अनुत्तरित प्रश्न

जीवनात अमुच्या हर घडीला

रोज नवे प्रश्र उभे राहिले

शोधण्यात त्या प्रश्र्नांचे उत्तर

आयुष्य व्यर्थ की हो चालले ।

कैक प्रश्र्नांना नसते ऊत्तर

का प्रश्र्नच त्यांचे असते ऊत्तर

प्रश्र्नांना ज्या नव्हते ऊत्तर

अनुत्तरित ते सदैव राहिले ।

नारी पोटी असे जन्म नराचा

तोची काळ होई का त्या नारीचा

लुटता ईज्जत कुणा बालीकांची

काळीज का नाही कुणाचे फाटले ।

माता भगीनी म्हणून पुजन करीती

भाषणातून अती कौतुक करीती

घालताना त्यांच्या अब्रूवर घाला

का दु:ख ना त्यांना कधी जाहले ।

सुरेश काळे

मो. ९८६०३०७७५२

सातारा

५ अॉगस्ट २०१८



जीवनात अमुच्या हर घडीला

रोज नवे प्रश्र उभे राहिले

शोधण्यात त्या प्रश्र्नांचे उत्तर

आयुष्य व्यर्थ की हो चालले ।

कैक प्रश्र्नांना नसते ऊत्तर

का प्रश्र्नच त्यांचे असते ऊत्तर

प्रश्र्नांना ज्या नव्हते ऊत्तर

अनुत्तरित ते सदैव राहिले ।

नारी पोटी असे जन्म नराचा

तोची काळ होई का त्या नारीचा

लुटता ईज्जत कुणा बालीकांची

काळीज का नाही कुणाचे फाटले ।

माता भगीनी म्हणून पुजन करीती

भाषणातून अती कौतुक करीती

घालताना त्यांच्या अब्रूवर घाला

का दु:ख ना त्यांना कधी जाहले ।

सुरेश काळे

मो. ९८६०३०७७५२

सातारा

५ अॉगस्ट २०१८

Author