जीवंतपणी घेई समाधी, ज्ञानेश्वर राजा ।
दु:खी होऊनी हळहळली, विश्वामधली प्रजा ।।
सम्राट होता बालक असूनी, राज्य मनावरी ।
हृदय जिंकले सर्व जणांचे, लिहून ज्ञानेश्वरी ।।
आसनीं बसत ध्यान लावता, समाधिस्त झाले ।
बाह्य जगाचे तोडून बंधन, प्राण आंत रोकले ।।
निश्चिष्ठ झाला देह जरी , बाह्यांगी दर्शनी ।
जागृत आसती प्राण तयांचे, आजच्याही क्षणी ।।
संचार त्यांच्या आत्म्याच्या , सदैव होत राही ।
ज्ञान भुकेल्या भाविकाला, चेतना ते देई ।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
January 26, 2019
November 8, 2021
उदबत्तीचा सुगंध दरवळे चोहोकडे
कोठे लपलीस तूं प्रश्न मजला पडे
मंद मंद जळते शांत तुझे जीवन
धुंद मना करिते दूर कोपरीं राहून
जळून जातेस तूं राख होऊनी सारी
तुझे आत्मसमरपण सर्वत्र सुगंध पसरी
तुझेपण वाटते क्षुल्लक दाम अति कमी
आनंदी होती अनेक जेव्हां येई तूं कामीं
लाडकी तूं भक्तांना तुजवीण पूजा नाहीं
प्रफूल्ल करुन चेतना प्रभू भाव मना येई
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
August 3, 2019
पुण्यपावन हे दत्तधाम
कृष्णाकाठी, भक्तीचे
त्रैलोकी शाश्वत कृपाळू
स्वर्गद्वार ते मोक्षमुक्तीचे।।
निश्चिन्ततेच्या महासागरी
दर्शन आगळेच पंचत्वाचे
दत्तगुरू, अखंड कृपाळु
माहेर लडिवाळ गुरुकृपेचे।।
तृप्तीचे श्वास तिथे निरंतर
मनी कारंजे श्रद्धाभक्तीचे
जीवास नाही, घोर चिंता
ध्यास मनहृदयी विरक्तीचे।।
मन ब्रह्मानंदी विरुनी जाते
सत्य, दर्शन होते आत्म्याचे
परमात्मा! तो परमकृपाळु
रूप! भवसागरी दत्तकृपेचे।।
-- वि.ग.सातपुते.(भावकवी)
9766544908
रचना क्र. ४३.
११ - २ - २०२२.
February 27, 2022
शालेय शिक्षण पुरे करून, महाविद्यालयात जाऊ लागलो. नवा उत्साह, नवे मित्रमंडळ आणि उच्च ते वातावरण. मनाचे, विचारांचे आणि बागडण्याचे एक वेगळेच स्वतंत्र. मला त्यावेळचा एक गमतीचा प्रसंग आठवला. ज्याचे धागेदोरे पुढील जीवनात पंधरा वर्षानंतर विणले गेलेले आढळले. महाविद्यालयातील तो दिवस आठवतो.
October 8, 2020
जात असता गाडी मधूनी, दुर्घटना ती घडली
अचानकपणे एक दुचाकी, आम्हा पुढे धडकली
प्रयत्न होऊनी योग्य असे, थोडक्यात निभावले
वखवखलेल्या काळालाही, निराश व्हावे लागले.
घिरट्या घालीत काळ आला, झडप घातली त्याने
वेळ आली नव्हती म्हणूनी, बचावलो नशिबाने
अपमान झाला होता त्याचा, सुडाने तो पेटला
थोड्याशाच अंतरी जावूनी, दुजाच बळी घेतला.
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
May 11, 2019
आमची *राजहंसी जोडी, फिरते मस्त या तलावी,
डौलदार माझा राजा,
लोक आम्हा पाहत राहती,--!!
सौंदर्य आमुचे राजसबाळे,
मुखडे तर किती देखणे,
आम्हा पाहण्या होड चाले,
नेहमीच या तलावाकाठी,--!!!
डुबुक डुबुक पाण्यामध्ये,
आम्ही विहरतो शानदार,
रंग शुभ्र लोभसवाणे
आकर्षित लोक इथे फार,--!!!
पर' फैलावीत, सूर मारत,
सुळकन् पाण्यात जातो दिमाखदार जोड पाहुनी,
कुणी प्रवासी थक्क होतो,--!!!
लाटांच्या सिंहासनीकसे
झोकदार,आम्ही बसतो, वरखाली हालती त्या,
किती ऐटदार बघा दिसतो,--!!!
आम्हां न लागते रंगरंगोटी,
तुम्हा नकली माणसांगत,
नैसर्गिक सौंदर्य आमचे,
कित्येक वाखाणती अव्याहत,--!!!
अप्राप्यही लौकीकाला, स्वर्गीय आमची जात,
राजबिंडे लावण्य का,
कधी येते सामान्यात,--!!!
तेजस्वी आमची काया,
पाहण्यास खूप तरसती,
कुणास ठाऊक किती आम्हा,
कसे केव्हा पाण्यात पाहती,-!?
पाण्यातील प्रतिमा आम्हा,
उगाच पहा खुणावतसे,
वाटून खालील दोघांचा हेवा,
मन आंत डचमळतसे*,---!!!
हिमगौरी कर्वे.©
May 6, 2019
शांत होती रात्र सारी, आणि निद्रे मध्ये सारे,
खिडकी मधूनी वाहे, मंद मंद वारे ।।१।।
तोच अचानक तेथे, चिमणी एक आली,
मध्य रात्रीचे समयी ओरड करू लागली ।।२।।
जाग येता निद्रेतूनी, बत्ती दिवा पेटविला,
काय घडले भोवती, कानोसा तो घेतला ।।३।।
माळावरती बसूनी, चिव् चिव् चालू होती,
बघू लागलो दूरूनी धडधडणारी छाती ।।४।।
मध्येच उडूनी जाई, दारावरती बसे,
तगमग देखूनी तिची, कांहीं न कळे ।।५।।
भाषा न कळली जरी, धडकन सांगत होती,
‘संकटात आहे हो मी, ह्या भयाण मध्यरात्री’ ।।६।।
केविलवाणी बघूनी, भूतदया ही आली,
काय हवे तिजला, या अवचित वेळी ।।७।।
जेंव्हां बसे माळांवरी, ओरड वाढत होती,
हालचालीतील बैचेनी, काही सुचवित होती ।।८।।
आधार घेवूनी कसला, माळावरती चढलो,
विखूरलेल्या सामानी, निरखूनी बघू लागलो ।।९।।
धस्स झाले मन बघूनी, एक लांब त्या सर्पाला,
छोट्या घरट्या पुढती, विळका घालूनी बसला ।।१०।।
जीभल्या चाटीत होता, समोर बघूनी भक्ष्य,
चिव चिवणारी पिल्ले, होती त्याचे लक्ष्य ।।११।।
चाहूल माझी लागता, सावध परि झाला,
छलांग मारीत वेगे, झरोक्यामधूनी गेला ।।१२।।
काळसर्प तो बघूनी, उडाली होती चिमणी,
घुटमळला जीव परि, पिल्लामध्ये अडकूनी ।।१३।।
आघाद होता हृदयी, कळवळूनी ती गेली,
मातृत्वातील ओढीने, गहीवरूनी ती आली ।।१४।।
भयाण असूनी संकट, चिमणीची बघता शक्ती,
यश मिळविले तिने, योजूनी केवळ युक्ती ।।१५।।
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
February 26, 2016
उगवता सूर्य, नमन करती त्याला,
विसरती सारे सुर्यास्ताला ||धृ||
ऐश्वर्याची झलक, श्रीमंतीचे सुख
बिनकष्टाची संपत्ती, लक्ष मिळवण्याती
माना डोलावती, डामडोलाला ||१||
उगवता सूर्य. नमन करती त्याला
प्रथम हवे दाम, तरच होई काम
पैशाच्या भोवती, सारेच फिरती
पैशाचे गुलाम, मानती पैशाला ||२||
उगवता सूर्य, नमन करती त्याला
सत्तेची नशा, दाखवी जना आशा
स्वतःसी समजे थोर, असुनीया शिरजोर
हांजी हांजी करती, बघता सत्तेला ।।३।।
उगवता सुर्य, नमन करती त्याला
अधिकाराची रीत, बघती स्वहीत
गरजवंता अडविती, शोषण तयांचे करती
सलाम करती, अधिकाराच्य़ा खुर्चीला ।।४।।
उगवता सुर्य़, नमन करती त्याला
कालचा नटसम्राट, होता अती श्रेष्ठ
डोंगर उतरला त्यानी, आज विचारिना कुणी
जवळ करती, उमलणाऱ्या फुलाला ।।५।।
उगवता सुर्य, नमन करती त्याला,
विसरती सारे सुर्यास्ताला.
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
March 23, 2020
April 30, 2022
Copyright © 2025 | Marathisrushti