रंगाच्या उधळूनी लाटां, नाचल्या किती गोपिका,
आज पंचमी, रंगात नाहली,
विलक्षण गोकुळाची कळा,||
श्रीहरी नावातच हिरवा,
निळा रंग गगनाचा,
आभाळभर पसरलेला,
रंग शोभे तो निळ्या'चा,
अस्तित्त्व' त्याचे आसमानी,
आणि सखाहरी तो धरणीचा,|| २ ||
गोपिका आज नाचल्या
टाकुनी सगळ्या बंधना
जिवाशिवांचे' बनले ''अद्वैत'''',
विसरून साऱ्या तनांमनां,
कृष्णा'सम तो कोण सवंगडी,
मिळेल त्यांना नेमका,---???
रंगवुनी टाकती, भान विसरती,
माखवुनी टाकती एकमेकां,
समर्पणा'ची 'तऱ्हा'च न्यारी,
गोकुळीचाच, वाजे डंका,---!!!! || ४ ||
सगळ्या एकजीव, एकतान,
एकरूप एकप्राण'
एकमेव ध्येय आणि
एकच ते 'पंचप्राण',----!!!
शरीरे अनेक रंग खूप,
रुपे' -- वेगळी तयांची,
आत्म्या' मधला, एकच कान्हा,
एकच दिसे फक्त श्रीरंग,''''----!!! || ५ ||
खेळती बेधुंद' गोपिका
जशा रमुनी गोकुळा,
तशीच भोगती सर्व,
इंद्रिये इह'-- सुखां,
अतृप्त'खेळे आत्मा,
त्यात सतत सारखा,
होई देहा'चेचगोकूळ'
आत्मा'कृष्णसखा''',!!
हिमगौरी कर्वे. ७७७ ५०८५६५७.
March 10, 2020
स्वागत नववर्षाचे करत, सुखदुःखांच्या संकल्पना, आज नवीन दिन उगवला,
प्रार्थित अजोड नव- अरुणां,--!!!
कल्पना सुखाच्या करत,
दुःखांचे डोंगर मागे सोडा,
साजरा करत आनंद,
समर्थ होऊनी खडे रहा,--!!!
काय दडले काळाच्या पोटात,
तोंड उन -पावसा देण्यां,
सिद्ध असतो हरेक माणूस,
संकटावरती मात करण्यां,---!!!
काय शिकवी गतकाळ,
सुधाराव्यात आपल्या चुका, नियतीचे जे होती लक्ष्य,
त्यांना हात द्यावा नेमका,---!!!
कुरवाळतो आपण अहम्
बाजूला ठेवू या थोडा,
दृष्टी आपली संकुचित,
मोठा दृष्टिकोन ठेवावा,--!!!
माणुसकी आज दुर्लभ,
स्वस्त अस्वच्छतेच्या जागा,
परिसर काय, आपले मन,
लख्ख करत मोकळे जगा,--!!!
निसर्गराजाची नाही किंमत,
माणूस दाखवत स्वार्थ,
हेतू आपले सारे लपवत,
उगीच स्वीकारे परमार्था,---!!!
असती देव - वर्तमान भविष्य,
करू त्यांची यथासांग पूजा,
प्रेमास फक्त प्राधान्य देत,
मनुष्यजन्म नाहीच दुजा,--!!!
© हिमगौरी कर्वे.
January 1, 2020
*म्हण येरे पावसाला *
जेष्ठा मागून आलास तुझे स्वागत आषाढा
म्हण जरा माझ्या सवे पावसाला ये चा पाढा ॥धृ॥
पिण्यासाठी नाही पाणी बघ रिता माझा घडा
नाही पाणी इथे तिथे पाणी नाही फुलझाडा ॥१॥
आस आता तुझ्या पाशी बरसून जा आषाढा
कढ दाटले आशेचे ओल्या झाल्या नेत्रकडा ॥२॥
यक्ष कालिदासाचा तो मेघ दूत त्याचा बडा
सांग त्याला ही रे जरा यक्षप्रश्न माझा बडा॥३॥
परोपरी विनवणी तुला म्हणूनी आषाढा
म्हण जरा माझ्या सवे पावसाला ये चा पाढा ॥४॥
मधु दारसेवाड....
May 29, 2022
समजावू कसे या मनाला
जे शोधिते अजूनही तुला..
आजही लोचनी रूप तूझे..
तुझाच ध्यास या जीवाला..
एकमेकांवरी नि:सिम प्रीती
तुझी न माझी, जडली होती
पाहता , पाहताच एकमेकां
प्रीतीभाव आगळा रुजला..
नि:शब्दुली ! भाषा मनांची
अंतरंगी सारीच प्रीतभारली
कटाक्षी प्रीती, स्मित लाघवी
जगवित होती तनमनांतराला..
जरी निर्व्याज ही सत्यप्रीती
प्रारब्ध्ये दुरावाच हा भाळी
तुजविण सारे निरर्थ जीवन
हाच दुर्दैवी शाप जीवाला..
क्षणक्षण सारे आज हरवले
त्राणही क्षीण , संथ जाहले
सांजवेळी साऱ्या आठवणी
विमनस्क करती जीवाला..
आज प्रश्न ? मी काय प्रार्थू ?
ओशाळले जीवन सारे सारे
घायाळ जाहली जरी स्पंदने
अंती तुझाच ध्यास जीवाला..
©️ वि.ग.सातपुते.(भावकवी)
रचना क्र. ३७
दिनांक:- १० - ३ - २०२१
June 7, 2021
स्त्रीच्या भावनेचा सिटी स्कॅन केला तर
अपमानाच्या असंख्य घटनांचा
धोकादायक साकाळलेला डोह मिळाला असता,
निराशेच्या गंभीर जखमेतील
वाहती वेदना दिसली असती,
अगतिक बैचेनीची आकडेवारी
लक्ष्मण रेषा ओलांडताना दिसली असती
ताटातुटीच्या भयाने वाढलेली गती
अनेक रात्र जागलेल्या आसवांनी
बेफाण पुरात वाहाताना,
कंठात रुतलेले उत्तर दिसले असते
सकारण हारलेले वादविवाद
दयनीय अवस्थेत मिळाले असते
उपेक्षेच्या डंखाचे निशान
त्या मशीनला ऐकू आली असती
कोंडलेल्या हुंदक्यांची आर्तता
रिक्तपणाचे साचलेले मळभाचे घनदाट आकाश
अगतिक रात्रीच्या बदलेल्या असंख्य कुशी
धोक्याच्या निशानीच्या वर पोहचलेल्या,
प्रेम याचनेचा उच्च स्वर आकाशाला भिडणारा
वेदना लपवून ठेवण्याचा चिंताजनक ग्राफ
सहन केलेले टोमणे व टोचून बोलले स्वर
छिन्न भिन्न स्वप्नांचा एक मोठा पुंजका मिळाला असता
अनवरत टिकेचे खोल व्रण दिसले असते
भावना शोधणारी मशीन असती तर
सुहास्य मुद्रे मागील
वेदनेचे सत्य समोर आले असते
-- विजय प्रभाकर नगरकर
(अनुवादित कविता)
मुळ हिंदी कविता- " क्या क्या मिलता "
डॉ मधु चतुर्वेदी, स्क्रिप्ट लेेखिका , मुम्बई
November 7, 2020
सत्य, अहिंसा, साधी राहणी, . महात्मा गांधींची विचारसरणी
तत्वांची सगळ्या किती हेटाळणी,
कोण आणतो सांगा आचरणी, --!!!
असत्याच्या आधाराने,
हिंसक, मारक, वर्चस्वाने,
वागतात पोकळ दिमाखाने, राष्ट्रपुरूषाची मनोरथे"च निराळी,-!
स्वातंत्र्याचा वाईट अर्थ,
सगळे स्वैराचाराचे भक्त,
माणसाचे वागणे नि:सत्व,
गांधींच्या तत्वांना तडा जाई,--!!
सोदाहरणाने राष्ट्रपित्याने, स्वच्छतेचा मार्ग शिकवला,
आम्ही घाणीच्या बुजबुजाटाने,
समतोल निसर्गाचा बिघडवला,-!
घर , गाव शहर परिसरां,
"अस्वच्छ" बघा किती ठेविती,--!!!
बोलू बघू ऐकू नका ,
असे सांगती तीन माकडे,
कोण पाळते तत्त्वांना या,
गिरवती अनिती"चेच धडे,
माणूस म्हणुनी माणसाला,
किंमत मुळी ना देती,--!!!
हिमगौरी कर्वे.
April 1, 2019
कशासवे तुलना करुं गे आई, तव प्रेमाची
कां शब्द न सुचतां म्हणू तुजला, ' प्रेमची ' ।।१
वात्सल्याची देवता, करुणा दिसे नसानसातूनी
हात फिरवीता ज्याचे वरती, ह्रदय येते उचंबळूनी ।।२
जेव्हां पडते संकट, आठवण करितो आपली आई
विश्वासाचे दोन शब्द, उभारी त्यासी देई ।।३
नऊ मास असता उदरीं, शक्ति तेज आणि सत्व देई ते
ह्याच ईश्वरी गुण बिजानी, वाढ तयाची होऊन जाते ।।४
रक्ताचे नाते असतां, प्रेम बंधन दिसे ते
काटा रुजतां तुमच्या पायी, डोळ्यांत तिच्या पाणी येते ।।५
धन दौलत ही असता हाती, मिळेल तुम्हां सारे कांही
आई तुमची एक बिचारी, पर्याय तिजला जगांत नाहीं ।।६
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
February 7, 2020
हात अनेक भवती एक काळजाला भिडत नाही
नाती झाली उदंड, तरी जिवाभावाची साथ नाही
गर्दीचे संमेलन केवढे, पण कोण कुणाला सामील नाही
भेटीगाठींचा वर्षाव सारा, आतड्याला कुणाच्या पीळ नाही
विलगणारे ओठ अगणित. पण हास्याची लकेर नाही
बिलगणाऱ्या शरीरांचा कधी अंत:करणाला स्पर्श नाही
शब्दांचा पाऊस भरपूर पण भिजलेला एकही नाही
विचारांचा वर्षाव तरीही मनाला स्पर्शून नाही.
आण्यांचे व्यवहार सारे त्यात मनाचा व्यापार नाही
सगळे केवळ उपचार त्यात जीवनाचे सार नाही
संपन्नतेचे पेटारे मुबलक त्यात समाधानाची चादर नाही
आपुलकीच्या शोधात फिरणाऱ्या अंतरात्म्याचा आदर नाही
- यतीन सामंत
August 25, 2022
भक्ति करुन प्रभूसी मिळवी, दिसले आम्हा ह्या जगती ।
परि त्याचाच विरोध करुनी, कांही पावन होऊन जाती ।।१।।
लंकाधिपती रावण याने, रोष घेतला श्रीरामाचा ।
जानकीस पळवून नेई, विरोध करण्यास प्रभुचा ।।२।।
झाली इसतां आकाशवाणी, कंसास सांगून मृत्यु त्याचा ।
तुटून पडता देवकीवरी, नाश करण्या त्याच प्रभुचा ।।३।।
प्रभी अवताराचे ज्ञान होते, परि विरोध करीत राही ।
होऊन गेले तेच प्रभूमय, सतत त्याचाच ध्यास घेई ।।
रोम रोम तो शोधत होता, कोठे लपला आहे ईश्वर ।
भक्ति असो वा विरोध असो, तन्मयताच करी साकार ।।
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क – ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
June 21, 2017
उंचावून झेप, नको घेवू उडी
खोल आहे दरी, पाय तुझा मोडी...१
अंदाज घे तूं, खोलीचा प्रथम
यश येई तुला, तया मध्यें ठाम...२
अनुमान काढ, आपल्या शक्तीचे
झेपेल का तें, विचार युक्तीचे...३
निर्णय घ्यावेस, सदा विचारांनी
निराश न होई, त्यामध्ये कुणी....४
जाणून घे तूं, स्वत:ची पात्रता
यश असे पाठी, ज्याची जी योग्यता...५
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
January 19, 2019
Copyright © 2025 | Marathisrushti