एक भिकारीण तालावरती, गात होती गाणे
पुढे करुनी एक हात, आळवित होती भजने
तंद्रित होती गाण्याच्या, एकाग्र चित्त करुनी
कसा मिळेल आनंद इतरां, हीच काळजी मनीं
मिळेल ते धन हाती घेऊनी, गेली ती परत
निराश न होता हास्य मुखाने, आशीर्वाद देत
भिक नव्हती तिने जमविली, ती तर कदर कलेची
आनंद मिळे इतरांना, हीच पावती समाधानाचीं
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
December 4, 2016
काही तरी अद्भुत घडलंय अस वाटत होतं. कदाचित माझ्या ह्या भावना आईपर्यंत त्या आजू बाजूच्या तरल वातावरणाने पोहचवला असतील. आईला पहाटे पडलेल्या एका स्वप्नाने जाग आली.
December 24, 2021
चकित झाले गोकूळवासी
बघून बाललीला
सांगा कोण आहे तरी कृष्ण ?
विचारी यशोदेला ।।१।।
प्रासादातील मोदक खातां
तोंड ते उघडले
मुखामध्ये मोदक नसूनी
ब्रह्मांड ते दिसले ।।२।।
उच्छाद मांडूनी कालीयाने
पाणी केले दुषित
मर्दन करण्यासाठीं त्याचे
उडी टाकी डोहात ।।३।।
पूतना असूनी राक्षसिण
स्तनांत होते विष
स्तनपान करुनी त्यानें
तीला केले कासाविस ।।४।।
खोड्या बघूनी यशोदेनें
उखळाला बांधले
उखळासहीत झाडे पाडूनी
चकीत त्यानीं केले ।।५।।
अनेक अशा लीला करुनी
अचंब्यात पाडले
बालमुर्ति तो ईश असूनी
सर्वांस गुंगविले ।।६।।
डॉ. बगवान नागापूरकर
९००४०७९८५०
October 27, 2020
कधी सामोरे येते ऐसे जंगलातले रूप
July 12, 2026
आत्मविश्वास जागृत ठेवूनी,
कार्य घेवूनी तडीस नेती ।
कधीही न राही अवलंबूनी,
मदतीसाठी दूजा वरती ।।
ईश्वर करीतो मदत तयांना,
मदत करी जे आपले आपण ।
आपल्यातची तो ईश्वर आहे,
असते याची जयास जाण ।।
विश्वासाने हुरूप येई,
जागृत करीती अंतर चेतना ।
लक्ष्य सारे केंद्रीत होता,
यश चमकते प्रयत्नांना ।।
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
January 27, 2016
कुणा आवडतो मोर पिसाऱ्याचा
असे कोणाला छंद कोकिळेचा,
कुणी असतो नादिष्ट पोपटाचा
मला आहे परि नाद कोंबड्याचा ।।१॥।
किती माझा कोंबडा ऐटदार
चाल त्याची किति बरे डौलदार
शिरोभागी छानसा तुरा हाले
जणू जास्वंदी फूल उमललेले ।।२॥।
पिसारा त्याचा किती झोकदार
चोच त्याची चिमुकली बाकदार
अर्धपायी पांढरीशी विजार
गमे विहगातिल बडा फौजदार ।1३।।
“उठा मूर्खांनो ! झोप काय घेता ?
अरुण उदयाचा काळ असे झाला
करा काही तरि आळसा त्यजून”
उष:काली सांगतो ओरडून ।।४।।
किती माझा कोंबडा हो शहाणा
लोक कल्याणा झटतसे पहाना !
मोर, पोपट, कोकिळा, राजहंस
रिकाम्यांचा या बडेजाव खास ।।५।।
अति परिचय जाहला कोंबड्याचा
म्हणुनि करिता का मानभंग त्याचा ?
जरी आवडला नाही तो तुम्हाला
सदा देई आनंद मन्मनाला ।॥६॥
June 11, 2026
यातना आणि वेदना,
जीवन दुसरे असते काय,
भोग आणि उपभोग,
असे त्याचे दोन पाय ,,--!!!
स्वार्थ अन् भांडण,
हेच त्याचे अवयव,
कधीकधी फक्त कींव,
कधीकधी चांगुलपण, ,--!!!
दया करुणा उपकार,
सारेच जीवन विसरले,
म्हणूनच आज सगळ्यांना,
जीव न-कोसे करणारे,--!!!
समस्या अडचणी यांचा,
त्याभोवती घेराव ,
कसे कुणाला ठाऊक,
करेल कधी संपूर्ण पाडांव,--!!!
असेना का तरीही,
त्यातच मजा आहे ,
रडके तोंड करण्यापेक्षा,
हसरे गाणे प्रिय आहे,--!!!
माणुसकी आणि सर्व भावना,
आज निषिद्ध आहेत,
स्वतःच्या पोळीवर तूप ओढणे,
एवढेच शिल्लक आहे ,--!!!
पैसा, सत्ता ,लालसा,
यांचीच सारी ओढ,
त्यांच्यात लागते सारखी,
मात देण्याची ओढ,--!!!
पण असे असूनही
मन सुद्धा मरते,
जिवंत असून मन मेलेले,
माणूस हे सिद्ध करे,--!!!!
हिमगौरी कर्वे©
February 4, 2019
निसर्गातील अनेक घटकांच्या योग्य, शाश्वत आणि नियंत्रित वापराबद्दल सर्वत्र जनजागृती करण्यासाठी आज जगभर जागतिक निसर्ग संवर्धन दिन पाळला जातो.
निसर्गातील अनेक घटकांचा वापर आपण आपल्या फायद्यासाठी करतो. परंतु, गरजेपलीकडे जाऊन असे घटक ओरबाडले जाऊ लागल्याने संपूर्ण सृष्टीचक्रातच अडथळे येऊ लागले आहेत. जीवनशैलीवर नियंत्रण ठेवणे आणि वस्तूंचा पुनर्वापर (३ आर म्हणजे रिड्युस, रियुज, व रिसायकल) हा उपाय सर्व पातळ्यांवर केल्यासच आशेचा किरण आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
July 28, 2021
मागत होता प्रभूला हात जोडूनी कांही
भक्तिभाव बघूनी त्याचे मिळत ते जाई
एका मागून एक मिळे मागणी होता त्याची
निराश करणे न लगे इच्छा होता भक्ताची
जे जे बघे भोवती घेतले होते मागुनी
कशांत दडले सुख उमज येईना मनीं
देरे बुद्धि देवा मजला योग्य मागण्यासाठी
समाधानी मी होईन तुझ्या कृपे पोटी
ज्ञान झाले गंमतीचे सांगे सोड मागणे
न मागतां मिळाले जे आनंदी केले जगणे.
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
April 9, 2021
श्रीकृष्णाचे जीवन बनली एक गाथा
यशस्वी होई तुमचे जीवन चिंतन त्याचे करिता ||१||
तल्लीनतेच्या गुणामध्यें लपला आहे ईश्वर
तल्लीनतेचा आनंद लुटा शिकवी तुम्हा मुरलीधर ||२||
बालपणीच्या खेळामध्ये जमविले सारे सवंगडी
एकाग्रतेने खेळवूनी आनंद पदरीं पाडी ||३||
मुरलीचा तो नाद मधूर मन गेले हरपूनी
डोलूं लागले सारे भवतीं मग्न झाल्या गौळणी ||४||
टिपऱ्या घेवूनी नाच नाचला गोपी साऱ्या जमवूनी
लय लागूनी जातां सारी संसार गेली विसरूनी ||५||
राधा तर वेडी झाली तुझ्यावरील प्रेमानें
लूटून जावे प्रेमामध्यें शिकविले श्रीकृष्णानें ||६||
गीतेचे तर ज्ञान आगळे उकलेले जीवन कोडे
आत्मज्ञान घेतां त्यातील जीवनाचे दर्शन घडे ||७||
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
January 22, 2020
Copyright © 2025 | Marathisrushti