(User Level: User is not logged in.)

कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • नभांगणी आज मेघ

    नभांगणी आज मेघ,
    कुठून कुठे चालले,
    शेकडो योजने प्रवास त्यांचा,
    कोणी त्याला मापिले,--!!

    निळे काळे भरले ढग,
    एकत्र जमून पुढे चालले
    स्वैर विहरती त्यात विहग,
    लांबवरी ते उडत चालले,--!!!

    या मेघांची बनते माला,
    इकडून तिकडून सर्व बाजूला,
    जसा लवाजम्यात घोळका,
    निघाला तसा काफिला,--!!!

    मध्येच एखादा मेघ डोकावे,
    संजीवनाने ओथंबलेला,
    अशा काळ्याशार ढगात, जीवनदाते नीर भरले,--!!!

    कोणाची असेल ओढ,
    कोण प्रेमे त्यांना बोलावे,
    क्षितिज पसरलेले विस्तीर्ण, ठिकाणा त्याचा कैसा ठांवे,--!!!

    येता जवळी सूर्यराज,
    काय त्यांचे होत असावे,
    का त्याच्यापुढे झुकत,
    अर्पित आपले जीवन करावे,--!!

    असा सहज करती त्याग,
    दुसऱ्यास सगळे देऊन टाकणे, म्हणूनच ते निसर्गनिर्मित,
    मानवाने उदाहरण शिकणे,--!!!

    नसते काही त्यांच्याजवळ,
    अहंबुद्धी, मी माझेपण
    बघता बघता ते देती स्वतःस, आनंदे करत समर्पण,--!!!

    वृत्ती उदार त्यांची शिकत,
    निसर्गघटकांनुसार वागावे,
    आपण सारे कूपमंडूक,
    कोष फोडुनी बाहेर यावे,,--!!!

    श्रेष्ठ गुरु राजा निसर्ग,
    न बोलताही बरेच शिकवे,
    कळले ज्याला ते शहाणपण,
    तो संकुचित दृष्टी डांवले,--!!!

    हिमगौरी कर्वे©

      September 1, 2019


  • मतांची किंमत

    विलासराव देशमुखांना विचारले- का हो तुम्हाला मुख्यमंत्रीपद का सोडावे लागले? तेव्हा ते म्हणाले- माहित नाही यापूर्वीही असेच झाले होते-

    मनोहरला विचारले
    का रे बाबा का दूर केले?
    म्हणाला माहित नाही

    विलास ला विचारले
    का रे बाबा का दुर केले?
    म्हणाला माहित नाही

    सुशीलला विचारले
    का रे बाबा कधी दूर होशील?
    म्हणाला माहित नाही

    जनतेला विचारले
    का हो का दूर करतात असे?
    जनता म्हणजे माहित नाही

    कारण जनतेला कधी
    आपल्या मतांची किंमत
    कळलेच नाही

    -- विनायक अत्रे.

    दिनांक: १७/०१/२००३.

      July 7, 2022


  • गृहनिर्माण संस्थेच्या पदाधिकार्‍यांच्या जबाबदाऱ्या

    गृहनिर्माण संस्थेचे संचालक मंडळ/ व्यवस्थापन समिती/ पदाधिकारी हे गृहनिर्माण संस्थेच्या सदस्यांनी त्यांच्यातूनच निवडून दिलेले सभासद असतात. सदर व्यवस्थापन समिती सभासद आणि संस्था यांचे विश्वस्त (Trustee) असतात. व्यवस्थापन समिती सदस्यांच्या वर्तनाने गृहनिर्माण संस्थेला जर काही नुकसान झाले तर व्यवस्थापन समितीचे सभासद वैयक्तिक व सामूहिकरीत्या त्या नुकसानीची जबाबदार असतात. सदर लेखात खास आपणासाठी व्यवस्थापन समितीच्या जबाबदाऱ्या काय असतात याची माहिती देत आहे.

      August 29, 2021


  • आनंदघन

    मराठवाडा – बीड परिसरात गत आठ-दहा वर्षानंतरच्या पावसामुळे नद्या वाहू लागल्या आहेत. दुष्काळ हटविण्यासाठी निसर्गाने पुढाकार घेतला. ही रचना त्या रचनाकर्त्यास, निसर्गास अर्पण ….

      November 7, 2016


  • ऋतूचे चक्र आणि मन

    कडाक्याची थंडी, दात कुडकडुती,
    हात-पाय गार, काटे अंगी येती
    नकोसा वाटतो, मजला हिवाळा,
    वाट मी बघतो, येण्या तो उन्हाळा

    सुकूनची जाते, हिरवे रान
    शरिर राहते, घाम निथळून
    लाही लाही होता, त्रस्त होई जीव,
    शोधण्या ढग, मन घेई धाव

    थांबवितो कामे, वादळी वारा,
    पर्जन्याचा मारा, पडताती गारा
    पाणी चहूकडे, वाटते सुकावे,
    वर्षा जावूनी, सुक्यात खेळावे

    आपल्या जे हातीं मन नसे त्यांत
    सुख त्यांच्यांत पाही, नसे जे हातात

    डॉ. भगवान नागापूरकर
    संपर्क - ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

      April 18, 2017


  • खेळण्या नसे पर्याय

    दु:खाचे तूं देवूनी चटके, सत्वपरिक्षा ही बघतोस

    प्रतिकूल ती स्थिती करूनी, झगडत आम्हां ठेवतोस

    खेळामधली रंगत न्यारी, खेळ खेळणे चुके कुणा

    खेळातूनि अंग काढतां, जगण्याच्या मिटतील खुणा...२,

    खेळगडी तो असूनी तुम्हीं, मैदानासम विश्व भासते

    तन्मयतेनें खेळत असतां, खचितच यश तुम्हा येते...३,

    विना खेळण्या पर्याय नसे, एक चित्त ते करूनी खेळा

    बसू नका हतबल होवूनी, गमवाल त्या अमूल्य वेळा....४

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

      October 21, 2020


  • गोष्ट प्रेमाची…..।

    चेहेरा तर खूप सुंदर भेटणं,
    नक्कीच माझ्यापेक्षा ही ...
    पण जेव्हा गोष्ट प्रेमाची येईन ना
    तेव्हा कदाचित जाणीव नक्कि होईन तुला
    माझी....माझ्या प्रेमाची.....!!!

    -- मयुरी राम विखे

      December 13, 2019


  • तृप्त जीवन

    प्रत्येकाचेच जग वेगळे
    सुखदुःखही वेगवेगळे

    संवेदनांची जाणीव एक
    तिथे नसते काही वेगळे

    सृष्टीही सारी एकसारखी
    काही नसते कुठे वेगळे

    ऋतुंचे आविष्कार सारखे
    सुखावणारे क्षण आगळे

    नित्य पांघरित चैतन्याला
    भोगावे जगण्याचे सोहळे

    जन्म मरण हे एकची सत्य
    याहुनी जीवन नाही वेगळे

    जीवाजीवा सुखवित जावे
    कृतार्थ जीवन हेच आगळे

    -- वि.ग.सातपुते (भावकवी)

    (9766544908)

    रचना क्र. ३०५

    २५/११ २०२२

      December 4, 2022


  • भगवंत

    आले भरून आभाळ
    झाकोळले आसमंत
    सांज सांजाळ केशरी
    वृदांवनी तेवते ज्योत

    ओढ़ गुंतल्या जीवास
    आत्म रंगले पावरित
    झंकारली मंत्रमुग्ध धुन
    चाहुल हरिची अंतरात

    तनमन सर्वार्थी मुक्त
    रमले भक्तीच्या रंगात
    लोचनी सत्याची जाण
    सर्वांतरी एक भगवंत

    --वि.ग.सातपुते.(भावकवी)

    (9766544908)

    रचना क्र. २९६

    १८/११/२०२२

      November 23, 2022


  • जादूचे प्रयोग! (बालरंगभूमी माझ्या नजरेतून – भाग ८)

    विश्वसनीय असे बघणे प्रेक्षकाला आवडते. जादुई कला मनोरंजक होण्यामागे हे एक कारण आहे. जादूगार,मुलांना प्रचंड आवडतो. कारण,तो मुलांना फसवतो.त्यांची फजिती करताना त्यांना हसावतो.आणि हसवता हसवता त्यांना जादुई खेळात सहज सामील करून घेतो. Birthday पार्टीत म्हणूनच जादूगारांना प्रचंड मागणी असते. मुले जादूगार भोवती लोह चुंबकाप्रमाणे गोळा होतात. त्याच्या जादूच्या प्रयोगात,जादुई खेळात, आनंदाने सामील होतात.

      April 3, 2022