निळसर रंगाच्या दुलईत लपला
अजून झोप सरली नाही
पहाटेने हाक देऊनही
जाग त्याला आलीच नाही!
कोंबड्यांचा आरव
पक्ष्यांचे कूजन
त्याच्याच कुशीतल्या
मधमाश्यांचं गुंजन
उगवतीचा सूर्य माध्यावर आला
अंगावरच्या कणखर घड्यांनी आळस दिला
थकलो आहे आता ऊन पाऊस झेलून
श्रांतावंसं वाटतं आता दिगंताकडे पाहून..
-- आर्या आशुतोष जोशी
April 25, 2019
कवितेचा कवी
कविते
आहेस प्राण तू
या वेडया कविचा
कवितेविणा
चालेल कसा श्वास
या वेडया कविचा
कवितेसाठीच
आहे देह जगी
या वेडया कविचा
कवितेमुळेच
होतो कवितेचा कवी
म्ह्णोनी सन्मान कविचा !
© कवी – निलेश बामणे ( एन.डी. )
August 10, 2013
फार गंभीर बनून जगू नका. हे विश्वकरोडों वर्षापासून आहे. कित्येक आले आणि गेले. कुणावाचून कुणाचे काही थांबत नाही. जे व्हायचे ते होत राहणार आहे. तुम्हाला विचारुन काही घडणार नाही.
September 9, 2023
३० एप्रिल..... ज्येष्ठ संगीतकार श्रीनिवास खळे उर्फ खळे काका यांचा जन्मदिवस ! "सर्व सर्व विसरू दे गुंतवू नको पुन्हा" हे गाणं म्हणता म्हणताच ज्यांच्या संगीतात , लयीत आणि तालात आपण गुंतत जातो ते खळेकाका !
" गोरी गोरी पान" ते "लळा जिव्हाळा शब्दच खोटे", "या चिमण्यांनो परत फिरा रे" ते "ऊन असो वा असो सावली", "चुकचुकली पाल एक" ते "शुक्रतारा", "लाजून हसणे अन" ते "कळीदार कपूरी पान"
किती किती गाणी आठवावीत जी आपण आपल्या मनाच्या अत्तरकुपित साठवून ठेवली आहेत त्याचा हवा तेव्हा सुगंध घ्यायला !
"ताक धीना धीन" या मुंबई दूरदर्शन च्या मेगा फायनल च्या बक्षीस वितरण समारंभास खळे काका स्वतः उपस्थित होते साल होतं २०००. मी आणि माझ्या सहकारी सौ प्रज्ञा लेले, मुंबई मेगा फायनलचे विजेते ठरलो होतो, त्यावेळी झालेल्या खळे नामक परीस स्पर्शाची आठवण आजही मनात ताजी आहे !
खळे काकांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन !
आज खळे काकांवर मी लिहिलेली ती कविता खास तुमच्यासाठी पुन्हा रिपोस्ट करत आहे !! जरूर प्रतिक्रिया दया !
"शुक्र तारा" जो संगीतातला
लय तालाशी खेळे
मोहक रचना सुरावटींनी
तृप्त करिती ते खळे II धृ II
सुगम भासती रचना ज्यांच्या
गाण्या परी कठीण
मुखड्या वरूनी अंतऱ्यातला
प्रवास गूढ गहन
"राजहंस" जो संगीतातला
सुरम्य ज्याचे तळे
मोहक सुंदर सुरावटींनी
तृप्त करिती ते खळे II १ II
"ऊन असो वा असो सावली"
गाणी जी रिझवीती
"सर्व सर्व विसरू दे" म्हणताना
"आनंद तरंग" उठती
"अभंगी तुक्याच्या" तल्लीन
"जे का रंजले गांजले"
मोहक रचना सुरावटींनी
तृप्त करिती ते खळे II २ II
"चंद्र पुनवेचा" दिसे कुठे ती
"चंदाराणी उदास"
"निज माझ्या नंदलाला रे"
अंगाई बाळास
कुणी षोडशा हरवून पाही
"प्रतिबिंब पाण्यातले"
मोहक रचना सुरावटींनी
तृप्त करिती ते खळे II ३ II
इथेच "भेटे अंतर्यामीचा
कान्हो वनमाळी"
इथेच राधेसाठी सुस्वर
"बाजे रे मुरली"
"किलबिल किलबिल पक्षी बोलती"
गाणे मनातले
मोहक रचना सुरावटींनी
तृप्त करिती ते खळे II ४ II
बाज्याची पेटी विकण्याची कधी
वेळ जयांवर आली
त्याच श्रीनिवासावरी पुढे श्री
सरस्वती बरसली
त्याच्या गाणे आमुची अवस्था
"अजी मी ब्रह्म पाहिले"
मोहक रचना सुरावटींनी
तृप्त करिती ते खळे II ५ II
"जाहल्या काही चुका अन
सूर काही राहिले"
"ओठातल्या ओठात वेडे
शब्द माझे राहिले"
"रात्री तरी गाऊ नको ग"
"गेले ते दिन गेले"
मोहक रचना सुरावटींनी
तृप्त करिती ते खळे II ६ II
नतमस्तक मी तुझ्या पुढे रे
असा श्रीनिवासा
तुझ्या संगीते सुगंध येई
मातीच्या वासा
तुझ्या मुळे रे मन"आकाशी
फुलती चांदण मळे"
मोहक रचना सुरावटींनी
तृप्त करिती ते खळे II ७ I
काव्यरचना ©✍?
प्रमोद मनोहर जोशी जळगाव 9422775554, 8830117926
कविता कॉपी राईट अंतर्गत आहे
May 4, 2021
माझ्या भोवताली,
माणसांचे रान,
चहूबाजूंना असूनही,
वाटा सुनसान,--!!!
टोचे सले असे एकटेपण,--!!
माझ्या भोवताली,
नातीगोती किती,
प्रश्न एकच पडे,
विचारती किती,--
टोचे सले असे एकटेपण,--!!
माझ्या भोवताली,
मित्रपरिवार किती,
असंख्य हात निव्वळ,
फक्त वर ते उठती,
टोचे सले असे एकटेपण--!!
माझ्या भोवताली,
पिके खूप मतांची,
उपयोगाला येती,
त्यातील का कधी,--!!
टोचे सले असे एकटेपण--!!
माझ्या भोवताली, दे
कितीक सहयोगी,
असते का त्यांना,
आंच हितचिंतनाची,--?
टोचे सले असे एकटेपण,--!!!
माझ्या भोवताली,
माझे असे किती,
प्रेम माया कुठली,
आणावी आपुलकी,--
टोचे, सले, असे एकटेपण--!!
माझ्या भोवताली,
इहलोकातील गर्दी,
प्रांजळ निर्मळ,
भावना कोणाची खरी,--
टोचे सले असे एकटेपण,---!!!!
©️ हिमगौरी कर्वे.
March 20, 2020
सतत फिरत राही, चक्र जीवनाचे ।
विविधता पाही , रंग आयुष्याचे ।।१।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
e-mail- bknagapurkar@gmail.com
विवीध-अंगी ***२८
एकदा माझ्या तोंडून शिवी बाहेर पडली, तेंव्हा मुलांने टोकलं.
शिकवल्यापैकीं फक्त चागलंच त्यानी घेतलं, हे मला जाणवलं
-- डॉ. भगवान नागापूरकर
May 25, 2014
क्षण तोच धुंद , बेभान
अस्तित्वा हरवुनी गेला
मी , तू सहज विसरूनी
मिठितच गुंतवुनी गेला
तो सोहळाच प्रीतस्पर्शी
अंतरंगी विर्घळूनी गेला
तादात्म्य ! भाव निर्मळी
स्वत्वास ! समर्पूनी गेला
तोच अवीट स्पर्शानंद
श्वासास सजवुनी गेला
खेळ साराच संचिताचा
जन्म , हा कृतार्थ झाला
--वि.ग.सातपुते ( भावकवी )
9766544908
रचना क्र.१८६
३/८/२०२२
September 4, 2022
आत्म्याचे मिलन परमात्म्याशी,
हेच जीवनाचे ध्येय असे,
आत्मा ईश्वरी अंश असूनी,
त्यालाच मिळण्या उत्सुक असे ।।१।।
देह पिंजऱ्यांत अडकता,
बाहेर येण्या झेप घेई तो,
अवचित साधूनी वेळ ती,
कुडी तोडूनी निघून जातो ।।२।।
कार्य आत्म्याचे अपूरे होता,
पुनरपी पडते बंधन,
चक्र आत्म्याचे चालत राही,
मुक्त होण्याचा येई तो क्षण ।।३।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
July 7, 2016
भारत हा जगातील नारळ उत्पादनात एक अग्रगण्य देश आहे. जगात नारळ उत्पादनात भारताचा तिसरा क्रमांक लागतो. भारतात १९.८ लाख हेक्टर क्षेत्रात २०४४ कोटी नारळाचे वार्षिक उत्पादन घेतले जाते.
September 2, 2021

का रमाकृष्ण ना कोणी वदले?.....
राधे कृष्ण राधे कृष्ण, मी ही मनापासून वदले
हरि सोबत तु असतानाही, रमाकृष्ण ना कोणी वदले .....
ना तुझे नाव माझे झाले, ना तुझे मन माझे झाले
रंग मलाही सावळा लागला, तरी रमा कृष्ण ना कोणी वदले ....
तुझी राधेवरची ती माया, का रे एकदाच सारे घडले
मी अर्धांगिनी रुक्मिणी, तुझी वाट पाहुनी थकले .....
तुझी संपूर्ण मी होऊनही, अपूर्ण काहीसे राहीले
संगम मनाने केला मनाशी, तरी मनोरमा नाही बनले ....
स्वर गुणगुणनारी ती, बासरी एकदाच तिच्याशी हसले
जे तुला कधी न कळले, ते सारेच तिने जाणिले ....
हरि बनुनी येउनी जा, एकदा रमेचे होऊनी जा
जाता जाता वृंदावनात, रमाला राधा बनवूनी जा ....
-- स्वाती पवार
November 4, 2019
Copyright © 2025 | Marathisrushti