एक विशाल मन, भाग त्याचे अनेक
विखूरले जावूनी, स्वतंत्र वाटे प्रत्येक...१,
छोट्या त्या भागावरी, वेष्टण शरिराचे
अस्तित्व वेगळेच, भासते त्या मनाचे...२,
मनाचे ते स्वभाव, सारखेच असती
फरक वृत्तीमध्ये, कुणाच्याही नसती...३,
अगणीत ती मनें, कोठे नसे फरक
अनेक ती बनली, जनक तिचा एक....४
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
December 21, 2018
मिळता मजला बाह्य एकांत,
छळते गर्दी विचारांची
मन गुंतविण्या कुणी नसता,
चलबिचल होते भावनांची...१,
शब्द वर्णांचा घेवून आधार,
भावना काढी मार्ग आपला
आविष्कार घडविण्यासाठी,
विचार करितो मदत तिला...२,
शब्दांना नटवी थटवी,
ध्वनी लहरी नि सूर गेयता
अलंकार मिळता अंगी,
रचली जाते एक कविता...३
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
December 13, 2016
आव्हानांना पेलत पेलत
आता फक्त जगत रहावे
कयास सारे कलियुगाचे
ओळखुनी सतर्क जगावे
व्याख्या जगण्याची बदलली
तीच उमजुनी जगत रहावे
भुरळ आता नावीण्याची
जगताना सावध असावे
जुने जे, ते सोने असते
ते मना समजवित रहावे
मन:शांती हेची सुख खरे
याचे सदा स्मरण असावे
*******
--वि.ग.सातपुते (भावकवी)
(9766544908)
रचना क्र. ३१३
२९/११/२०२२
December 11, 2022
धुंद सागराच्या काठी पडे तुझी गाठ
एक एक स्वप्नांची या कशी लागली ही वाटअश एक स्वप्नांची ही असे ही कहाणी
तुझ्यावीण झालो जगती जरी मी विराणी ।।१।।
एक पाऊली तू जाता कापिते ही लाट
तुझ्यापाठी पाऊल माझे सांग कुठे जात अथांग या सागरी असती माणिके अनेक
परंतु हाती माझ्या येती शिंपले नि शंख ।।२।।
तुझ्या येई मागे जरी मी कंपितो ही दीप
तुटोनिया जरी हे जाती युयुत्सुची पांखअथांग हा सागर खाली अनंत हेचि विश्व
जाणण्यास अधीरी जरी मी गूढ तुझे स्वत्व ।।३।।
दावी एकदा तू मजला तुझे गोड रूप
तुझ्यावीण नाही मजला अन्य काही सूखएकदाची सागरतीरी एकदाची दावी
विश्वरुप घेण्याआधी तूर्त तुझी काळी ।।४।।
-- जयंत वैद्य
October 4, 2025
(मुक्तछंदात्मक)
थोडा वाकून पहा खाली,
काय चाललंय या पृथ्वीतली,
सत्ता, लत्ता, अधिकार, पैसा, यामधून एवढा माततो का कुणी,-? जनावरे बरी म्हणायची पाळी, संकेत, भाषा, सभ्यता, निष्ठा,
कशी पाळतात ती सारी,--!!!
समूहनियम, कर्तव्येही माहित,
अधिकाराचे बडगे दाखवत नाहीत,
नुसतीच माणुसकीचा आंव आणून,----
पैसा इतका प्रिय असावा की, म्हाताऱ्या आई-बापांनी जावे वृद्धाश्रमी,
खस्ता जराही आठवत नाहीत, त्यांनी भोगलेल्या; केवळ लेकरांसाठी,--!!!
स्त्रीचे स्त्रीत्व शालीनतेत,
कुठे उडली रे लाज,--?
किती किती असभ्य बनल्या आहेत त्या, ---
आज स्वतःच्या हाताने घेतलंय करून,----
समाजातली स्त्री फक्त भोगवस्तू स्त्री शक्तीचा आदर सन्मान,ते, करतो तरी कोण,--?
वासनांनी बरबटलेले डोळे,
बाकी काय बोलतील,--?
नीती प्रीती भक्ती कशाशी खातात,--?
जन्म-मृत्यूही इतके स्वस्त इथे,जीवनच महागडं झालंय,
अशा दुनियेत जगवतोस, ही, आम्हाला दिलेली शिक्षा का मोठी,--?
-- © हिमगौरी कर्वे.
October 21, 2019
ना.धो.महानोर सर भावपूर्ण श्रद्धांजली
गेला अस्तालं सुरयं,काळवंडलं आभाळं
जिवं झाला कासावीसं,झाला काळुख आंधारं
उजेडाची हि लेखनं,कशी रूकली रूसली
आज सरोसती माय,हुंदका फोडून रडली
झाली पोरकी कविता, रानी आंधार आंधारं
कुठं शोधु तुलं आत्ता,कुठं गेलासी सोडूनं
युगां पडलं भगदाडं,झाला युगांत युगांत
वलावल्या पापण्यां त्या,वघळत वघळती
अवकाश मोठा झाला,त्यालं तुहीच गरजं
ये रे आता परतुनी,उजवं सरू मायची कुसं
©गोडाती बबनराव काळे
9405807079
August 4, 2023

-- विनोद
July 19, 2010
तेवत होती ज्योत दिव्याची, प्रकाश देवूनी सर्व जनां
आनंदी करण्या आनंद वाटे, तगमग दिसे तिच्या मना,
शांत जळते केंव्हां तरी, भडकून उठते कधी कधी
फडफड करित मंदावते, इच्छा दाखवी घेण्या समाधी
जगदंबेच्या प्रतिमेवरती, प्रकाश टाकूनी हास्य टिपते
हास्य बघूनी त्या देवीचे, चरण स्पर्शण्या झेपावते
अजाणपणाच्या खेळामधली, स्वप्न तरंगे दिसूनी येती
दिव्यामधले तेल संपता, काजळी धरल्या दिसे वाती
-- डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
December 10, 2020
कोणाच्याही अर्ध्या प्रेमाला जोडून
पूर्ण प्रेम होत नाही
निर्माण होतो तो आभास
त्या अभासातून
जन्माला शेवटी
प्रेम अपूर्णच येते...
दोन अपूर्ण प्रेमांना
पूर्णत्व क्वचितच मिळते
कारण आपले
खरे ! अर्धे प्रेम
मिळविण्यासाठी
फार मोठी किंमत
मोजावी लागते
जी मोजण्याची
हिंमत आजच्या
स्वार्थी जगात
बहुतेक कोणाकडेच नसते
म्हणूनच आज
प्रत्येकाचे प्रेम शेवटी
अपूर्ण असते....
© कवी - निलेश बामणे
June 10, 2017
काळोखातही सृष्टीची ही गंमत न्यारी
July 12, 2026
Copyright © 2025 | Marathisrushti