गादी चालविते माझी आई,
माझ्याच आजीची,
मला वाटते परंपरा,
ती चाले घराण्याची ।।१।।
रात्रंदिनीचे कष्ट करणे,
हा तिचा स्वभाव,
प्रेमळपणे खावू घालणें,
मनी तिच्या भाव ।।२।।
अधिकाराची नशा तिजला,
शब्द तिचा कायदा,
जुमानत नाही कुणाचाही,
शाब्दीक तो वायदा ।।३।।
प्रेमळपणा असूनी अंगी,
अहंकार युक्त ती,
गुणदोषांनी भरले व्यक्तीत्व,
तसेच पुढे चालती ।।४।।
सोडून द्या तो अहंकारी भाव,
टिकवा प्रेमळपणा,
चक्रामधल्या गुणदोषातील,
गुणच अंगा बाणा ।।५।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८४०
June 26, 2020
May 3, 2022
विजय तेंडुलकर यांनी पेशवाईच्या काळात पुण्याचा कोतवाल राहिलेल्या घाशीराम कोतवाल या व्यक्तिरेखेवर आधारित लिहीलेले हे नाटक पुढे अनेक अर्थांनी गाजलं. महाराष्ट्रीय समाज-जीवनात वादळं निर्माण करून गेलं. १६ डिसेंबर १९७२ रोजी पुण्याच्या ‘प्रोग्रेसिव्ह ड्रॅमेटिक असोसिएशन’ या प्रायोगिक हौशी नाट्यसंस्थेने, महाराष्ट्र राज्य नाट्यस्पर्धेत पुणे केंद्रावर प्राथमिक फेरीत ‘घाशीराम कोतवाल’ या नाटकाचा पहिला प्रयोग सादर केला.
February 27, 2019
मजूराचे मन कष्ट। कंटकांचे जीवन ।
कथावे ते कवण । जीवन वैफल्य ॥ १ ॥
जागा ही पाव पाखा । गेला जन्म आखा।
येथे का लाज राखा । धडूतही नसे ॥ २ ॥
यंत्राशी सांगे नाते । गरगरणारे पाते।
कष्टतो मी स्वहस्ते । त्याले मोल नसे ॥ ३ ॥
करुण हे जीवन। भीषण ते क्रंदन ।
दैन्याचेच प्रदर्शन। असे अजबच ॥ ४ ॥
जन्मभर चाकरी । खावी इमाने भाकरी ।
सत्याची कास धरी । सर्वथा अशक्य ॥ ५ ॥
असत्याचा बडेजाव। भोंदू-दांभिकाला भाव ।
ती मोठेपणाची हाव । सर्वमान्य ठरे ॥ ६ ॥
थाट खोट्याचा काय । महागाई महामाय ।
देवाघरी न्याय मिळणे मुष्किल ॥ ७ ॥
आमचे राहणीमान ग्रंथातले लिखाण ।
पुकारिती आर्तजन । आता धावा ना हो ॥ ८ ॥
- यतीन सामंत
September 15, 2022
March 20, 2016
खिन्न मनानें बसला होता, उन्हांत एका खडकावरी ।
डबके घाण पाण्याचे, वातावरण दुषित करी ।।
किड्या-मुंग्यांचे वारूळ तेथें, आणिक पडला काडी कचरा ।
नजिक येईना वाटसरूं कुणी, बघूनी सारा गालिच्छ पसारा ।।
सोडून देऊनी निवारा , नदीकांठच्या शिखरीं गेला ।
निर्मळ करूनी जागा, आश्रम त्याने एक बांधला ।।
बाग फुलवूनी सुंदर तेथें फळा फुलांना येई बहर ।
राघू मैना मयुर पक्षी, गाऊनी नाचती तालावर ।।
निसर्गरम्य सौंदर्य ठेवा, बाळगला जो त्या परिसरी ।
धुंद राही तो सदैव तेथें विसरूनी इतर जनांपरी ।।
जमू लागले वाटसरू, घेती विसावा कांहींक्षण ।
विनानिमंत्रित येत होते, बघूनी प्रसन्न वातावरण ।।
लाभे प्रभू सहवास त्यांना, निर्मळ देही पवित्र मनी ।
तोच येईल तुम्हा भेटण्या, देह मंदिर केवळ बघूनी ।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
April 9, 2017
कुणाच्या पुस्तकात असते
मोरपिसाची खूण
कुणाच्या आठवणीत असते
केवड्याची चूण
कुणाच्या रुमालावर रेंगाळते
पाखरु कोलनवॉटरचे
कुणाच्या गालाला बिलगते
रेशीम कुरळ्या बटेचे
कुणाच्या ओंजळीत असते
करपलेली पानझड
कुणाच्या पांजळीत असते
हरवलेली पडझड
कुणाच्या डोहात असतो
आर्ततेचा तरंग
कुणाच्या दाहात असतो
निरर्थाचा अभंग
कुणी समईसारखे प्रसन्न तेवत असते
कुणी कापरासारखे जळत असते..!!!
सदानंद रेगे..!
March 2, 2017
रंगले माझे मन मुरारी
नाम येई मुखीं श्रीहरी //धृ//
काळा सावळा रंग
कोमल भासे अंग
हास्य खेळते वदनीं
तेज चमके नयनीं
ओढ लागतां शरिरीं //१//
रंगले माझे मन मुरारी, नाम येई मुखीं श्रीहरी
कंठी माळा चमकती
मोर पिसे टोपावरती
पायीं नुपुरे घालूनी
नाचतो ताल धरुनी
हातांत त्याच्या बासरी //२//
रंगले माझे मन मुरारी, नाम येई मुखीं श्रीहरी
मुरली वाजे मधूर
नृत्य ते बहरदार
खेळातील तुझ्या लीला
छबी राही मनावरी //३//
रंगले माझे मन मुरारी, नाम येई मुखीं श्रीहरी
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
April 16, 2021
जखमी होऊन पिल्लू पडले, घायाळ, केविलवाणे,
करुण आवाजी साद घाले,
आईस बोलावे सारखे,
पक्षीण भोवती घिरट्या घाले, चोचीने त्यास गोंजारी,
कळेना तिला काय जाहले,
कसे पडले ते खाली ,--?
करूण साद ती ऐकून कोणी,
धावत आला दयावंत,
अती गरीब असूनही,
पक्षिणीस भासे देवदूत,
हळुवार हाते पिल्लाला,
जवळ घेऊन कुरवाळी,
साशंक मनाने पक्षीण मात्र,
सारखी हिंडे भोवताली,
नाजुकशा स्पर्शाने जाणवे,
इवल्या पिल्लाच्या शरीरी,
दिसे,-- कांटा रुतलेला,
बघून कोवळ्या पिल्लाला,
त्यांतील होई देव जागा,--!!
पिल्लू सारखे वेदनेने,
तडफडून रडत असे,
पक्षीण घायाळ जखमेवाचून,
तो असहाय्य जीव असे,--!!!
प्राण तिच्या डोळ्यात सारे,
डोळ्यातूनच बोलत असे,
येई कींव दयावंता,
बाजूस करे तो काटा,
वर लावी औषध त्याला,
विचार केवढा मोठा,--!!!
घेऊन जाई घरी पिलास,
पक्षीण येत असे पाठी,
पिल्लू ठेवले कापसात,
उपचार करण्यासाठी,
पक्षीण येई रोज तेथे,
करत मुक्त संचार,--!!!
घास पिल्लाला भरवे ,
आता भरोसा तिला फार,
खूप काळ मध्ये जाई,
पिल्लू तिथल्या तिथे हिंडे,
आईस बघून तेवढे ,
उडण्यास सज्ज होई,--!!!
एक दिवस आला असा,
पिल्लू घरातल्या घरात उडे,
पक्षीण घेऊन जाई त्याला, मानवतेचे देणे केवढे,--!!!
हिमगौरी कर्वे.©
May 19, 2019
November 6, 2021
Copyright © 2025 | Marathisrushti