(User Level: User is not logged in.)

कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • सतत बरसणारी दया

    प्रभू दयेची बरसात, चालू असते सतत
    ज्ञानाची गंगोत्री वाहते, पिणाऱ्यालाच ती मिळते

    प्रत्येक क्षण दयेचा, टिपणारा ठरे नशिबाचा
    जलात राहूनी कोरडे, म्हणावे त्यास काय वेडे

    फळे पडतां रोज पाही, त्याची कुणा उमज न येई
    परि न्यूटन एक निघाला, बघे गुरुत्वाकर्षण शक्तीला

    चहा किटलीचे झाकण हाले, स्टिफनसनने इंजीन शोधले
    जीवनातील साधे प्रसंग, शास्त्रज्ञांची बनले अंग

    प्रभू असतो सतत तयार, ठरवा तुम्ही दया कशी घेणार

    डॉ. भगवान नागापूरकर
    ९००४०७९८५०

      August 4, 2019


  • अतृप्त भूक

    चंद्रा तुझे रूप कसे रे, गोंडसवाने छान
    टक लावूनी बघता, हरपूनी जाते भान
    मधूर शुभ्र नभी चंद्र तो, जणू चांदीची थाली
    अगणीत वाट्या विखूरलेल्या, दिसे भोवताली
    टपोर चांदणे वाहूनी जाते, त्या थाली मधूनी
    स्वाद लूटता धुंद होतो, घेता ते झेलूनी
    रिक्त होते एक वाटी
    ती, भरूनी जाई दुजी
    प्राशन करिता सीमा नसे मग, आनंदा माजी
    अतृप्त सदा मन तरीही, त्या चांदण्यापाई
    आतूरतेने दुजा रात्रीची, सतत वाट पाही

    डॉ. भगवान नागापूरकर
    ९००४०७९८५०
    e-mail- bknagapurkar@gmail.com

      July 8, 2016


  • भोंडला (फेरीवाल्यांचा) (६)

    अरडी ग बाई, परडी, रस्त्यावरती गर्दी
    ही गर्दी कशाची, ही गर्दी फेरिवाल्यांची
    फेरीवाल्या फेरीवाल्या माल दे, माल दे हा मोल घे
    मोल ठेवला हातावर, गाडी होती नाक्यावर
    आता ह्याला शोधू कशी, बाईसाहेब पडतात अशा फशी

      October 12, 2018


  • चिमणीची निद्रा मोड

    पहाट झाली,
    चिव चिवते चिमणी
    उमज येईना,
    उठविले तिजला कोणी.....१,

    आई आहे कां ?
    जी उठवी शाळेसाठी,
    गुदगुदल्या करूनी
    कुरवाळिते हळूंच पाठी....२,

    घड्याळ उठवी
    घण घण करूनी नाद
    घरट्यामधुनी,
    नाही ऐकला असा निनाद.'..३,

    ' उषाराणी येते,
    साऱ्यांची आई बनूनी
    प्रेमानें मोडी झोंप,
    नाजूक करकमलांनी.....४,

    घड्याळ आमचे,
    दवबिंदू पडतां पानावरूनी
    चाळविती निद्रा,
    टपटप आवाज करूनी' .....५

    डॉ. भगवान नागापूरकर
    ९००४०७९८५०

      August 12, 2019


  • वेळेची ढिलाई , काळाची किमया

    हपालेल्या निष्ठूर काळा,
    समाधानी तू कसा होशील,
    बळी घेण्याचे सत्र तुझे ते,
    केंव्हां बरे तू थांबवशील ? ।।१।।

    नित्य तुला भक्ष्य लागते,
    वेध घेई टिपूनी त्याचा,
    मिस्कीलतेने हासत जातो,
    गर्व होई स्वकृत्याचा ।।२।।

    अवचित कशी ही भूक वाढली,
    मात करूनी त्या वेळेवरी,
    सूडानें पेटूनी जावूनी,
    बळी घेतले गरीबांचे परी ।।३।।

    काळ येई परि वेळ न आली,
    म्हणून सदा हताश होतो,
    वेळेची ढिलाई बघूनी,
    तांडव नृत्य करीतो ।।४।।

    शांत होऊ दे क्रोध तुझा ,
    बळी कुणाचा राग कुणावरी,
    ‘वेळवरती’ अवलंबूनी तूं,
    जाण ठेव याची तरी ।।५।।

    डॉ. भगवान नागापूरकर
    संपर्क - ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

      January 25, 2016


  • संशयी मन

    कृष्ण कमळ –

      October 5, 2013


  • ५ जून, “दिन जागतिक पर्यावरणाचा” !

    दरवर्षी ५ जून रोजी सर्व जगभर “जागतिक पर्यावरण दिन” मोठ्या प्रमाणावर साजरा होतो पण तेवढया पुरता किंवा त्या दिवसा पुरता. खरतर रोज हा दिवस लक्षात राहणे गरजेचे आहे. सध्याच्या प्रदूषणाचे सर्वच उच्चांक मोडीत निघाले आहे. तरी प्रत्येकाने आपल्या परीने प्रदूषण कमी करण्याचे किंवा कमीत कमी करण्याचे ध्येय ठेवावे. बाकी सर्व त्या नियंत्याच्या हातात आहे.

      July 6, 2015


  • जादू

      April 17, 2012


  • आमचे खेळ

    या मित्रांनो सारे या, सर्व मिळूनी खेळू या ।।धृ।।
    खेळ आमच्या देशाचे गरिबांसाठी सोईचे
    मैदान नको मोठे ते वस्तूही अल्प लागते ।।
    खेळांना त्या समजून घ्या- --- या मित्रांनो सारे या,

    हुतुतूचा खेळ बघा दोन गट, छोटी जागा
    स्पर्श रेषा ओलांडूनी ह्तुतू म्हणती तोंडानी ।।
    एकाच दमात भिडू मारू या ---- या मित्रांनो सारे या,

    खो खो मध्ये चपळाई चकमा देण्याची घाई
    उलट सुलट बसे एकाच रांगेत दिसे ।।
    मिळता खो भिडूला पकडू या- --- या मित्रांनो सारे या,

    लपंडाव हा खेळ कसा लपलेल्यांना शोधत बसा
    राज्य येते त्यावरती शोध घेई सभोवती ।।
    तीक्ष्ण नजर ती ठेऊया – --- या मित्रांनो सारे या,

    आट्या पाट्या च्या खेळात कांही घरे आखतात
    सीमेवरती दक्ष राहती घरात येण्या ते रोकती ।।

    चपळाईने घरात शिरू या – --- या मित्रांनो सारे या,

    एका पायाची गम्मत लंगडी आहे माहित?
    उड्या मारीत पळावे भिडू सारे पकडावे ।।
    आखल्या रेषेतच खेळू या- --- या मित्रांनो सारे या,

    एक दिलाने खेळू या आनंद सारा लुटू या
    निरोगी सदा राही तो प्रफुल्ल मन बाळगतो ।।
    शीण अभ्यासाचा घालवू या – --- मित्रांनो सारे या,

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

      July 7, 2020


  • स्वच्छता मोहीम……..

    मिडिया आली, प्रेस आली,

    खटाखट कॅमेरान्ची बटने दाबली,

    चित्रे दिसली गोजिरवाणी,

    नाही नां येणार वेळ लाजिरवाणी?

      October 2, 2014