(User Level: User is not logged in.)

कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • कलियुगी संस्कृती

    पांघरुनी , बेगडी मुखवटे..
    सुन्न जगावे ! सुंदर जगती..
    क्षणक्षण सारे आव्हानांचे..
    जीवाचे , जगणेच कसरती..।।१।।

    कोण भला अन कोण बुरा ?..
    जगती , सारीच सुंदोपसुंदी..
    विश्वासाचा नाहीच भरवसां..
    स्वार्थापोठी ! साऱ्या संगती..।।२।।

    नीती , निष्ठा , प्रीती , भक्ती..
    टांगलेल्या , आता वेशीवरती..
    आज निर्लज्यांची सदैव सद्दी..
    स्वाहा:कार ! विध्वंसी नीती..।।३।।

    कलियुगाचीच , सारी किमया..
    रामराज्याविना , राज्य राक्षसी..
    हत्त्या ! मानवतेची ही निर्घृणी..
    विनाशी ! हीच आज संस्कृती..।।४।।

    विवेकानेच , आज इथे जगावे..
    स्वस्वार्था कां उगा कवटाळावे..
    तन रेतीच आहे , मृत्यूच सत्य..
    रिकाम्याच रे या ओंजळी अंती..।।५।।

    वि.ग.सातपुते.(भावकवी)

    9766544908

    रचना क्र. ६७

    १९ - ५ - २०२१

      June 10, 2021


  • प्रसिद्धी

    वर्तमानकाळात उभा राहून
    भूतकाळ आणि भविष्यकाळ
    मी दोन्ही पाहतोय...
    भूतकाळ बरा होता ,
    भविष्यात मी स्वतः च स्वतःला शोधतोय...
    मोहाच्या ढिगाऱ्याखाली गाडला गेलोय...
    त्या ढिगाऱ्यावर ती बसलेय
    माझी प्रसिद्धी !
    माझ्या प्रेयसीचा
    हात हातात घेऊन...
    मी प्रेमाची शिक्षा भोगतोय
    आतल्या आत गुदमरतोय...

    निलेश बामणे ( बी डी एन )

      June 12, 2017


  • उपरती

    नाही केली कधीच वारी
    नाही देखिली कधीही पंढरी
    नाही घडले स्नान भिवरेच्या थडी
    बांधत राहिलो मजले आणि माडी
    हाती नाही घेतले टाळ ना आले मुखी अभंग
    संसारात करीत राहिले नाना रंग आणि ढंग
    ना दान ना धर्म ना दाखविली माणुसकी
    आता कोण दाखविल कशाला मला आपुलकी
    या महामारीने उपरती झाली म्हणून आलो मी शरण
    नाही सोडणार तुझे चरण पण चुकव रे पुढील जन्म मरण
    धन्यवाद.
    -- सौ. कुमुद ढवळेकर.

      June 15, 2022


  • स्वातीची सर

    ओथंबल्या पापण्यात भाव
    अलगद टिपून आहे
    सांज खुणावे हलकेच
    ओल गंधित अत्तरात धुंद आहे
    मोहरल्या तारकात चांद
    टिपूर सजून आहे
    आकाश दुधाळ पोर्णिमेचे
    रात्र मखमली मोहरुन आहे
    स्पर्श तुझा हवाहवासा
    रातराणी गंधित आहे
    अलवार लाजले मी जराशी
    लाजणे तुझ्यात गुंफून आहे
    मलमली मोहक मिठी तुझी
    गंधाळून पारिजात आहे
    सांडले मोती आल्हाद हृदयी
    स्वातीची सर अंतरी भिजून आहे
    -- स्वाती ठोंबरे.

      November 4, 2021


  • भावनांची घरें

    घरें निरनिराळी बांधली, घ्याहो निरखूनी ।।धृ।।

    वास्तुकला सुंदर रंग त्याचे बहारदार

    आकर्षक वाटणार परी निवड करा जपुनी,

    घ्याहो निरखूनी ।।१।।

    ही घरे भावनांची त्यांत छटा विचारांची

    भर पडतां श्रद्धेची जीवन जाईल तसेंच होऊनी,

    घ्याहो निरखूनी ।।२।।

    राग लोभ अहंकार मद मत्सर हे विकार

    ह्यांची ती घरे असणार शोधा विचार करुनी,

    घ्याहो निरखूनी ।।३।।

    दया क्षमा शांति प्रेम आनंद उल्हासती

    आदर भावांची वसती विवेक बुद्धीने शोधा जाणूनी,

    घ्याहो निरखूनी ।।४।।

    प्रत्येक शोधतो आपले घर तसेच करी जीवन साकार

    सुख दुःखाची फळे घेणार हीच जीवनाची खरी कहाणी,

    घ्याहो निरखूनी ।।५।।

    घरें बांधली निरनीराळी घ्याहो निरखूनी

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

      June 1, 2020


  • इतकाच माझा गुन्हा

    काय बोलू मी तुला, काय झाला माझा गुन्हा,
    प्रेम केलं तुझ्यावर, इतकाच माझा गुन्हा.

    तुझ्या नजरेत अपराधी ठरलो मी कसा सांग,
    श्वासोश्वासात जपलं, इतकाच माझा गुन्हा.

    शब्द झाले अपुरे, भावना राहिल्या ओठांवर,
    मनात तुला पूजलं, इतकाच माझा गुन्हा.

    दूर गेलीस तू तरी दोष माझ्याच माथी आला,
    तुझ्यावर श्रद्धा ठेवली, इतकाच माझा गुन्हा.

    आज आरशासमोर उभा राहून विचारतो स्वतःला,
    स्वतःपेक्षा तुला जपलं, इतकाच माझा गुन्हा.

    लोक म्हणाले वेडा, काहीं हसले माझ्यावर,
    निस्वार्थ प्रेम मागितलं, इतकाच माझा गुन्हा.

    •ॲड.कीर्तिराज शैलेंद्र आगलावे, पुणे

      July 13, 2026


  • शारदास्तुती

    देवी शारदे शारदे
    मांडीयेला गजर
    तुझ्या कृपेने
    उजळू दे परिसर ।।धृ।।

    तुझ्या हातात हातात
    विद्वत्तेची बीन
    तुला बसाया बसाया
    मोराचे आसन
    रूप आगळे आगळे
    शोभे श्वेतांबर ।।

    तुझा प्रसाद प्रसाद
    लाभो भाविकाला
    विनम्र होऊ दे होऊ दे
    अष्ट सिद्धीकला
    सार्‍या भक्तांचा भक्तांचा
    होऊ दे उद्धार

      October 11, 2018


  • जागतिक कला दिवस

    इटलीचे लिओनार्डो दा विंचीच्या यांचा आज जन्मदिन असतो. म्हणून आज जागतिक कला दिन(वर्ल्ड आर्ट डे) साजरा करावा म्हणून निश्चित करण्यात आले. दा विंचीची जागतिक शांतता, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, सहिष्णुता, बंधुता आणि बहुसंस्कृतीवाद तसेच इतर क्षेत्रात कला महत्त्व म्हणून निवडण्यात आले.

      April 15, 2022


  • अजून तुझिया आठवणींनी

    मित्र मैत्रिणींनो शुभ संध्या !!

    दाटून आलेली सुरेख संध्या, आणि त्याच वेळी तिचं असं नदीकाठी उभं राहणं, हे तिच्या मनात भावभावनांचा कल्लोळ घेऊन येतं आणि मग "त्याची" तीव्र आठवण येऊन ती म्हणते ......….

    अजून तुझिया आठवणींनी
    शहारते रे शरीर मनही
    अजून होतो भास तुझा, अन्
    बावरले मन तुलाच पाही !!

    किती लोटला काळ आता रे
    भेट तुझी ती झाली नाही
    या नयनांची मिटली पाखरे
    सतत तुला रे शोधत राही !!

    आज अचानक या वाऱ्यावर
    गंध तुझा मनमोहक आला
    आठवणींच्या गंधकोषीचा
    रंगीत शेला गंधित झाला !!

    काव्यरचना ©✍?
    प्रमोद मनोहर जोशी, जळगाव
    9422775554, 8830117926
    कविता कॉपी राईट अंतर्गत आहे

      May 5, 2021


  • अर्जून दुर्योधन कृष्णाकडे

    दोघेही येती एकाच वेळीं
    श्रीकृष्णाच्या भेटीला
    अर्जून उभा चरणाजवळी
    दुर्योधन बसत उशाला...१

    प्रथम दर्शनी नेत्र उघडता
    नजर गेली अर्जूनावरी
    प्रभूकडे तो आला होता
    आशिर्वाद त्याचे घेण्यापरी....२

    दुर्योधन दिसे बघता पाठी
    अहंकाराने होता भरला
    मदत करण्या युद्धासाठी
    विनंती करि तो हरिला....३

    युद्धामध्ये भाग न घेई
    सांगेन गोष्टी उपदेशाच्या
    परि सारे त्याचे सैन्य जाई
    लढण्या दुसऱ्या बाजूच्या...४

    विश्वास होता सैन्यावरी
    दुर्योधन मागतो अनेक
    आशिर्वाद हवा होता
    अर्जून निवडतो एक...५

    निवड करूनी श्रीकृष्णाची
    विश्वास येई स्वत:वरी
    अस्तित्व शक्ती जेथे प्रभूची जयश्री जाईल कशी दुरी...६

    -- डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

      December 1, 2019