काही दिवसांपूर्वी
मी माझ्या डोळ्यात
साठवलेली होती
नग्नता इतकी अफाट
की आता मज माझ्या
सभोवतालची सर्व
नग्नताच दिसत होती
धूसर आणि धूसरच
ती अश्लीलता होती
खरी माझ्या डोळ्यात
पाहणारी नग्नतेस
अश्लीलतेने उगाच
माझ्याच डोळ्यातील
अश्लीलता दूर होता
दिसले मज दडलेले
सौंदर्य नग्नतेतील
कवी – निलेश बामणे.
— निलेश बामणे
Author
Post Views: 10