नाहक

 



जात – धर्माच्या नावावर आजही

बळी का जोतोय प्रेमाचा नाहक .

जात – धर्म जपण्यासाठी आजचे

प्रियकर प्रेयसी का खातात माती नाहक …

आधुनिकतेचा गाजावाजा करत आजचे सुसंस्कृत सभ्य पालकही

का कुरवाळत बसतात जात – धर्म नाहक …

सुशिक्षित सुसंस्कृत आणि आधुनिक आजची पिढीही

का बळी ठरतेय जात – धर्माचा नाहक …

प्रेमात पडताना जात – धर्म आडवा येत नाही

मग तो लग्नाच्या वेळीच का आडवा येतो नाहक …

अजून कि वर्षे समानतेचा जयघोष करत जात – धर्माच्या नावावर

प्रेमाचा बळी घेत राहणार आहोत आपण नाहक …

कवी – निलेश बामणे

— निलेश बामणे

Author