मधूर आवाज मिळूनी,
उपकार झाले तिजवर,
सुंदर गाणे गाऊनी,
आनंदीत करी इतर ।।१।।
हातपाय दुबळे होते,
दृष्टी नव्हती तिजला,
कष्ट करण्या शक्ति नव्हती,
कसा मिळेल घास तिला ।।२।।
परि ती होती आनंदी,
गाण्याच्या ओघांत,
उचलित होती पैसे,
पडता तिच्या पदरांत ।।३।।
जरी झाला देह दुर्बल,
जगण्याची होती आंस मनी,
मिळालेल्या आवाजाला,
समजे ती ऋणी ।।४।।
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
March 11, 2016
-- वि.ग.सातपुते.(भावकवी)
9766544908
रचना क्र. १५७
८ - ७ - २०२२
August 7, 2022
हे शारदे ! रूसलीस कां तू, माझ्या वरती ।
लोप पावली कोठे माझी, काव्याची स्फूर्ती ।।
दिनरात्रीं तव सेवा केली, मनोभावें ।
कळले नाहीं आज शब्द ओठचे, कोठे जावे ।।
दिसत होते भाव मजला, साऱ्या वस्तूमध्यें ।
उचंबळूनी जाई मन तेव्हां, नाचत आनंदे ।।
तेच चांदणे तारे गगनी, आणिक लता वेली ।
पकड येईना टिपण्या सौंदर्य, परि या वेळी ।।
जागृत केली मम हृदयांतील, सुप्त जी शक्ति ।
अखंडित वाहूं दे शब्द प्रवाह, हे श्री सरस्वति ।।
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
September 28, 2015
एका अत्याचार झालेल्या स्री ने सांगितलेले दुःख काव्यात मांडण्याचा केलेला छोटा प्रयत्न
July 15, 2019
डांबले उरी, मी दुःखवेदनांना
आज विकल अव्यक्त भावनां
संवेदनांचे सारे स्पर्श वेगवेगळे
दाह अंतरी सोसू कसा सांगना
विधिलिखित! जरी हे ललाटी
भोगूनी संपणार कां? सांगना
सत्कर्मी! चालतोही मी विवेके
तरी अस्वस्थ मन हे कां सांगना
क्षण! तू तर सारेसारे जाणतेस
तरीही तू कां? अबोल सांगना
मीच शोधितो, स्वतःला अंतरी
जीवन! कधी उमगणार सांगना
जीव! हा व्याकुळ आज सारा
कृपावंत! कधी भेटणार सांगना
-- वि.ग.सातपुते (भावकवी)
9766544908
रचना क्र. ५४
२१ - २ - २०२२.
March 8, 2022
एक होती म्हातारी, ती सर्वांना धारेवर धरी
उपास तापास नी सोवळ ओवळ
त्रस्त केल तीन घर सगळ
तिच्यापुढे चालेना कुणाच काही
कारण ती बाबांची होती आई.
-- डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
January 24, 2019
डोक्यावरी घिरट्या घालीत, काळ सदा फिरतो
वेळ साधतां योग्य अशी ती, त्वरित झेपावतो...१
भरले आहे जीवन सारे, संकटांनी परिपूर्ण
घटना घडूनी अघटीत, होऊन जाते चूर्ण...२
फुलांमधला रस शोषतां, फूल पाखरू नाचते
झाडावरती सरडा बसला, जाण त्यास नसते...३
आनंदाच्या जल्लोशात कुणी, चालले सहलीला
अपघात घडतां उंचावरी, नष्ट करे सर्वाला...४
खेळी मेळीच्या वातावरणी, हसत गात नाचते
ठसका लागून कांहीं वेळी, हृदय बंद पडते...५,
सतत जागृत असता तुम्हीं, टाळता येई वेळ
सावध तुमचे चित्त बघूनी, निघून जाई काळ ...६
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
May 13, 2017
मूळ हिंदी कविता ‘ जानती हूँ प्रेम कम-कम हो रहा है ‘ ; कवियत्री- शार्दूला झा नोगजा,सिडनी,ऑस्ट्रेलिया ; मराठी अनुवाद- विजय नगरकर
November 5, 2021
ब्रम्हांडातील ग्रहगोल तारे,नेहमीच मज खुणावत,
गूंज सांगत अंतरीचे, अनामिक ओढ लावत,--!!!
केवढे त्यांचे गारुड हे,
अंतरीची खूण पटत,
त्यांच्यापुढे आपण केवढे,
सिंधुतील अगदी बिंदूगत,--!!!
प्रखर त्यांचे तेज असे ,
भुरळ पाडे चमचम चमक,
हरेक कर्तव्यकठोर असे,
असे प्रत्येकजण बिनचूक,--!!!
आपली जागा ठाऊक असे,
राहती किती स्थितप्रज्ञ ,
अवकाश केवढे मोठे,
धीराने त्यास तोंड देत,--!!!
प्रवास, दिशा, वेळ, ठरे,
प्रत्येकास मिळे जन्मजात,
तेज:पुंज आभाळी चमकणे,
त्यांचे ध्येय उपजत,--!!!
वेळ, परिस्थिती, काळ बदले,
ते आपुल्या स्थानी अटळ, माणसाने किती शिकावे,
अंतर्यामी लावावी अटकळ,--!!!
निरंतर हा प्रवास असे,
सातत्याने काम करत,
फेरे आपुले पूर्ण करती,
मोक्षाची न अपेक्षा ठेवत,--!!!
कामच त्यांचा देव असे
कसला धर्म, जात-पात,?--
समानतेचे धडे देऊनी,
अद्वितीय ते यात्रा करीत,--!!!
© हिमगौरी कर्वे
January 4, 2020
आभाळ आपल आपणच पेलायच
आपल्या वाटेवर आपणच चालायच
कुणाची काठी हवी कशाला
मनगटातली ताकद दिसू दे जगाला
बसतील कधीतरी उन्हाच्या झळा
अन् वाहेल मध्येच बेभान वारा
सावली तेंव्हा तू शोधु नकोस
आडोशाला जाऊन बसु नकोस
उन्हाच्या झळांमध्ये तू रापुन जा
बेभान वाऱ्यामध्ये तू मिसळून जा
सोन नाही का विस्तावात चमकत
सुगंध नाही का वाऱ्याने पसरत
निर्भीड छातीने सगळ झेलायच
आपल्या वाटेवर आपणच चालायच
सूर्य झालास तर अतिउत्तम पण
काजवा मात्र नक्कीच व्हायच..!
आपल आभाळ...
-- धनराज साळवे (Dhanraj Salve)
dhanrajasalve@gmail.com
October 27, 2016
Copyright © 2025 | Marathisrushti