(User Level: User is not logged in.)

कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • कर्तृत्वाला काळ न लागे

    सुचले होते सारे कांहीं , ढळत्या आयुष्यीं ।

    संधिप्रकाश दिसत होता, सूर्य अस्ताशीं ।१।

    काळोखाची भिती उराशीं, लांब आहे जाणे ।

    कळले नाहीं यौवनांत, कशास म्हणावे जगणे ।२।

    समजून आले जीवन ध्येय, चाळीशीच्या पुढें ।

    खंत वाटली जाणता, आयुष्य उरले केवढे ।३।

    विषय सारे अथांग होते, अवती भवती ।

    कसा पोहू या ज्ञान सागरीं, विवंचना होती ।४।

    निराश होऊं नकोस वेड्या, कर्तृत्वाला काळ न लागे ।

    क्षणांत चमकूनी प्रकाश देणें, हीच विजेची अंगे ।५।

    वर्षा येवून निघून जाते, न्हाऊं घाली धरणीला ।

    हिरवे प्रफुल्लित वातावरणीं, आनंद दिसे सर्वाला ।६।

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

      June 11, 2020


  • लज्जा

    साडी चोळी सुंदर नेसूनी,

    आभूषणें ती अंगावरती,

    लज्जा सारी झांकुनी टाकतां,

    तेज दिसे चेहऱ्यावरती ।।१।।

    आत्म्यासम ती लज्जा भासे,

    सौंदर्य जिवंत त्याच मुळें,

    लोप पावतां लज्जा माग ती,

    जिवंतपणा तो कसा कळे ।।२।।

    लपले असते सौंदर्य सारे,

    एक बिंदूच्या केंद्रस्थानीं

    शोध घेण्या त्याच बिंदूचा

    लक्ष्य घालतां उघडे करुनी ।।३।।

    विकृत ती मनाची वृत्ती

    स्वच्छंदीपणात ती असते

    क्षणिक पणाच्या मागें लागून

    खरा आनंद ती गमावते ।।४।।

    डॉ. भगवान नागापूरकर

    संपर्क - ९००४०७९८५०

    bknagapurkar@gmail.com

      March 16, 2017


  • स्मरण असू दे

    हे जगदंबे ! सदैव होते नाम मुखी गे
    लोप पावले आज कसे ते तू मज सांगे.....१

    लागत नव्हते जेंव्हां कांहीं तूज पासूनी
    धुंदीमध्ये राही मी तुझ्याच मधूर नामी....२

    काही हवेसे वाटू लागले एके दिवशी
    विचारांत मी डूबू लागलो त्या सरशी....३

    आनंदाचे वलय निर्मिले इच्छे भोवती
    गुंगूनी गेलो पूरता त्यातच दिन राती....४

    तगमग करूनी तेच मिळविता आज
    कल्पना विलास होता तो झाली ही समज....५

    खिळवू नकोस मनास गे बाह्य जगाभोवती
    स्मरण असू दे तव नामाचे ओठावरती....६

    डॉ. भगवान नागापूरकर
    ९००४०७९८५०

      April 19, 2019


  • कुठे काय

    कुठे काय अन कुठे काय

             पैशाला येथे फुटले पाय 

    दीड-दोन दमडी साठी

    ईमान येथे विकला जाय

    कुठे काय अन कुठे काय

    सत्य झाले मिथ्य, मिथ्यस मानले तथ्य

    मक्कारी दुनिया करे खोट्याचे नेपथ्य

    चौका चौकां मध्ये असत्या चा

    पोवाडा आता गायला जाय

    कुठे काय अन कुठे काय

    जुने गीत, नवीन संगीत

    चोरीस आम्ही नाही भित

    नाविण्य आला नाही संधी

    हुन्नर येथे लयाला जाय

    कुठे काय अन कुठे काय

    कसला छंद, ही कसली धुंदी

    नशेच्या बाजारातील हे सगळे नंदी

    दिवसा ढवळ्या या पोळ्यांचा

    रंगा नाच रचला जाय

    कुठे काय अन कुठे काय

    लोकांचे राज्य, पोसले राजे

    जाे तो स्वार्थाची पोळी भाजे

    तळागाळातील लोकांन साठी

    येथे कोणी वाली नाही

    कुठे काय अन कुठे काय

    तर्काचा बाेध, उत्तरांची शोधा शोध

    विज्ञानाच्या नावे सोडला प्रबोध

    आधुनिकतेच्या पायाखाली

    नैतिकता ही चिरडली जाय

    कुठे काय अन कुठे काय

    नवा दिवस नवीन प्रीत

    रोज हवा नवीन मित

    वासनेच्या लाटेवरती

    मन मात्र पोहोत जाय

    कुठे काय अन कुठे काय

    कुठे काय अन कुठे काय

    सगळच येथे जुनेच हाय

    तुम्हीच तुमचं बघा विनोद बाबू

    बाकी दुनिया भाड मे जाये

    -- विनोद खराडे

      July 16, 2021


  • भटकलेले शिल्पकार

    ॥आम्ही भारताचे शिल्पकार॥
    आम्हीच घडवतो भविष्य
    आम्हीच घडवतो वर्तमान
    नव्या भारताच शिल्पकार
    आम्ही नव्या भारताचे शिल्पकार
    राजनेत्यांचे गुलाम आम्ही
    पत्रकारांचे भक्त साकार
    देशाचे ना आम्हाला काही
    ना स्वप्नांना आकार
    नव्या भारताचे शिल्पकार....
    दंगे घडवु नेत्यांपायी
    फोडु दुसरर्‍यांचे घरदार
    सामान्यांचे आवाज दाबु
    ना करु त्यांना सहकार
    नव्या भारताचे शिल्पकारंं......
    असुरक्षित भारत लक्ष आमुचे
    अयोग्य मतदान
    भविष्यात आमच्या अंधकार
    तरीहि नव्या भारताचे शिल्पकार आम्ही
    नव्या भारताचे शिल्पकार

    — रुग्वेद जानभोर

      March 7, 2021


  • हे माणसा…

    नशीब नाही

    म्हणून ओरडू नको

    नशीब आहे

    म्हणून मान उंचावू नको

    पैसा नाही

    म्हणून रडू नको

    पैसा आहे

    म्हणून जास्त खर्च करू नको

    घरदार नाही

    म्हणून भिक्षा मागू नको

    घरदार आहे

    म्हणून भटकू नको

    दुःख आले आहे

    म्हणून खचू नको

    सुख आले आहे

    म्हणून जास्त उडू नको

    हे माणसा.....!

    काही गोष्टी मिळतात

    काही गोष्टी मिळत नाहीत

    पण तू त्या गोष्टींची जास्त हाव ठेवू नको

    - कौस्तुभ प्रभु

      October 7, 2020


  • जगण्याचे मर्म

    हरवुनी जाता क्षण श्वासासंगे
    आयुष्य, विलया जात आहे
    जीवसृष्टीची जरी ही सत्यता
    मुक्ती जीवाची मन:शांती आहे।।

    क्षणोक्षणी, शिकत जगावे
    गतं न शोकं! सिद्धांत आहे
    जे जे चांगले,ते नित्य स्मरावे
    दुःख, वेदनां प्रारब्धभोग आहे।।

    जीवनी, पेलुनिया आव्हानांना
    संघर्ष करणे हाच पुरुषार्थ आहे
    जन्म मानवी, कृपा दयाघनाची
    तोच एक सद्बुद्धी देणारा आहे।।

    विवेकी, सत्संगात सदा रहावे
    मीत्व सोडुनी जगी जगणे आहे
    केवळ मानवता, हाच एक धर्म
    हेच सत्य जगण्याचे मर्म आहे।।

    जगती, कुणीच कुणाचे नसते
    एकटे येणे, एकटेच जाणे असते
    जे घडते, सारी ईच्छा भगवंताची
    ते आनंदे स्वीकारणे कर्तव्य आहे।।

    -- वि.ग.सातपुते. (भावकवी)

    9766544908

    रचना क्र. ११६.

    १५ - ४ - २०२२

      April 30, 2022


  • पोकळ दिखावा

    सारा असतो फक्त दिखावा
    मृगजळा सारखी सारी नाती

    कुणीच नसते, कधी कुणाचे
    इथे स्वार्थापोटी जुळती नाती

    दिल्याघेतल्याचे हे जग सारे
    त्याविण कां? कुणी सांगाती

    भाव लोचनी भोळे, भाबडे
    भरोसी, जीव जातो गुंतुनी

    गळाभेटी, दिखावा पोकळ
    पण हे सारेच कळते सर्वांती

    विकलांग होती श्वास जेंव्हा
    जीव कासवीस होतो एकांती

    --वि.ग.सातपुते( भावकवी )

    9766544908

    रचना क्र.२६८

    २२/१०/२०२२

      October 28, 2022


  • काळाची झडप

    डोक्यावरी घिरट्या घालीत, काळ सदा फिरतो
    वेळ साधतां योग्य अशी ती, त्वरित झेपावतो...१

    भरले आहे जीवन सारे, संकटांनी परिपूर्ण
    घटना घडूनी अघटीत, होऊन जाते चूर्ण...२

    फुलांमधला रस शोषतां, फूल पाखरू नाचते
    झाडावरती सरडा बसला, जाण त्यास नसते...३

    आनंदाच्या जल्लोशात कुणी, चालले सहलीला
    अपघात घडतां उंचावरी, नष्ट करे सर्वाला...४

    खेळी मेळीच्या वातावरणी, हसत गात नाचते
    ठसका लागून कांहीं वेळी, हृदय बंद पडते...५,

    सतत जागृत असता तुम्हीं, टाळता येई वेळ
    सावध तुमचे चित्त बघूनी, निघून जाई काळ ...६

    डॉ. भगवान नागापूरकर
    ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

      May 13, 2017


  • सुखात येऊ दे स्मरण

    सुखात येऊ दे स्मरण,
    दुःखी विचरता, काही पळें, संकटातून मज सोडवत,
    तुझा हात नित्य मिळे,,---

    पाठबळ असता अविरत, कशासाठी आम्ही घाबरावे,
    प्रार्थित, पूजित तुला सदैव,
    त्राता म्हणुनी भाकावे,--!!!

    तूच बंधू ,तूच सखा,
    तूच रक्षक आमुचा,
    विधाता म्हणत म्हणत,
    दावा करते मी साचा,--!!!

    हे गुरु, हे माय बापां,
    लौकिक या सुखदुःखात,
    दूर करशी अशा व्यापातापा,--
    आमुचा तसा तू पाठीराखा--!!!

    पाप-पुण्याचे हिशोब,
    कर्म शेवट फळ देते,
    जसे ज्याचे असते कर्म,
    तशी मनुष्यजात भोगते,--!!!

    सद्भावना, आचार-विचार, माणुसकीही कृतिशील होते, अहिंसेच्या पडद्याआड,
    शाब्दिक हिंसा सारखी घडते,--!!!

    वास्तू देते आशीर्वाद,
    तथास्तू सारखी म्हणते,
    आई बापात पहावा ईश्वर,
    ती तशीच साक्ष देते,--!!!

    कलहांमाजि ठेवले काय, कोणासही ना कळते,
    विधात्याचे विधीलिखित,
    मग कामास लागते,--!!!

    सत्ता, स्वार्थ, पैसा, अहम,
    जगण्याची झाली सूत्रे,
    काय आहे तुमच्या हातात ,
    कळून येईल क्षणमात्रे ,---!!!

    पाऊस, ओला दुष्काळ, पूर, परमेश्वराची किती साधने,
    जागा नाही होत माणूस,
    जाणत आपुली दुष्कर्मे,--!!!

    हिमगौरी कर्वे.©

      December 30, 2019