कसली ही चांदण चाहूल सख्या

कसली ही चांदण चाहूल सख्या
काहूर उठतात मनात अनेकदा
हे मोती धवल शुभ्र टिपूर असे
शिंपल्यात हृदय चोरुन माझे..
तुझी ओढ लागते हलकेच मला
मिटता नयन माझे अलगद तेव्हा
ये सख्या तू असा घनशामल वेळी
ही अबोली अबोल तुझ्यात गुतूंनी..
ये बहरुन सख्या तू असा
जीव होईल अधर हलकासा
स्पर्श तुझा मधुर मज होता
मोरपीसी सर्वांग शहारे काया..
घे ओठ ओठांनी तू टिपून पुन्हा
घे मिठीत मज घट्ट ओढून जरा
साखर ही फिकी पडेल तेव्हा
ओठ अलवार तू माझे चुंबीता..
केतकीच्या बनी ये तू सख्या
केवड्याच्या गंध घे मिटून असा
गंधाळेलं तुझ्यात ही रातराणी मोहरता
सोडून लाज लुटले तुझ्यासवे आता..
प्रणय खेळ रंगून जाईल असा
रोमांच उठेल तनुभर तेव्हा
अलवार मिठी तुझी मखमली मना
लाजेल मी स्पर्श रोमांचित होता तुझा..
-- स्वाती ठोंबरे.


कसली ही चांदण चाहूल सख्या
काहूर उठतात मनात अनेकदा
हे मोती धवल शुभ्र टिपूर असे
शिंपल्यात हृदय चोरुन माझे..
तुझी ओढ लागते हलकेच मला
मिटता नयन माझे अलगद तेव्हा
ये सख्या तू असा घनशामल वेळी
ही अबोली अबोल तुझ्यात गुतूंनी..
ये बहरुन सख्या तू असा
जीव होईल अधर हलकासा
स्पर्श तुझा मधुर मज होता
मोरपीसी सर्वांग शहारे काया..
घे ओठ ओठांनी तू टिपून पुन्हा
घे मिठीत मज घट्ट ओढून जरा
साखर ही फिकी पडेल तेव्हा
ओठ अलवार तू माझे चुंबीता..
केतकीच्या बनी ये तू सख्या
केवड्याच्या गंध घे मिटून असा
गंधाळेलं तुझ्यात ही रातराणी मोहरता
सोडून लाज लुटले तुझ्यासवे आता..
प्रणय खेळ रंगून जाईल असा
रोमांच उठेल तनुभर तेव्हा
अलवार मिठी तुझी मखमली मना
लाजेल मी स्पर्श रोमांचित होता तुझा..
— स्वाती ठोंबरे.

Author

Author
लेखकाबद्दल
sachingadkari (29578 लेख)

This is editor1

सर्व लेख पहा →