प्रवास! जन्म मृत्यूचा
कर्माचाच दृष्टांत जसा
श्वास केवळ पराधीन
क्षणीक बुडबुडा जसा।
स्वामी! सत्ताधारी एक
ब्रह्माण्ड मुठीत त्याच्या
सृष्टीसवेची पंचमहाभूते
त्याचा आविष्कार जसा।
भाग्यवंती जन्म मानवी
भोगणे, प्रारब्ध संचिती
कृपाळू! तोच दयाघनी
जगवितो अलवार जसा।
प्रहर! सारे साक्ष त्याची
नक्षत्र,ग्रहगोल,तारे सारे
रूप त्याच अनामीकाचे
उभा लोचनी तोच जसा।
— वि.ग.सातपुते. (भावकवी)
9766544908
रचना क्र. ५१.
१८ – २ – २०२२.
Author
Post Views: 11