हा सूर्य आणि हा जयद्रथ,
पाहूया कोणाचा, पहिला पोहचतोय तो रथ…….
September 28, 2014
नकळत लोपले प्रहर , प्रहर
रूप प्राचीचे पश्चिमी ढळलेले
उभी यामिनी क्षितिजावरती
तरीही जगणेच नाही कळलेले
कळीकळीने मुक्त गंधाळावे
हेच सृष्टिचे , सत्यरूप रंगलेले
निर्माल्याचे , वरदान सजीवा
तत्व निर्मोही चराचरी रुजलेले
देतादेता सर्वस्वी मनी सजावे
अंती आठवावे सारे जगलेले
ओसंडिता अंतरी क्षण आनंदी
उधळावे तृप्त जीवन मंतरलेले
-- वि.ग.सातपुते ( भावकवी )
9766544908
रचना क्र. १७८
२३/७/२०२२
August 27, 2022
शरीराच्या भुकेसाठी नाही तर पोटाच्या भुकेसाठी गरीब बिचाऱ्या स्त्रिया होत असतात वेश्या… पुरुषातील माणूस जागा झाला कि स्त्री देवी होते आणि पुरुष जागा झाला की मग देवीची वेश्या..
July 11, 2017
देवाचिया दारीं, मनाचा मुजरा,
झुकवूनिया मान, हासे तो चेहरा ।। धृ ।।
जाई जेव्हां मंदिरी,
घेतां प्रभू दर्शन,
आनंदानें नाचते,
हर्षित चंचल मन,
नयन साठविती, त्या मंगल ईश्वरा,
देवाचिया दारी मनाचा मुजरा ।।१।।
नदीनाले धबधबा,
उंच उंच वृक्ष वेली,
कोकीळ गाती, मोर नाचे,
इंद्रधनुष्याच्या खाली,
रोम रोमातूनी शिरे, निसर्गाचा फवारा,
देवाचिया दारी मनाचा मुजरा ।।२।।
दु:खी – कष्टी दुबळा,
दीनवाणा दिसे,
प्रभूच्याच आज्ञेने,
भोग भोगीत असे,
जातां हृदय भरूनी, करि आसवांचा मारा,
देवाचिया दारी मनाचा मुजरा ।।३।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
April 28, 2021
किरणात चमक ती असूनी,
तेजोमय भासे वस्तूंचे अंग,
सूक्ष्म अवलोकन करीता,
कळे तेज ते, वस्तूचाच भाग ।।१।।
जसे तेज असे सूर्यामध्यें,
पत्थरांतही तेज भासते
दृष्टी मधले किरणे देखील,
सर्व जनांना हेच सांगते ।।२।।
तेजामुळेंच वस्तू दिसती,
विना तेज ती राहील कशी,
तेज रूप हे ईश्वरी असूनी,
तेज चमकते वस्तू पाशी ।।३।।
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
January 14, 2016
मातीचा पुतळा एक
फोडला कुण्या वेड्यानी
जीवंत पुतळे अनेक
जाळून टाकले शहाण्यानी ।।
एक करि तो पिसाट
ठरवी वेडा त्याला
अनेकाची उसळता लाट
धर्माभिमानी ठरविला ।।
अशी आहे रीत
नाहीं समजली मना
करुन विचारावर मात
श्रेष्ठ ठरे भावना ।।
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
October 5, 2016
चोखपणे तू हिशोब राहू दे, आपल्या जीवन कर्माचा
कुण्याही क्षणी पाढा वाचणे, भाग बनेल तो नशीबाचा...१
घीरट्या घालीत फिरत राही, आवतीभवती काळ
क्षणात टिपून उचलून घेतो, साधूनी घेता अवचित वेळ..२
सदैव तुमच्या देहाभवती, त्या देहाचे कर्मही फिरते
आत्मा जाता शरीरही जाई, कर्मवलय परि येथेच घुमते....३
पडसाद उमटती त्या कर्माचे, सभोवतालच्या वातावरणी
वेचूनी त्यातील भलेबुरे , मागे राहतील विविध आठवणी....४
हाच हिशोब जीवनाचा, दुजा वाचतो इथेच पाढा
इतरांसाठी जगता जेव्हां, सार्थकी होतो आयुष्य लढा...५
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
January 29, 2020
मित्रराज उगवताना,सृष्टीवर घडे करामत,
आभाळ उतरे जळात,
त्याचे रूप दिसे पाण्यात,
लोक
आरस्पानी निळे सौंदर्य,
नजरा खिळवून ठेवी,
हलते डोलते आभाळ,
पाण्यात प्रतिबिंबित होई,
वृक्षांचे समूह किती,
धरतीवर पेरलेले,
निळाईत उठून दिसती, हिरवाईने नटलेले ,--!!!!
तमाची शामत नसे, हळूहळू तो नाहीसा होई,
प्रकाशाचे किरण घेऊनी,
दिनकराचा प्रवेश होई,
अंधारी बुडालेली सृष्टी,
रंग तिचा बदलून जाई,
कडेकडेने सोनेरी सोनेरी,
पिवळसर उजेड पाऊल टाकी,
प्रकाशाचा रांजण भरुनी,
सूर्यराज दिमाखात येई,
तांबड्या सोनसळी किरणांची,
आता भाऊगर्दी होई,--
डोंगर आपल्या डुलक्या सोडुनी,
हात जोडुनी उभे राहती,
सूर्यसम्राटाचे स्वागत करण्यां,
भालदार चोपदार खडे राहती,--!!!
पिवळसर प्रकाश आता धरणीवर ओसंडू लागे,
तम जाई पळून सारे,-
प्रिय तिचा तेजस्वी तळपे,---!!!
हिमगौरी कर्वे.©
May 9, 2019
बदलून गेले जीवन
अर्थ कळल्यानंतर
परिस्थितीची आली जाण
जाग आल्या नंतर ।।१।।
श्रीमंतीच्या नादानें
ऐषआरामी झालो
पैशाच्या गर्वाने
माणुसकी विसरलो ।।२।।
तारुण्यातील उर्मीने
अहंकारी बनविले
शरिरातील गुर्मीने
निर्दयी मज ठरविले ।।३।।
धंद्यामध्ये येता खोट
निराश अति झालो
गरिबीची चालतां वाट
प्रेमळ मी बनलो ।।४।।
देह बनला दुर्बल
विकार तो जडूनी
जर्जर- पिडीतां बद्दल
सहानुभूती आली मनी ।।५।।
अनुभवासारखा
शिक्षक नाहीं कुणी
शहाणा करी अनेका
परिस्थीती समजावूनी ।।६।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
e-mail- bknagapurkar@gmail.com
September 10, 2015
नाच नाचती तालावरती
मीरेची पाऊले
चित्त ते हरीमय जाहले. - - - धृ
लागला प्रभुचा ध्यास
हरि दिसे नयनास
चलबिचल नजर होऊन
अंग सारे मोहरले - - -१
चित्त ते हरीमय जाहाले
न राही आपले भान
झाली भजनी तल्लीन
तनमन प्रभुचे ठायी जाता
संसार ते विसरले. - - - २
चित्त ते हरीमय जाहाले
विषाचा घेता प्याला
हरि तो त्यातची दिसला
झेपावूनी गेली त्याच क्षणी
घट घटा प्राशन केले. - - - ३
चित्त ते हरीमय जाहाले
जहाल होते विष
मृत्युचा तो पाश
प्रभूभक्तीच्या शक्तीने परि
अमृत ते बनले - - - ४
चित्त ते हरीमय जाहाले
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
April 16, 2017
Copyright © 2025 | Marathisrushti