दिसे विजेचा त्यावेळी
प्रकाश आहे आपल्या देही, ज्ञानीजन तो सहज पाही
स्थिर करूनी चंचल मना, प्रकाश दिसेल हृदयी सर्वांना
उष्णता वीज प्रकाश शक्ती, निसर्गाची रूपे असती.
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
November 18, 2017
आपल्याच आत्म्याचा आहे प्रतिबिंब गणवेश आपला
नसतो झाकण्या तो आपल्या शरिराची नग्नता !! धृ !!
शिकत असता शाळेत घालायचो मी गणवेश रोजच
मिरवायचो दाखवत उडालेली शाई त्यावर !! 1 !!
कवी होताच चढला कवीचा गणवेश अंगावर
झाला मग वर्षाव फक्त कौतुकांचा माझ्यावर !! 2 !!
पुर्वी होता गणवेश माझ्याच अंगावर गरिबीचा
काढताच तो चढला माज मलाच श्रीमंतीचा !! 3 !!
वाटले चढवावेच अंगावरी गणवेश दुसर्यांचे
सावरलेच पाहता मन मग त्याखालील काटे !! 4 !!
झाकतात अंग हल्ली रोज नवनवीन गणवेश माझे
उतरविता ते दिसते मला ही नग्न शरीर माझे !! 5 !!
कवी – निलेश बामणे
92-7 तुषार हिल वेल्फेअर सो. श्रीकृष्ण नगर, संतोष नगर,
जन. अ.कु.वैद्य मार्ग, गोरेगांव ( पूर्व ) ,
मुंबई- 65.
मो. 9029338268
November 28, 2014
निराकार तो असूनी व्यापतो,
सर्व विश्व मंडळ,
सूक्ष्मपणातही दिसून येतो,
करी जगाचा प्रतिपाळ ।।१।।
दर्शन देण्यास भक्त जणांना,
धारण करितो रूप,
तसाच दिसे नयनी तुमच्या,
ध्यास लागता खूप ।।२।।
दृष्टांत होणे सत्य घटना ती,
जीवनी तुमच्या घडे,
वेड लागता प्रभू चरणाचे,
सदैव स्वप्न पडे ।।३।।
कुणामध्येही अस्तित्व दाखवी,
हीच त्याची किमया,
परि टिपून घेई खऱ्या भक्ताची,
दृष्टांताची ही माया ।।४।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
March 4, 2021
श्री. शिव मानस पूजा
September 21, 2010
योजना करी चाऱ्याची, मुख देण्याचे आधी,
तुझ्या दयेची किमया, कळली न कुणा कधीं....१,
बदल करूनी शरिरी, मातृत्वाचे भरतो रंग,
क्षिराचा देई साठा, पुलकित करूनी अंग...२,
सदैव तयार राहूनी, दाना देई भूमाता,
कुणी न उपाशी राही, काळजी घेई विधाता....३,
जन्म देवूनी साऱ्यांना, पोषण तोच करितो
अनंत उपकार करूनी, ऋणी आम्हा ठेवतो...४
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
February 24, 2019
अरडी ग बाई, परडी
रस्त्यावरती गर्दी
ही गर्दी कशाची
ही गर्दी बसची
बस आली बस आली
पकडा पकडा
पुढच्याला मागे ढकला ढकला
असेच होतात अपघात
टाळणे तुमच्या हातात
थांब्यावरती थांबा थांबा
शिस्तीत लावा रांगा रांगा
उतारूंना उतरू द्या
पुढच्याला पुढे होऊ द्या
प्रवास तुमचा होईल छान
समूहाचे ठेवा भान
अंगी बाणा शिस्त शिस्त
शिस्तीवरती ठेवा भिस्त
October 13, 2018
सारेच आहेत दुबळे
कुणाते नसे शक्ति
वेळ येतां दुर्बल ठरे
जे सबळ समजती ।।१।।
विचार मनी येतां
दुसरा शक्तिशाली
समजोनी जावे तेव्हां
हार तुमची झाली ।।२।।
मनाची सबलता
हेच शक्तीचे मापन
काय कामाचा देह
दुर्बल असतां मन ।।३।।
सुदृढ देह व मन
यांची मिळून जोडी
जीवनातील यश
तुमच्या पदरीं पाडी ।।४।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
May 2, 2021
विठु माऊली तू माझी,
माझ्या माय बापाचा कैवारी,
साऱ्या जगताला तारी,
ना थकले करूनी पायवारी….
रथ तूझ्या संसाराचा,
चालवी माझी रखुमाई,
तूझ्या सोबतीने ती उभी,
सौभाग्याचं लेनं लेवूनी….
तुळशीमाळ हार तुझिया गळा,
साऱ्या भक्ता तू लावसी लळा,
मी तुझ्या अंतरीचे लेकरु,
पिकव रे सोनं माझ्या मळा….
– श्वेता संकपाळ.
August 21, 2018
फार गंभीर बनून जगू नका. हे विश्वकरोडों वर्षापासून आहे. कित्येक आले आणि गेले. कुणावाचून कुणाचे काही थांबत नाही. जे व्हायचे ते होत राहणार आहे. तुम्हाला विचारुन काही घडणार नाही.
September 9, 2023
Copyright © 2025 | Marathisrushti