(User Level: User is not logged in.)

कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • घाणे

    आधी मूळ धाडा
    अष्ट गणेशांना
    इच्छिल्या कार्याला शुभारंभ ।
    आधी मूळ धाडा
    बापुजी देवाला
    घरच्या कार्याला हातभार ।
    आधी मूळ धाडा
    कार्ला गडावरी
    बैसोनी अंबारी येई माते ।
    आधी मूळ धाडा
    सप्तश्रुंगावरी
    भगवतीची स्वारी येई कार्या ।
    आधी मूळ धाडा
    कृष्णेला वाईच्या
    मान आजोळीचा आहे तिचा ।
    आधी मूळ धाडा
    जेजूरी खंडेराया
    बहिणीच्या कार्या पाठी उभा ।

      October 11, 2018


  • चाकोरी

    नव्हतो आम्ही आमचे कधींही बनले जीवन दुजामुळे ।
    कर्तेपणाचा भाव तरीही येतो कां मनी ? ते न कळे ।।
    कसा आलो या जगतीं ठाऊक नव्हते कांही मजला ।
    कसा वाढलो हलके हलके जाण आहे याची मला ।।
    जेंव्हा झालो मोठा कुणीतरी वाटू लागले कांही करावे ।
    काळाने परि दिले दाखवूनी जीवन प्रवाही वाहात जावे ।।
    परिस्थितीच्या काठामधूनी जीवन सरिता वाहात जाते ।
    वाहात असता त्याच दिशेनें इच्छीत ध्येय हातीं नसते ।।
    होते सारे अखेर तेचि आखून ठेवते नियती जे जे ।
    अज्ञानानें समजत राही हे केले मी, अन् हे माझे ।।
    डॉ. भगवान नागापूरकर
    ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

      December 13, 2017


  • गरीबी हटाव

    (सुशीलकुमार शिंदे मुख्यमंत्री झाल्यावर म्हणाले मी मुख्यमंत्री झालो आता मी गरिबांची पूजा बांधणार -)

    स्वातंत्र्य मिळाले
    तेव्हा ते म्हणाले
    गरिबी हटाव!
    त्यानंतर
    कित्येक पंतप्रधानांनी
    आपली गरिबी हटवली
    त्यानंतर कित्येक
    मुख्यमंत्र्यांनी
    आपली गरिबी हटवली
    त्यानंतर कित्येक
    मंत्र्यांनी
    आपली गरिबी हटवली
    त्यानंतर कित्येक
    आमदाराने खासदारांनी
    आपली गरिबी हटवली
    त्यानंतर त्यांच्या कित्येक
    बगल बच्यांनी
    आपली गरिबी हटवली
    स्वातंत्र्य मिळून
    पन्नास वर्षे झाली
    गरिबी कुठे हटली?
    यांची बिचारी गरिबी
    पिढ्यान् पिढ्या
    कधी हटणारच नाही
    गरिबीचे यांनी
    केले कुत्रे
    लाचार लूत भरलेले
    यांच्या गरीबीचे
    कुत्रे मात्र
    लठ्ठ लाचेचा पाव खाते!
    गरीबीचा मंत्र
    जपायचा
    डोळे झाकून
    दुनिया झुकते
    झुकणारी जनता
    गरीबच असते
    दिसते तसे नसते
    म्हणून जग फसते
    गरिबी हटली
    तर श्रीमंती
    राज करील कसे?

    -- विनायक अत्रे.

      July 21, 2022


  • ममतेतील खंत

    भरल्या ह्रदयी ओल्या नयनी

    निरोप देई देवकी माता

    भगवंताचे रक्षण करण्या, विनवी वेडी माया ममता. //धृ//

    आकाशवाणीने बोले श्रीहरी

    देवकीचे तो येईल उदरी

    संहार करण्या दुष्टजनाचा

    ईश्र्वर अवतरे ह्या जगता //१//

    भगवंताचे रक्षण करण्या, विनवी वेडी माया ममता.

    रक्षक सारे निद्रिस्त केले

    कारागृहाचे दार उघडले

    मार्ग दिसे वसुदेवाला परि

    प्रभू शक्तीचे दर्शन धडता //२ //

    भगवंताचे रक्षण करण्या, विनवी वेडी माया ममता.

    उचलून नेई बाल प्रभूला

    नंदाघरी तो ठेवून आला

    चमत्कार तो दिसला नयनी

    खंत कशाला बाळगी आता //३//

    भगवंताचे रक्षण करण्या, विनवी वेडी माया ममता.

    डॉ. भगवान नागापूरकर

    संपर्क - ९००४०७९८५०

    bknagapurkar@gmail.com

      February 27, 2017


  • तुजकडे पाहुनी मज

    तुजकडे पाहुनी मज,
    गूढ काही वाटते,
    ऊन सावली खेळ,
    मनात, काहीसे दाटते,--!!!

    तुझी चौकोनी नक्षी,
    नजर फिरवी चोहीकडे,
    आपल्यापल्याड काय चालते, लपवून ती दर्शवते,---!!!

    काही दरवाजे उघडे,
    का ठेवले कोणासाठी,
    कोण तेथे वावरे,
    कोण तिथे, संगती सोबती,--!!!

    किरण प्रकाशाचे येती,
    सावल्यांशी खेळत खेळत,
    अस्तित्व कोणाचे असे,
    कुणामुळे पसरत पसरत,--!!!

    सुख दुखांचे शब्द ऐकशी,
    जरी भले तू गवाक्षां,
    निमूट सारे का ऐकून घेशी,
    रडे ओरडे आणि संघर्षा,---!!!

    किती भावनिक गुंता,
    असेल तुझ्या देखत जाहला ताटातूट किती नात्यांची,
    हा परिसर करून गेला,---!!!

    कोण कळवळला, कोण नाचला, कोण आनंदे गहिवरून उठला,
    उद्ध्वस्त होऊनी कोसळला,
    काय कधी आणि कसे वागला, किती हिशोबांचा साक्षीदार तू
    अचल तिथे तू खडा राहिला,---!!!

    भासतोस निर्जीव जरी,
    किती गुंतले तुझ्यात धागे,
    तूही कोणात असा गुंतशी,
    हिशोब सारे ठेवून मागे,--!!!

    हिमगौरी कर्वे©

      June 17, 2019


  • तुझ्या विना

    माझ्या भावाची बायको, म्हणजे माझी वहिनी, हीच्या हाताचे हाड मोडले आणि plaster मध्ये आहे हात. त्या वर माझ्या भावाने एक कविता बनवली आहे. वाचनीय आहे

      July 25, 2017


  • मुक्तक-दशपदी

    झालं इलेक्शन
    व्होट-कलेक्शन.
    एक पार्टी हरली
    एक जिंकली.
    पण कुठेतरी
    माशी शिंकली ;
    आणि, लागली
    भलत्याच भिडूच्या माथीं,
    सोनेरी सत्तेची टिकली.

    - सुभाष स. नाईक

      August 25, 2018


  • बागेतल्या तारका

    बागेमधला निसर्ग सारा टिपत होतो मी

    रात्र पडूनी चंद्र आकाशी बाग झाली रिकामी १

    बाकावरती बसून एकटा मोजत होतो तारे

    लुकलुकणारा प्रकाश तो अंक चुकवी सारे २

    अगणित बघुनी संख्यावरी प्रसन्न झाले मन

    किती वेळ तो निघूनी गेला राहिले नाहीं भान ३

    शितलेतेच्या वातावरणीं शांत झोप लागली

    नयन उघडतां बघितले मी पहांट ती झाली ४

    गेल्या निघूनी सर्व तारका आकाशाला सोडूनी

    शोधूं लागले नयन माझे त्यांना सर्व दिशांनी ५

    चकित झालो फुले बघुनि मी सुंदर फुललेली

    सुचवित होती मिष्कीलपणें का तारकांच खाली ? ६

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

      March 3, 2020


  • परमोच्य बिंदु

    ऊर्जा शोषत असतां पाणी

    उकलन बिंदूवर येते

    पाण्याचे रुप बदलूनी

    बाष्प त्यांतून निघूं लागते

    एक सिमा असे निसर्गाची

    स्थित्यंतर जेव्हां घडते

    एक स्थीति जावून पूर्ण

    दुजामध्ये ती मिळून जाते

    तपोबलाची ऊर्जा देखील

    प्रभूमय ते सारे करिते

    परमबिंदूचा क्षण येतां

    साक्षात्कार तुम्हां घडविते

    तुम्ही न राहता, तुम्ही त्या वेळीं

    ईश्वरमय होऊन जाता

    सारे परि ते तेव्हांच घडते

    परम बींदूला जेव्हां पोहंचता

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

      March 3, 2021


  • छत्रपतीचा जयजयकार

    मराठदेशाच्या मातीचा गर्जा जयजयकार
    मराठियांच्या छत्रपतीचा गर्जा जयजयकार ।।
    उन्नत दुर्गम सह्यकड्यांचा
    निबिड वनें, बेलाग गडांचा
    जलदुर्गांच्या दृढ पंक्तीचा गर्जा जयजयकार ।।
    मराठियांच्या छत्रपतीचा गर्जा जयजयकार ।।
    चपळ, वायुसम घोडदळांचा
    शूर मावळ्यांच्या टोळ्यांचा
    गनिमी काव्याच्या क्लृप्तीचा गर्जा जयजयकार ।।
    मराठियांच्या छत्रपतीचा गर्जा जयजयकार ।।
    अतूट बुरुजांच्या रांगांचा
    लखलख पात्यांच्या खड्गांचा
    ढालीसम निधड्या छातीचा गर्जा जयजयकार ।।
    मराठियांच्या छत्रपतीचा गर्जा जयजयकार ।।
    पावन ईप्सित, जीनवनिष्ठा
    ध्येयपूर्तता हीच प्रतिष्ठा
    स्वराज्यअमृतघटप्राप्तीचा गर्जा जयजयकार ।।
    मराठियांच्या छत्रपतीचा गर्जा जयजयकार ।।
    शक्ति-युक्ति-नीतीचा संगम
    प्रजासुखा कायम अग्रक्रम
    श्रीरामासम शिवनृपतीचा जर्जा जयजयकार ।।
    मराठियांच्या छत्रपतीचा गर्जा जयजयकार ।।

    - सुभाष स. नाईक
    मुंबई
    M- 9869002126.
    eMail : vistainfin@yahoo.co.in.
    Website : www.subhashsnaik.com
    www.snehalatanaik.com

      February 21, 2018