काहीतरी…

काहीतरी आहे असे जे
तुझ्यात मुरले आंत आहे
राख तू होशील तेव्हा ते
जाईल म्हटले जात आहे।।

तुझ्यात मुरले आंत काही
वेगळेच हमखास आहे
नावडो आवडो कुणालाही
त्यानेच जीवन खास आहे ।।

वेगळेच हमखास त्याने
पोसलेला पिंड आहे
तरीच ना? हरघडी नव्याने
लढवतोस तू खिंड आहे।।

पिंड असूदे नसूदे न्यारा
'अंतरंग' वेगळा आहे
जगण्याच्या तुझ्या कलेला
त्याचाच रंग सगळा आहे ।।

-- मी मानसी
मानसी कावले



काहीतरी आहे असे जे
तुझ्यात मुरले आंत आहे
राख तू होशील तेव्हा ते
जाईल म्हटले जात आहे।।

तुझ्यात मुरले आंत काही
वेगळेच हमखास आहे
नावडो आवडो कुणालाही
त्यानेच जीवन खास आहे ।।

वेगळेच हमखास त्याने
पोसलेला पिंड आहे
तरीच ना? हरघडी नव्याने
लढवतोस तू खिंड आहे।।

पिंड असूदे नसूदे न्यारा
‘अंतरंग’ वेगळा आहे
जगण्याच्या तुझ्या कलेला
त्याचाच रंग सगळा आहे ।।

— मी मानसी
मानसी कावले

Author

Author
लेखकाबद्दल
sachingadkari (29578 लेख)

This is editor1

सर्व लेख पहा →