गझल – प्रार्थना ही तिला भावली शेवटी

गझल

वृत्त :- स्त्रग्विनी

*लगावली* :- गालगा गालगा गालगा गालगा

प्रार्थना ही तिला,भावली शेवटी
साथ देण्यास ती,धावली शेवटी

पोसली मी जिला रक्त पाजून ती;
नागिणी सारखी,चावली शेवटी

शोधली मी दया गावखेड्यात पण
माझिया अंतरी , घावली शेवटी

कोण येणार अंती बरे सोबती
साथ येणार ती,सावली शेवटी

सोडली साथ मी,काल तीची जरी
हाक देताक्षणी पावली शेवटी

© जयवंत वानखडे,कोरपना



गझल

वृत्त :- स्त्रग्विनी

*लगावली* :- गालगा गालगा गालगा गालगा

प्रार्थना ही तिला,भावली शेवटी
साथ देण्यास ती,धावली शेवटी

पोसली मी जिला रक्त पाजून ती;
नागिणी सारखी,चावली शेवटी

शोधली मी दया गावखेड्यात पण
माझिया अंतरी , घावली शेवटी

कोण येणार अंती बरे सोबती
साथ येणार ती,सावली शेवटी

सोडली साथ मी,काल तीची जरी
हाक देताक्षणी पावली शेवटी

© जयवंत वानखडे,कोरपना

Author