पाऊस आवडतो का ?

 



मध्यरात्री पावसात …

टप-टप गळणार्‍या झोपडीत…

आपल्या पाखरांवर टोप धरून..

बसलेल्या आई-बाबांना आपण..

विचारूच कस शकतो…

पाऊस आवडतो का ?

हातावर पोट असणार्‍या…

अंग झाकायला कपडे घेतानाही…

ज्याला विचार करायला लागतो..

असा माणूस जेंव्हा पावसात ..

छत्री नाही म्हणून भिजत असतो..

त्याला विचारूच कस शकतो..

पाऊस आवडतो का ?

घरात पावसाच पाणी शिरल..

म्हणून उरलसुरलेल्या सामानासह …

खाटेवर संसार थाटणार्‍या आईला…

आपण विचारूच कस शकतो

पाऊस आवडतो का ?

पावसात रत्याने चालताना..

खड्यात पाय अडकून पडणार्‍या…

आणि मरता- मरता वाचलेल्याला..

कोणी विचारूच कस शकतो..

पाऊस आवडतो का ?

कवी-निलेश बामणे.

— निलेश बामणे

Author