(User Level: User is not logged in.)

कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • धन्य ती महाराष्ट्र माऊली !

    धन्य ती महाराष्ट्र माऊली

    अनेक थोरा जन्म देऊनी पावन तू झाली //धृ//

    ज्ञानाचा तो मुकूटमणी, ग्रंथ रचिला ज्ञानेश्वरी

    ओवीबद्ध साज प्राकृतीं चढविला, भगवतगीतेवरी

    तेज चमकूनी सुर्यासम, दाही दिशा उजळली //१//

    अनेक थोरा जन्म देऊनी पावन तू झाली

    तुकाराम तो संत महान, अभंगाचा राजा

    हासंत खेळत शिकवली, जीवनातील मजा

    अभंगाची मधूर सुमने, सर्वत्र तुक्याने ऊधळली //२//

    अनेक थोरा जन्म देऊनी पावन तू झाली

    संवाद करुन विठोबाशी, नामदेव नाचला

    तल्लीन होऊनी भजनासी, मधूर गाऊ लागला

    भक्ति अर्पून प्रभूला, भावी निरंजने ओवाळली //३//

    अनेक थोरा जन्म देऊनी पावन तू झाली

    तसेच झाले एकनाथ, भागवत त्यानी लिहीले

    श्री रामदास स्वामी, दासबोध रचिले

    निवृती सोपान मुक्ताबाई , कित्येक झाली संत मंडळी //४//

    अनेक थोरा जन्म देऊनी पावन तू झाली

    शिवरायाची बातच न्यारी, दुमदुमला प्रताप

    अंबेडकरांनी न्याय देऊनी, दलितास दिले योग्य माप

    प्रतिकार करुनी जुलमाचा, अन्यायाला वाचा फोडली //५//

    अनेक थोरा जन्म देऊनी पावन तू झाली

    टिळक आगरकर साने गुरुजी, तसेच झाले फुले

    सावरकर सेनापती बापट, ह्यानी शुरत्व दाखविले

    सारय़ांनी महान होऊनी, देशाची मान उंचाविली //६//

    अनेक थोरा जन्म देऊनी पावन तू झाली

    -- डॉ. भगवान नागापूरकर
    ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

      November 29, 2018


  • गारठता गारवा

    कविवर्य सौमित्र यांची माफी मागून.. विडंबन.

    थंडी जरा जास्त आहे दरवर्षी वाटतं...
    दरवर्षी लग्नाचं स्वप्न उबदार मनात दाटतं.
    तरी भावना चाळवत राहतात.
    मन चाळवत नाही.
    या एकांतात सिंगलतेशिवाय कुणीच बोलत नाही.
    इतक्यात एखादी सुंदर ललना नजरेसमोर येते..
    इतक्यात एखादी सुंदर ललना नजरेसमोर येते...
    आपण पाहत नसलो तरी पदर नीट घेते.
    नवरा तिचा जाडा, टकला डोळे वटारून बघत राहतो...
    आपण फक्त डोळे झाकून हात चोळत जगत राहतो.
    संध्याकाळ टळून रात्रीचा सुरू होतो पुन्हा खेळ...
    आपल्या शिकोटीत शिरत राहते गार गार कातरवेळ.
    चक्क डोळ्यांसमोर मित्र लग्न करून येतो.
    दरवर्षी देव आपली अशी का परीक्षा घेतो.?

    दत्तात्रय श्रीकांत गुरव
    मोबा. -8605523618

    आम्ही साहित्यिक फेसबुक ग्रुप

      February 12, 2024


  • यशासाठी प्रयत्नाची दिशा

    प्रयत्न करितां जीव तोडून, जेव्हां यश तुम्हा न येई
    सोडून देता त्याला तुम्हीं, नशिबास दोष देत राही..१

    दोष नका देवू नशिबाला, मार्ग निवडले तुम्ही चुकीचे
    का न मिळाले यश तुम्हां, मूल्यमापन करा प्रयत्नाचे...२

    चूक दिशेने प्रयत्न होतां, वाहून जातो सदा आपण
    यश जेव्हा मिळत नसते, निराश होवून जाते मन...३

    पुनः पुन्हा प्रयत्न करूनी, यश न आले तुमचे हातीं
    प्रयत्नाची दिशा बदलतां, जुळून सहजच सारे येती...४

    डॉ. भगवान नागापूरकर
    संपर्क - ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

      September 20, 2015


  • तू असा वाहता की

    तू असा वाहता की,
    खळाळते पाणी,
    जसा सागर उचंबळे,
    गात जीवनगाणी,--!!!

    तू असा निश्चल की,
    जसा असतो पहाड,
    किती स्थितप्रज्ञ राही,
    वाऱ्या वादळी अटल--.!!!

    तू असा ढगांसारखा,
    अविरत ना चंचल,
    संजीवन बरसले तरी,
    शांत गंभीर अटळ,--!!!

    तू असा किनाऱ्यासम,
    भाससी किती तटस्थ,
    लाटा सुखदुःखांच्या उफाळती तरीही अतिशय अचल,--!!!

    तू असा हिंडता की,
    वाऱ्याशी तुझी जोडी,
    अखंड वाहशी रातदिनी,
    पाय ठहरेना जागी,--!!!

    कुठे जाऊन तू पोहोचशी,
    तू असा फुलांगत,
    जिथे तिथे उमलशी,
    वसा आनंदाचा घेऊन,
    जागोजागी फैलावशी,--!!!

    तू असा वृक्षासारखा,
    संसारी अन् संन्यस्त,
    इतुके बहरूनही सारखे,
    स्वतः मात्र निर्मोही--!!!

    हिमगौरी कर्वे.©

      May 16, 2019


  • पैसा

    जीवनात नाहीच ,माझ्या जागा त्याला कोठेही
    धावावे लागतेच मला उगाच त्याच्यासाठी...

    नसत्या माझ्या गरजा, जर साऱ्याच निगडीत त्याच्याशी
    तरी जगलो असतो, जीवनच मी राजेशाही...

    विनाकारणच नसता, झाला माझा संघर्ष कोणाशी
    बळी द्यावाच नसता, लागला मज प्रेमाचाही...

    माझ जगणंच झालाय , आज ते तर निगडीत त्याच्याशी
    त्याच्याच शिवाय जगण , घंटा ठरतेय धोक्याची...

    त्याच्या मागे धावत, अखेर ही होणार जीवनाची
    मागचे साधतीलच, मग की जवळीक त्याच्याशी...

    कवी - निलेश बामणे

      December 17, 2013


  • बीज – वृक्षाचे चक्र कुणाचे ?

    बीज - वृक्षाचे चक्र कुणाचे ?
    सुक्ष्म बिजाचे रोपण करतां, वृक्ष होई साकार
    कोण देई हा आकार ?
    तूं तर दिसत नाही कुणाला, घडते मग कसे ?
    कोण हे घडवित असे ?
    प्रचंड शक्ती देऊनी बीजाते, प्रचंड करितो वृक्ष
    कोण देई ह्यांत लक्ष ?
    त्याच वृक्ष जातीचे गुणही येती, रुजलेल्या त्या बीजांत
    ही किमया असे कुणांत ?
    तोच वृक्ष वाढूनी फळे देतो, फळांत असते बीज
    फिरवी कोण चक्र सहज ?

    डॉ. भगवान नागापूरकर
    ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

      December 16, 2018


  • संकोचलेले मन

    मध्य रात्र झाली होती, सारे होते शांत ।

    रस्त्यावरती तुरळक व्यक्ती, वाटला एकांत ।।

    एक गाडी मंदिरीं थांबली, त्याच शांत वेळीं ।

    सूटामधली व्यक्ती कुणी एक, आली दारा जवळी ।।

    सारे होते नशिबात त्याच्या, धन संपत्तीचे सुख ।

    दिवस घालवी मग्न राहूनी, कार्ये पुढती अनेक ।।

    तर्कज्ञान तीव्र असूनी, आगळा बाह्य चेहरा ।

    परि अंर्तमन सांगत होते, सत्यास शोध जरा ।।

    केव्हां केव्हां विजय होई, सुप्त त्या विचारांचा ।

    संकोचल्या मनीं गाभारा बघे , रात्री मंदिराचा ।।

    डॉ, भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

      July 31, 2020


  • स्वामिनी

    हातातल्या कंकणाचे
    कपाळावरील कुंकवाचे
    सरणाऱ्या पदराचे
    भान कसे राखावे?

    रोखणाऱ्या नजरांचे
    स्पर्शणाऱ्या हातांचे
    विकृत विचारांचे
    क्षण असे टाळावे?

    आखलेल्या मर्यादांचे
    दिसणाऱ्या सौंदर्याचे
    अस्तित्व हे बंधनांचे
    कुठवर मी पाळावे?

    बाईपण जगण्याचे
    वडे हे गिरवायचे
    तिच्या विवंचनेचे
    कोणीही पाढे वाचावे?

    मोकळ्या श्वासाचे
    तिच्या स्वाभिमानाचे
    मोल तिच्या जगण्याचे
    तिचे तिनेच करावे.

    सौ. प्रतिभा महादेव चौगले

      December 9, 2025


  • गतकर्माची विस्मृती

    एके दिनीं निघून जाईन निरोप घेवून ह्या जगताचा

    प्रवास माझा अनंतात कसा असेल त्या वेळेचा

    आकाशाच्या छाये खालती विदेही स्थितींत फिरत राहीन

    'तू' आणि 'मी' च्या विरहीत मी गत कर्माचे करिन मापन

    बाल्यातील चुका उमगल्या तरूणपणाच्या उंबरठ्यावरी

    सळसळणारे यौवन रक्त वृधावस्तेतील खंत ठरी

    पूनर्जन्म घेण्याकरितां गर्भाची निवड करीन

    गत जन्मींच्या चुका टाळूनी आदर्शमय जीवन जगेन

    शंकेची परि पाल चुकचुके राहील का स्मृति गत जन्माची

    नसतां पूनरपि चक्र फिरेल विस्मृति होतां गत कर्माची

    डॉ. भगवान नागापूरकर

    संपर्क - ९००४०७९८५०

    bknagapurkar@gmail.com

      November 11, 2016


  • माती

    पहाटेच्या प्रसन्नमयी वातावरणात
    चालताना तुझ्याशी घट्ट नातं जाणवतं..
    तळ्याकाठीची ओल्या स्पर्शाची तुझी माया..
    कितीतरी वेळ थिजून ठेवते...
    आठवणीतल्या वाटेवर तू घेऊन जातेस अलगद..
    बालपणी तुझ्याबरोबर तासनतास घालवलेला वेळ..
    बोटा बोटात तुझं रूतून बसणं..
    घरातल्यांच्या धाकाने तेच हात सदऱ्याला पुसणं..
    कधी सगळ्या अंगभर तूच आणि मी पटांगणात खेळायचो..
    तू पोटात बीज रूजवतेस म्हणून आम्ही भाकरी खातो..
    म्हणून पहिल्या पावसाचा मनात अजून मृदूगंध वाहतो..
    तू बोलावलेस म्हणून आपल्या माणसात येतो..
    तू खरच फार मोलाची आहेस..
    वीतभर का होईना पण आपल्या पायाखालची जमीन
    आपलं अस्तित्व दाखवते..
    तू फार खोलवर गेलेली.. मूळ जननी..

    मातेच्या उदरात जन्माला येईल तो शेवटी तुझ्या उदरात
    मिसळून जाईल..
    हा नश्वर देह गळून पडला की गती मिळण्यासाठी माती
    द्यायला येतील ती आपल्या मातीतील माणसं..
    ॠणानुबंध मातीशी
    शतदा घडावे..
    मातीत मिसळून
    जीवन कृतार्थ व्हावे..

    प्रतिभा चौगले यांच्या प्रतिभास या कवितासंग्रहाच्या इ-पुस्तकातील ही कविता.
    हे इ-पुस्तक आपण खालील लिंकवर खरेदी करु शकता.

    किंमत : रु.८०/-
    सवलत किंमत : रु.५०/-

    https://marathibooks.com/books/pratibhas-by-pratibha-chougale/

      June 4, 2026