(User Level: User is not logged in.)

कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • अश्रू नदीचे

    मी नदी...
    तुमच्या आईसारखीच...
    फरक एवढाच,
    तिने तुम्हाला जन्म दिला,
    आणि मी तुम्हाला जगवलं...

    हिमशिखरांच्या कुशीत जन्म घेऊन,
    डोंगरदऱ्यांतून धावत आले.
    तुमच्या सुखासाठी माझे आयुष्य,
    हसत-हसत मी वाहत राहिले.

    माझ्या कुशीत खेळलात तुम्ही,
    माझ्याच पाण्यात वाढलात तुम्ही.
    माझ्या काठी स्वप्नं पेरून,
    सोन्याची शेती फुलवलात तुम्ही.

    तहान तुमची मीच भागवली,
    भूक तुमची मीच हरवली.
    तुमच्या प्रत्येक आनंदासाठी,
    माझी प्रत्येक लाट झिजत गेली.

    पण...
    आज माझ्याच लेकरांनी,
    माझ्या कुशीत विष कालवलं.
    कचऱ्याच्या ढिगाऱ्याखाली,
    माझं ममत्वच गाडून टाकलं.

    आज माझ्या लाटा वाहत नाहीत,
    त्या तर निःशब्द रडत आहेत.
    प्रत्येक लाटेच्या हुंदक्यात,
    हजारो वेदना दडल्या आहेत.

    माझे मासे तडफडून मेले,
    पक्ष्यांनी माझी साथ सोडली.
    हिरवीगार किनाऱ्यांची शाल,
    आज विराण वाळूत हरवली.

    मी कधीच काही मागितलं नाही,
    फक्त तुमच्यावर प्रेम केलं.
    तुमच्या सुखासाठी आयुष्यभर,
    स्वतःचं अस्तित्व अर्पण केलं.

    आज मात्र एकच प्रश्न विचारते...

    **आईचं दूध विषारी झालं तर,
    लेकरं कशी जगतील?
    नदीचं पाणीच मेलं तर,
    माणसं तरी कशी वाचतील?**

    अजूनही माझ्या डोळ्यांत आशा आहे,
    अजूनही तुमच्यावर विश्वास आहे.
    माझे अश्रू पुसा...
    माझ्या जखमा भरा...
    माझ्या प्रवाहाला पुन्हा
    निर्मळ श्वास द्या...

    कारण...

    *मी फक्त नदी नाही...
    मी तुमचा श्वास आहे...
    मी तुमचं भविष्य आहे...
    मी जिवंत राहिले तरच,
    तुमचं उद्याही जिवंत राहील...*

    •ॲड.कीर्तिराज शैलेंद्र आगलावे, पुणे ✨
    मो:- 9011841212

      July 10, 2026


  • तू माझाच श्वास तुच

    तू माझाच
    श्वास तुच
    ध्यास तुच
    आस तुच

    तू माझाच
    आहे राम
    घनश्याम
    स्वप्नी शाम

    तू माझाच
    प्रियकर
    युगे युगे
    हा गिरधर

    तू माझाच
    गोकुळीचा
    कृष्णसखा
    मुरळीचा

    तू माझाच
    भेटतोस
    वृंदावनी
    रमतोस

    तू माझाच
    मी तुझीच
    अलगुज
    ही माझीच

    अलगुज
    ही माझीच

    -- सौ. माणिक (रुबी)
    नाशिक

      December 6, 2019


  • इंद्रियें सेवकासम

    खिडकीमधूनी टिपत होतो
    बाह्य जगाचे द्दष्य आगळे
    लोभसवाणें चित्र बघण्या
    आतूर होऊन गेले डोळे

    नयन नव्हते बघत ते
    बघत होतो मीच खरा
    खिडकीसम नयनातूनी
    द्दष्य उमटते आंत जरा

    संगीताचे सूर निनादूनी
    लहरी त्यांच्या उठताती
    कर्णा मधल्या पडद्यायोगे
    आनंद मजला देवून जाती

    मालक असूनी मी देहाचा
    इंद्रिये सारी असती सेवक
    ती केवळ साधने असूनी
    आंतील 'मीच' असे साधक

    मालक असूनी ताबा नसणें
    स्वच्छंदी बनवी सेवकाला
    इंद्रिये ती गोंधळ घालती
    जागृकता नसतां मनाला

    सोडून द्यावी वृत्ति मनाची
    अरोप करणें इंद्रियावरी
    ती तर केवळ सेवक असूनी
    मनाची इच्छा पूर्ण करी

    डॉ. भगवान नागापूरकर
    ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

      March 19, 2019


  • प्रेमाचा निर्मळ झरा

    शब्दांच्या मायावी सागरात
    मुक्त पणे विहरावे...
    उपहासाच्या लाटांना
    हलकेच शिताफीने चुकवावे
    अंतर्मनी विश्वासाचा
    रहावा कायम खोलावा
    विरहाचा खोल भोवरा...
    अलगद पणे चुकवावा
    आनंदाच्या तुषारांनी
    रोमांचित होउन उठावे
    अपमानाचे ते शिंतोडे...
    अलगद पुसून काढावे
    उन्मादाच्या फेसाळ बुडबुड्यास
    व्यर्थ हवा नाही द्यायची
    अहंकाराच्या दगडाची ठेच...
    तटस्थ पणे चुकवायची
    कौतुकाच्या वर्षावांनी
    हर खुन बहकुन नाही जायचं
    वादळी आरोपांच्या कणांनी
    घायाळ नाही व्हायचं
    दुःखाच्या ओल्या वाटांवर
    जरा सावरुन चालायचं...
    वैफल्याच्या शेवाळावरुन
    घसरून नाही पडायचं
    संतापाच्या त्या महापुरानं
    विध्वंस न करता सरावे
    अन् भावनांच्या धबधब्याने
    जख्मी न होता पडावे
    मुक्त बेधुंद वाहताना
    वसा शिस्तीचा नाही सोडायचा
    काठावरचा मायेचा ओलावा...
    नाही कधी वाळु द्यायचा
    मनातील कपटाचा
    सद्-भावनांनी निचरा व्हावा
    अंतरी सदैव प्रेमाचा
    निर्मळ झरा वाहत रहावा...

    - डॉ. सुभाष कटकदौंड

      August 4, 2018


  • तनमन व्याकुळ

    मनाची भाषा मनास उमगते

      August 2, 2021


  • वेळेची किमया

    वेळ येता उकल होते, साऱ्या प्रश्नांची ।

    जाणून घ्या तुम्ही, रीत निसर्गाची...१,

    जेंव्हां यश ना मिळते, एखाद्या प्रश्नी ।।

    वेळ नसे योग्य आली, हेच घ्यावे जाणूनी...२,

    प्रयत्न सारे चालूं ठेवतां, यश ना मिळे ।

    कांहीं काळासाठी थांबवा, प्रयत्न सगळे...३,

    काळ लोटतां प्रयत्न होती, पुनरपि सारे ।

    उकल होऊन गुंत्यांची, आख्खे निघती दोरे...४,

    कुणी म्हणती ग्रह अनूकुल, ह्या घटनेला ।

    हीच तर वेळेची किमया, कशी कळे कुणाला....५

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

      June 4, 2020


  • बलात्कार

     

      November 5, 2013


  • जगा लेकोहो

    आज थोडी भाकरं
    अन कोरड्यास खरडा
    सुगीवाचून कसं मिळंल
    खायाला खमंग हुरडा
    उद्याचे दान काय
    उद्याच्याला सोडा
    आज कशापायी
    ओढता उगा गाडा
    इतभर खळगी भरून
    कशाला हाती घेता गाडगा
    झोपाया थोडी लागलं
    चारखणी वाडा
    चारखणी वाड्यातबी
    निस्ता आरड ओरडा
    कुठं कुणा सुख टोचे
    ईर्षा आणि पाय निसरडा
    उगा खेचू नाही
    वाईच तुमी हेका सोडा
    समजून उमजून ऱ्हाऊ
    चालवू जगाचा छकडा
    नगं उगी चेपून जाऊ
    काळामध्ये भरडा
    माणसं होऊन जगा लेको
    ओलावा ऱ्हाउदे थोडा!
    -- वर्षा कदम.

      April 30, 2022


  • कुमार गंधर्व

    कुमार गंधर्व म्हटलं की मला हेरॅक्लिटसची आठवण यायची. ”तुम्ही एकाच नदीत पुन्हा पुन्हा पाऊल टाकूच शकत नाही; तुम्ही एकदा पाऊल टाकलं की पुन्हा पाऊल टाकेपर्यंत तिचं स्वरुप बदललेलं असतं” असं हेरॅक्लिटस म्हणे. कुमारांचं तसंच काहीसं होतं. त्यांचा एकदा बागेश्री ऐकला की पुन्हा तो तसाच यायचा नाही. अगदी तीच बंदिश असली तरी! ”टेसूल बन फुले, रंग छाये, भंवर रस लेत फिरत मद भरे” ही कुमारांची बंदिश मी प्रत्यक्ष मैफिलीत कितीतरी वेळा ऐकली असेल.

      January 2, 2012


  • सोड मागणी

    मागत होता प्रभूला हात जोडूनी कांही

    भक्तिभाव बघूनी त्याचे मिळत ते जाई

    एका मागून एक मिळे मागणी होता त्याची

    निराश करणे न लगे इच्छा होता भक्ताची

    जे जे बघे भोवती घेतले होते मागुनी

    कशांत दडले सुख उमज येईना मनीं

    देरे बुद्धि देवा मजला योग्य मागण्यासाठी

    समाधानी मी होईन तुझ्या कृपे पोटी

    ज्ञान झाले गंमतीचे सांगे सोड मागणे

    न मागतां मिळाले जे आनंदी केले जगणे.

    -- डॉ. भगवान नागापूरकर

    9004079850 b

    bknagapurkar@gmail.com

      April 2, 2016