(User Level: User is not logged in.)

कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • प्रेम स्वयंपाक घरातुन…

    नको ना रे राजा नको
    असा माझ्यावर रूसुस
    वड्यांवरचे तेल नको
    वांग्यावर तू काढुस

    संसार म्हणजे लागणार रे
    भांड्याला भांड
    पण मनातल्या संतापाला
    तू हळुवारपणे सांड

    तापलेल्या वातावरणात
    एकान बसावं चूप
    वाफाळलेल्या वरणभातावर
    ओतेन मायेचं साजुक तूप

    प्रेमाला असु द्यावी
    रूसव्या फूगव्याची जोड
    प्रेम म्हणजे लोणच्याची
    आंबट तिखट फोड

    थोडीशी थट्टा मस्करी
    म्हणजे जगण्याची मजा
    कोशिंबीर खाणे म्हणजे
    का रे समजतोस तू सजा

    जगणं झालय थोडं बेचव
    येतेय जीवनाला झापड
    प्रेमानं खा ना रे तू देते
    कुरकुरीत मसाला पापड

    भिजुया प्रेमाच्या पावसात
    हो ना रे तू आता राजी
    आला बघ रिमझिम पाऊस
    देइन तुला गरम भजी

    नको बुडवूस जास्त प्रेमात
    अरे येतील मला मोड
    निर्मळ अश्या प्रेमाला
    नाही रे कशाचीच तोड

    उमजले नाही कुणाला
    हे अजीब गुलाबी कोडं
    प्रेमाला उपमा नाही
    ते असतं शिऱ्यापेक्षा गोड

    - डॉ.सुभाष कटकदौंड

      October 26, 2018


  • जागतिक नृत्य दिवस

    नृत्य.. डान्स.. आज प्रत्येक भारतीयाच्या नाही तर जगातल्या प्रत्येकाशी मनाचं वैश्विक नातं जोडणारा हा कलाप्रकार.. होय एकीकडे तेल, सिमावाद, धर्म अशा नानाविध प्रकारांनं जगात फक्त विरोधाच्या भिंती उभ्या राहत असताना, जगभरातल्या डान्स प्रकारांनी मात्र देश-परदेशातही प्रत्येक सजग मनात आपली मुळं घट्ट रोवलीय.. जगभरातल्या नृत्य प्रकारांबद्दल किती आणि बोलावं.. शब्द थिटं पडतील अस पदलालीत्य.. भुरळ या शब्दालाही क्षणक्षर मोह पडावा असा नृत्यआविष्कार आणि श्रवणीयपणाही मंत्रमुग्ध व्हावा असं मनमोहक संगीत..जागतिक नृ्त्याविष्काराचा आढावा घेतला की शब्दांच्या मर्यादा आणि कलेचा बेफामपणा ठायी ठायी दिसतो.

      April 30, 2022


  • सांग दर्पणा कशी मी दिसते

    सांग दर्पणा कशी मी दिसते...
    ममतेचे औदार्य की फक्त आरसपाणी सौंदर्य?
    मायेची सावली की फक्त शोभेची बाहुली?
    ल्यायले जेंव्हा मी धैर्य, क्षमा, जिगर, हिम्मत हे अलंकार
    तरीही नथ, पैंजण, बांगड्या, मंगळसुत्र म्हणजेच ‘मी’ हा नाही का वाटत चमत्कार?
    का संभ्रम, का नकार?
    अस्तित्वासाठी किती तुडवायचे अजून निखार?
    सांग दर्पणा सांग कशी मी दिसते...?

    सृष्टीचे सगुण रूप साकार, की धरणीला या भार?
    थांब.. तू नकोचं बोलू नकोचं सांगू..
    तुला पामराला का मी विचारावे?
    तु हि देशील जुनेचं दाखले, जुनेचं पुरावे..
    लादशिल माझ्या पाठीवरती बुरसटलेल्या विचारांचे ओझे.
    दाखवशिल मला माझीचं जुनी ती ‘मूर्ती’
    जिला नव्हती ‘स्व अस्तित्वाची’ महती..

    हे, ऐक दर्पणा ऐक.. मी अशी दिसते...

    “मुक्त मी, स्वैर मी..
    स्वतंत्र मी, स्वच्छंदि मी.
    मज नकोत बेड्या, नकोत बंधन
    हवेत फक्त ह्रदयाच्या ख-या बंधांचे गुंफंण.
    पु-या करण्या माझ्या स्वप्नांना घेते मी ऊंचचं ऊंच भरारी..
    असले जरी ते माझेचं स्वप्न, ऊभारली आहे गुढी मी घराण्याच्या अन् देशाच्या अभिमानाची.
    सुंदर बनवण्यास जीवन ‘जीवन’ झाले मी..
    दिला जसा आकार तशी आकारले मी.
    बसं..आता जाणीव झाली आहे मला माझ्या अस्तित्वाची..
    जशी वाळवंटातल्या मनुष्याला थेंबभर ‘जळाची’.

    (दर्पण): “चुकलेचं माझे, नाही ओळखले खरे रूप तुझे..
    वदतो आहे हे खरे मी
    घे कवेत अपराध हे माझे.
    ही तूचं आहेस, तुझीचं खरी प्रतिमा आहे ही
    आता नको नाकारु, नको झुगारु..
    नको थांबू, नको थांबवू..
    ऊंचचं ऊंच घे भरारी
    भरारी घेण्या पंखांना तू दे ऊभारी”..
    तू घे भरारी..

    © - शिल्पा परांडेकर

      October 23, 2018


  • पक्षी – मुलातले प्रेम

    स्वैर मनानें भरारी घेई, पक्षी दिसला आकाशीं ।

    स्वछंदामध्यें विसरला , काय चालते पृथ्वीशीं ।१।

    एक शिकारी नेम धरूनी, वेध घेई पक्षाचा ।

    छेदूनी त्याचा एक पंख, मार्ग रोखी उडण्याचा ।२।

    जायबंदी होवूनी पडला, जमीनीवरी ।

    त्वरीत उचलून पक्षाचे, पाय बांधे शिकारी ।३।

    ओढ लागली त्यास घराची, भेटन्या मुलाला ।

    आजारी असूनी पुत्र त्याचा, चिडचिडा तो झाला ।४।

    चकित झाला बघूनी मुलाला, अंगणी खेळतांना ।

    बघत होता रोज त्याला रडत असतांना ।५।

    झाडा वरती दोन पक्षी, नाचुन गात होते ।

    मुलास त्याच्या आनंद देवूनी, रिझवीत होते ।६।

    गहींवरूनी गेला दृष्य बघूनी, पक्षी- मुलातले प्रेम ।

    सोडून दिला हातातला पक्षी, लावून त्यास मलम ।७।

    डॉ. भगवान नागापूरकर

    संपर्क - ९००४०७९८५०

    bknagapurkar@gmail.com

      November 17, 2016


  • ताई

    आज ती येऊन गेली
    पोटातली माया ठेऊन गेली
    इतक्या दिवसांच पोरकेपण
    क्षणात सार मिटवून गेली
    आज ती येऊन गेली
    भाच्याला पापा देऊन गेली
    खेळणी आणि पैसे थोडे
    खाऊसाठी देऊन गेली
    आज ती येऊन गेली
    सासर माहेरचं बोलून गेली
    तिच्या माझ्यातलीच काहीं गुपिते
    मनामनामध्ये साठवून गेली.
    आज ती येऊन गेली
    हळदीकुंकू घेऊन गेली
    तोंडभरून आशीर्वाद अन
    घर भरून देऊन गेली
    आज ती येऊन गेली
    आईची कमी भरून गेली
    पापण्यांच्या कडा ओल्या थोड्या
    जाईपर्यंत भिजवून गेली !
    -- वर्षा कदम.

      November 26, 2021


  • सारेच चोर

    हासतात तुला वेड्या ते,
    पकडला गेलास समजून
    परि सहानूभूती आहे त्यांच्यात,
    चोर आहेस म्हणून

    -- डॉ. भगवान नागापूरकर
    ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

      January 16, 2019


  • स्वातंत्र्यदिन-गीत – (१) : पुढे काय ?

    स्वातंत्र्य मिळालें, पुढें काय ?
    चालेल पुढें हें मढें काय ?

    स्वातंत्र्यासाठी फुकटच लाखों पडले
    अम्हि-तुम्हि घेतले धडे काय ?

    सत्तर वर्षें स्वातंत्र्याला होतिल रे
    गाजण्यांयोग्य पण घडे काय ?

    सांडलें रक्त हें खरेंच आहे, परी
    अविरत त्याचे चौघडे काय !

    राज्यावर शिवबांच्या बाजिराव-दुसरा !
    मग राज्य बुडालें, अडे काय ?

    जो खाली, तो तर खाली-खाली जातो
    अंधांच्या दृष्टिस पडे काय ?

    जो वर चढतो, त्याला खेचूं रे खाली
    आम्हांला टाळुन उडे काय !!

    स्वातंत्र्याच्या हर्षानें पोट भरा
    अन्नासाठी कुणि रडे काय ?

    नेते-च गुन्ह्यांना देती चिथावणी
    लावतील पोलिस छडे काय !

    करीतसे आगळीक राष्ट्र-शेजारी
    पण करील UN-बडें काय ?

    दुर्दशा बघुन दो-चार फार अस्वस्थऽ
    पण, त्यांशिवाय, कुणि कुढे काय ?

    दुस्थिती सांगु जर जाई कुणि नेत्यांना
    ते मख्ख उत्तरत, ‘कुठे काय ?’

    - सुभाष स. नाईक. Subhash S. Naik
    सांताक्रुझ (प), मुंबई. Santacruz (W), Mumbai.
    Ph-Res-(022)-26105365. M – 9869002126
    eMail : vistainfin@yahoo.co.in
    Website : www.subhashsnaik.com / www.snehalatanaik.com

      August 17, 2016


  • प्रेमाच्या नावाखाली

     

      November 20, 2013


  • स्वप्न आणि जागेपण

    एक ती झोप स्वप्न बघत राही
    शिणवून शरीर ताप जीवास सुख देई

    स्वप्न जाई विसरुन जाग येता मनां
    जागे मन स्वप्नांत भासवी वेगळेपणा

    एकाच मनाच्या दिसे ह्या दोन भुमिका
    भिन्नता त्यांत भासे जाऊन दोन टोकां

    स्वप्न आणि जागेपण देहाच्या दोन स्थिती
    नाण्याच्या बाजू दोन एकमेका न मिळती

    डॉ. भगवान नागापूरकर
    २४- १११२८३

      September 28, 2014


  • कावळा म्हणाला.. माणसाला..

    माणूस म्हणाला..
    कावळ्याला’..

    एकदा माणूस म्हणाला..
    कावळ्याला’..

    कसे सांगायचे रे यांना,
    बाहेरचे खाऊ नका...

    पितृपक्ष चालू झाला,
    घरच्या शिवाय जेवू नका..

    ‘कावळा म्हणाला..
    माणसाला’..

    ‘कावळा म्हणाला..
    माणसाला’..

    अरे हे बुद्धीमान मनुष्या..

    पंधरवडाच फक्त आठवणीने,
    नैवद्य खिडकीवर असतो... !

    बाकीचे ३५० दिवस मात्र आम्ही,
    उकिरड्यावरचं बसतो रे .. !

    पुण्य मिळवायच्या आशेवर..
    ठेवलास तू घास छतावर..

    जिवंतपणीच सांभाळ रे बाळा..
    तुझ्या वृध्द पालकांना..

    जिवंतपणी त्यांची सेवा करून ..
    आणि त्यांचे आशिर्वाद घेऊन ..
    पुण्य मिळेल हमखास बाळा..!

    जातीपाती विसरून, गोरगरिबांना
    दान करून, गरजू ना मदत करून..
    गाठी पुण्य कमवशिल हमखास रे .!

    ‘कावळा म्हणाला..
    माणसाला’..

    जे का रंजले, गांजले..
    त्याशी म्हणा जो, आपुले...
    तोचि साधु ओळखावा..
    देव तेथे ची जाणावा...!

    -- गणेश उर्फ अभिजित कदम,
    कुडाळ सिंधूदुर्ग

      September 19, 2017