पाटीवरती अंक लिहीले, बागडूं लागला आनंदाने
पित्याचे लक्ष वेधण्या, हनवटी खेची हातानें....१,
प्रथमापासूनी लक्ष पित्याचे, होते अवखळपणाकडे
अजाणपणा दाखवोनी, दुर्लक्ष करी मुलाकडे...२,
शब्दांची गुंफन करूनी, कवितेचा संग्रह केला
तोच संग्रह घेवून चाललो, दाखविण्या माहूरी रेणूकेला...३,
जगदंबा ही आदी शक्ती, सारे तिजला ज्ञात असते
अजाण बालक हट्टी असूनी, तिच्याच घऱी दाखविण्या जाते...४,
पाटीवरले अंक बघूनी, हृदय पित्याचे गहीवरले
रेणूका तर जननी विश्वाची, भाव मनीचे आधीच कळले...५
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
March 7, 2020
चंद्र आज एकला नभी उगवला ।
रात पुनवेची मधूर भासला ।।
मेघांचा गालीचा आज नाहीं दिसला ।
शितल वारा अंगी झोंबू लागला ।।
उलटून गेली रात्र मध्यावरती ।
लुक लुकणारे तारे आतां दिसती ।।
पेटल्या गगनीं असंख्य फुलवाती ।
तीव्र-मंद प्रकाशानें त्या चमकती ।।
त्या असंख्यात चंद्रमा एकची सापडे ।
जो लोभसवाणा म्हणूनी सर्वा आवडे ।।
उघडूनी देई मनाची प्रेम कवाडे ।
निघूनी जाई रात बघतां त्याजकडे ।।
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
March 2, 2016
October 21, 2023
माझ्या भोवताली,
माणसांचे रान,
चहूबाजूंना असूनही,
वाटा सुनसान,--!!!
टोचे सले असे एकटेपण,--!!
माझ्या भोवताली,
नातीगोती किती,
प्रश्न एकच पडे,
विचारती किती,--
टोचे सले असे एकटेपण,--!!
माझ्या भोवताली,
मित्रपरिवार किती,
असंख्य हात निव्वळ,
फक्त वर ते उठती,
टोचे सले असे एकटेपण--!!
माझ्या भोवताली,
पिके खूप मतांची,
उपयोगाला येती,
त्यातील का कधी,--!!
टोचे सले असे एकटेपण--!!
माझ्या भोवताली,
कितीक सहयोगी,
असते का त्यांना,
आंच हितचिंतनाची,--?
टोचे सले असे एकटेपण,--!!!
माझ्या भोवताली,
माझे असे किती,
प्रेम माया कुठली,
आणावी आपुलकी,--
टोचे, सले, असे एकटेपण--!!
माझ्या भोवताली,
इहलोकातील गर्दी,
प्रांजळ निर्मळ,
भावना कोणाची खरी,--
टोचे सले असे एकटेपण,---!!!!
हिमगौरी कर्वे.©
August 6, 2019
रंग भरले जीवनीं, रंगात चालतो खेळ
टप्प्या टप्प्याच्या नादानें, जाई निघूनीया काळ....१,
शिखरावरचे ध्येय, दुरुनी वाटते गोड
लांब लांब वाट दिसे, जाणें तेथे अवघड......२,
ठरलेल्या वेळेमध्ये, जातां योग्य दिशेनें
यश पदरीं येईल, निश्चींच रहा मनानें....३,
रमती गमती कुणी, टप्प्यांत रंगूनी जाती
वेळ सारा दवडूनी, निराशा पदरी येती...४,
जीवनातील अंगाचे, अनूभव घेत जावे
मिळणाऱ्या त्या सुखाला, क्षणीक असे समजावे...५,
रूकू नका एके जागीं, चालणें जीवन होय
प्रभूमय होता येणे, हेच असावे ध्येय....६
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
February 26, 2019
तुज साठी आणली रक्तवर्ण कमळे
दुर्वांची जुडी शेंदूर पत्री फुले..
गणाधीशा तुजला नमितो श्रद्धेने..
आशिर्वाद द्या मज वरद हस्ताने
द्यावी बुद्धी,तेज सद्विचाराची
छाया नसावी परि अवगुणांची..
पदकमलांचा परिसस्पर्श व्हावा
चिंता हरूनी समाधान विसावा..
मोदक लाडू करावे भक्षण
प्रथम वंदन तुज करितो
चौसष्ट कलांचा अधिपती
कला साकार तूच करितो.
संकटहर्ता गजानना तुज
करितो वंदन प्रातःकाळी
वर दायक सिद्धीविनायक
श्रवण करावी भूपाळी.
प्रतिभा चौगले यांच्या प्रतिभास या कवितासंग्रहाच्या इ-पुस्तकातील ही कविता.
हे इ-पुस्तक आपण खालील लिंकवर खरेदी करु शकता.
किंमत : रु.८०/-
सवलत किंमत : रु.५०/-
https://marathibooks.com/books/pratibhas-by-pratibha-chougale/
June 12, 2026
आईच्या संगतबसलो उन्हात,
बाहेर उबेत,
थंडी घरात,
सकाळचा प्रहर,
जीवास आराम,
नाही काम धाम,
बसलो निवांत,
बागेच्या फाटकात,
अवधान ठेवत,
आईचे संरक्षण,
मग काय वाण-?
मला ते मिळत,
मी निर्धास्त,--!!!
आई बिनधास्त,
नाही डरत,
लोक घाबरत,
मी हसत,--!!!
कवडसा उन्हात,
त्यात खेळत,
जरासा थकत,
आईस बिलगत,--!!!
© हिमगौरी कर्वे
January 29, 2020
सोडत नसतो केव्हाही, निसर्ग आपुल्या मर्यादा,
चमत्कार करीत नसतो, नियमित चालतो सदा १
साधूबाबा महाराज कित्येक आहेत ह्या जगती
नांव घेवूनी प्रभूचे चमत्कार दाखविती २
अज्ञानाने भरलो आम्ही विश्वास वाटतो त्यांचा
चमत्कार दाखविण्यामध्ये हात नसतो प्रभूचा ३
तो महान असूनी क्षुल्लक त्यासी ह्या गोष्टी
प्रेमभावना घेण्या कशास पडेल कष्टी ४
नष्ट केला ईश्वर धर्म, ह्या साऱ्या भोंदूनी,
दु:खींचे शोषण करती वाम मार्गाने जावूनी ५
आम्ही केवळ भाविक, वेडे श्रद्धाळू असती,
जो आपल्या अकलेने, उपयोग त्याचा घेती ६
गंडे, दोरे, जादू - टोणा हे सारे थोतांड,
चूक मार्गाने जावून शोधत राहतो ब्रह्मांड ७
विश्वास साधूंवरी देवापेक्षांही जास्त
म्हणून चटकन लाभे किंमत त्याची स्वस्त ८
भाषा त्यांची ठरलेली, राहू, केतू, शनी
जर फारच भोळे असाल तर म्हणती झाली करणी ९
संकटाचा काळ सांगती तीन वर्षाचा
दु:ख जावुनी सुखी व्हाल, शब्द देती आशेचा १०
ह्यात काही नवे नसते, हे तर चक्र निसर्गाचे,
सुख दु:खाच्या घटना घडते घडणे चालते नित्याचे ११
विश्लेषण करीता कळेल, आम्हीच करितो घटना,
परि हिंमत नसते आमची फळ त्याचे घेण्या १२
आम्हास हवा इतर कुणी झेलण्यास त्या दु:खाते
शब्द दाखवूनी प्रेमळ लुटीत असतो धनाते १३
फरक पडत नसतो, आमच्या कर्म फळात,
त्यांच्या मंत्र – तंत्राने, सहन करतो समाधानात १४
भयग्रस्त असूनी मन, चिंतेत आम्ही असतो,
आधाराचा शब्द बोलूनी, आशा आम्हास दाखवीतो १५
पारखोनी घ्या खरा गुरु दूर रहा भोंदूपासून,
फरफटत जाल जीवनी मृगजळास नीर समजोनी १६
गुरु दाखवी मार्ग, तुमच्या आत्मशुद्धीचा,
त्यातच त्याला समाधान, संदेश देतो ईश्वराचा १७
जवळ असूनी दूर असतो, हेच सार ईश्वराचे,
भक्तीभाव ठेवा , यश मिळेल जीवनाचे १८
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
December 8, 2016
कितीक गावांच्या अंगणात रमलो
स्थिर कुठेच होऊ शकलो नाही ||
पोटभरू पाखराची भटकंती ती
दानापाणी सरता थांबू शकलो नाही ||
भरभरून दिले त्या माणसांनी
घेणेकरी मी देणे फेडू शकलो नाही ||
मायेचे झरे या माणसांच्या मनात
दुस्वास त्यांचा करू शकलो नाही ||
साधी भोळी माणसे होती फार ती
माणसांना अंतर देऊ शकलो नाही ||
भाषा वेगळी अडसर नाही भासला
बोललो भाषा ती लिहू शकलो नाही ||
उमेदीच्या वर्षात आधार दिला यांनी
कुणालाच विसरू शकलो नाही ||
त्यांच्या कडून शिकलो थोडे फार
बरोबरी त्यांची करू शकलो नाही ||
-- अरुण वि. देशपांडे - पुणे.
9850177342
March 4, 2019
दोघे मिळून आलां हातात घेऊन हात
हाताळूनी परिस्थितीला करण्या त्यावर मात
दोघांची मिळूनी शक्ति दुप्पट होत असे
सहभागी होतां, युक्ति यशाची खात्री दिसे
एकाच तेजाची तुम्ही बाळे बरोबरीने आलां जगती
रवि-किरण होऊन जुळे प्रकाशमान बनती
ओळखुनी जीवन धोके यशाच्या मार्गांत
गाडीची बनूनी चाके सतत रहा वेगांत
एकाचे पाठी जाता दुसरा यश अल्पची मिळे
एकत्र मिळूनी काम करा तुम्ही आहांत जुळे
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
e-mail bknagapurkar@gmail.com
September 5, 2018
Copyright © 2025 | Marathisrushti